बिल न भरल्याने कल्याण ग्रामीणमधील स्ट्रीट लाईट बंद, विधानसभेत भाजप आमदारांकडून प्रश्न उपस्थित

| Updated on: Mar 24, 2022 | 9:08 PM

आज भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. दीड वर्षापासून केडीएमसीत प्रशासक आहे. प्रशासकाने या गावांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारने केडीएमसी प्रशासनाला लवकर आदेश दिले पाहिजे. बिल संदर्भात निर्णय घेतला पाहिजे.

बिल न भरल्याने कल्याण ग्रामीणमधील स्ट्रीट लाईट बंद, विधानसभेत भाजप आमदारांकडून प्रश्न उपस्थित
आमदार रविंद्र चव्हाण
Image Credit source: TV 9
Follow us on

कल्याण : कल्याण ग्रामीणमधील स्ट्रीट लाईट (Street Light)चे दीड कोटी बील (Bill) न भरल्याने काही भागात महावितरणने स्ट्रीट लाईट बंद केल्याची कारवाई केली हेाती. या प्रकरणात डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी हा प्रश्न विधानसभेत उचलला. सरकारने केडीएमसीने प्रशासनाला लवकर आदेश देऊन थकबाकी भरण्यात यावी अशी मागणी केली. याबाबत केडीएमसीचे म्हणणे आहे की, ही बिले 2015 सालाच्या पूर्वीची आहेत. 2015 नंतर महापालिकेने चालू बिले भरली आहे. सदर थकबाकी संदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष केले आहे. (Street lights off in Kalyan Rural due to non-payment of bills)

रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न

कल्याण ग्रामीणमधील 27 गावांमधील काही भागात स्ट्रीट लाईट बंद होत्या. या संदर्भात भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी प्रशासनावर सडेतोड टीका केली होती. रात्री ही स्ट्रीट लाईट चालू करण्यात आली. भाजप आमदारानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी या मुद्यावरुन केडीएमसी आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले होते. आज भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. दीड वर्षापासून केडीएमसीत प्रशासक आहे. प्रशासकाने या गावांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारने केडीएमसी प्रशासनाला लवकर आदेश दिले पाहिजे. बिल संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरुन ग्रामीण भागातील नागरिकांची अंधारातून सुटका होणार आहे.

बिलाचा प्रस्ताव केडीएमसीकडे पाठवल्याचा अभियंत्याचा दावा

यावेळी 2015 साली ही गावे महापालिकात समाविष्ट करण्यात आली. यापूर्वी ही गावे ग्रामपंचायतीत होती. जी दीड कोटीची थकबाकी आहे. ती त्यावेळची आहे. आमच्याकडून चालू बील भरले जात आहे. या गावामध्ये 7 हजार 29 पथ दिवे आहे. यातील 30 पथ दिवे बंद होते. रात्री वीज पुरवठा सुरु करण्यात आला. बिलाचा प्रस्तावही वरिष्ठकांकडे पाठविण्यात आला आहे, असे केडीएमसीचे अभियंता प्रशांत भागवत यांचे सांगितले. (Street lights off in Kalyan Rural due to non-payment of bills)

इतर बातम्या

युट्युब चॅनेलद्वारे भोंदूगिरीचा प्रसार, नरबळीच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Kalyan Crime : उत्तर प्रदेशमधून गावठी कट्टा घेऊन आला अन् कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला