Illegal Construction : कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, ठाणे महापालिकेची मोहिम

| Updated on: Jul 29, 2022 | 12:30 AM

कळवा प्रभाग समिती अंतर्गत 25 ते 27 जुलै या कालावधीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सोमवारी 25 जुलै रोजी कळवा येथील शास्त्रीनगर येथील बांधकामांचे स्लॅब तोडून तर खारीगांव येथील मयुर हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

Illegal Construction : कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, ठाणे महापालिकेची मोहिम
कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामां (Illegal Construction)वर धडक कारवाई (Action)ची मोहिम सुरु आहे. गेल्या तीन दिवसापासून कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Verma) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कळवा प्रभाग समिती अंतर्गत 25 ते 27 जुलै या कालावधीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सोमवारी 25 जुलै रोजी कळवा येथील शास्त्रीनगर येथील बांधकामांचे स्लॅब तोडून तर खारीगांव येथील मयुर हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

कुठे कुठे केली कारवाई ?

गावदेवी मंदिराशेजारील बांधकामावर मंगळवार 26 जुलै रोजी स्लॅब कापून जेसीबीसह तोड कारवाई करण्यात आली. गावदेवी मंदिर रोडवरील बांधकामाचे स्लॅब व अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. गावदेवी, कळवा परिसरातील बांधकामावर स्लॅब कापून जेसीबीसह कारवाई करण्यात आली. भुसार आळी, कळवा येथील बांधकामाचे ब्रेकरसह स्लॅप कापून कारवाई करण्यात आली. कुंभार आळी येथील बांधकामाचे कॉलमसह अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले तसेच भास्कर नगर, कळवा येथील अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या. बुधवार 27 जुलै रोजी कळवा मच्छी मार्केट येथील बांधकाम तोडण्यात आले. तसेच कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे 4 कॉलम कापून व अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. सदर दोन्ही कारवाया 30 लेबर, 1 जेसीबी व 1 गॅस कटर च्या साहाय्याने करण्यात आली.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ-1 मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली. (Thane Municipal Corporation’s crackdown on unauthorized constructions in Kalwa)

हे सुद्धा वाचा