ठाण्यातील शहापूरमध्ये दोन दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का, नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: Dec 04, 2021 | 6:38 AM

राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. 32 जिल्ह्यांमध्ये नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

ठाण्यातील शहापूरमध्ये दोन दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का, नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
Follow us on

सुनील घरत, शहापूर, टीव्ही 9 मराठी, ठाणे: राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. 32 जिल्ह्यांमध्ये नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूरमध्ये (Shahapur) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील शिवसेनेला (Shivsena) दोन दिवसात दुसरा धक्का बसला आहे. दोन विद्यमान नगरसेवक, माजी सभापती, शेकडो शिवसैनिकांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानं शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार पडलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कमळ हाती

केंदीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे विद्यमान 2 नगरसेवक माजी सभापती, विभाग प्रमुख, अनेक नेतेमंडळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शहापूरमध्ये शिवसेनेला या निमित्तानं मोठा धक्का भसलाय.

सेनेच्या सुरेश म्हात्रेंच्या हाती घड्याळ

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी पक्षा मध्ये प्रवेश घेतल्याने ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलथापालथ

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलाय. शहापूर नगरपंचायतीच्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर शहरात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आनंद अधिकारी, विद्यमान नगरसेवक हरेश पष्ठे, माजी सभापती गजानन गोरे, वसंत अधिकारी , शेखर अधिकारी, पुरुषोत्तम भेरे, दत्तात्रय डिंगोरे, मनोज पानसरे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

नगरपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

अर्ज दाखल करणे: 1 ते 7 डिसेंबर
अर्जांची छाननी : 8 डिसेंबर
मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
निकाल : 22 डिसेंबर

इतर बातम्या:

Mpsc result : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला

Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाचा या 5 राशी परिणाम होणार, काळ कठीण असला तरी अनुभव मिळणार

Thane Shahapur Shivsena party workers join BJP in the presence of Union State Minister Kapil Patil