माळशेज घाटात भीषण अपघात, कार 100 फूट खोल दरीत कोसळून पेटली, महिलेचा मृत्यू

कल्याण अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

माळशेज घाटात भीषण अपघात, कार 100 फूट खोल दरीत कोसळून पेटली, महिलेचा मृत्यू
माळशेज घाटात कार अपघात
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 11:44 AM

ठाणे : माळशेज घाटात प्रवासी कार दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत कार संपूर्णपणे जळून खाक झाली.

नेमकं काय घडलं?

कल्याण अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

गाडी शंभर फूट खोल दरीत

रविवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणहून आंबेगावला निघालेल्या प्रवासी कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी शंभर फूट खोल दरीत कोसळली. यानंतर गाडीने पेट घेतला.

अपघातात कार जळून खाक

याच दरम्यान या महामार्गावरुन जाणाऱ्या औरंगाबादच्या ए टू झेड या अॅडव्हेंचर ग्रुपच्या मदतीने पोलिसांनी जखमींना खोल दरीतून बाहेर काढलं. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघातात कार जळून खाक झाली आहे.

संबंधित बातम्या :

नालासोपाऱ्यात 80 वर्षीय महिलेची हत्या, भाऊबीजेलाच वृद्धेला राहत्या घरी कोणी संपवलं?

CCTV | पाण्याच्या बहाण्याने वॉचमन घरात शिरला, वृद्धेला बांधून दरोडा, पाडव्याला उल्हासनगरात खळबळ

सेल्फीमुळे गेम फसला, कुणा कुणात झाली होती डील?; विजय पगारेंनी सांगितली आँखो देखी