AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dahihandi 2026 : ठाण्यात संस्कृतीच्या दहीहंडीत लागले 9 थर, ते पाहून सूर्यकुमार यादव म्हणाला…

Dahihandi 2026 : टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी खास आलेला.त्यावेळी सूर्यकुमार यादवसमोर शिवगणेश गोविंदा पथकाने 9 थर रचले.

Dahihandi 2026 : ठाण्यात संस्कृतीच्या दहीहंडीत लागले 9 थर, ते पाहून सूर्यकुमार यादव म्हणाला...
suryakumar Yadav
| Updated on: Sep 05, 2026 | 4:09 PM
Share

ठाण्यात वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव खास या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी आलेला.त्यावेळी सूर्यकुमार यादवसमोर शिवगणेश गोविंदा पथकाने 9 थर रचले. हे नऊ थर पाहून सूर्यकुमार यादव सुद्धा भारावून गेला. संस्कृती प्रतिष्ठानच्या मैदानात सूर्यकुमार यादवला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती. एरवी क्रिकेट मैदानात व्यस्त असणाऱ्या सूर्यकुमार यादवने आज संधी आणि वेळ मिळाल्याने या उत्सवाचा आनंद घेतला. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याकडून इथे दही हंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं.

“प्रो गोविंदाला गेलो होतो. आज हे पाहून काही वेगळचं वाटलं. देसी स्पोर्ट्स आहे. जियो हॉटस्टॉर प्लॅटफॉर्म वेगळाच वाटला. इथे येऊन रिअल थर बघायला मिळताला, नेक्सट टाइम प्रो गोविंदाला अजून चांगलं करतील” असं सूर्यकुमार यादव मीडियाशी बोलताना म्हणाला. “वातावरणात फुल गरमागरमी आहे. एनर्जी, पॅशन भरपूर आहे. मला वाटतं जे बॅकिंग आणि प्लॅटफॉर्म प्रतापदादा, पूर्वेशदादांनी दिलय. मातीतला खेळ आहे. इतका चांगला प्लॅटफॉर्म दिलाय” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

इतिहास घडवायचा आहे

“क्रिकेटचं मैदान आवडलं की, गोविंदाचं. सध्या क्रिकेटमधून फ्री आहे, इथे आलोय तर बरं वाटतय” असं सूर्यकुमार यादव म्हणाला. प्रताप सरनाईक यांनी क्रिकेटर सूर्यकुमार यादव यांना मराठी मध्ये बोलण्याची विनंती केली. “प्रो गोविंद पहिला ना तुम्ही? हा देसी खेळ आहे विसरू नका. ऑलिम्पिक पर्यंत जायचे आहे, इतिहास घडवायचा आहे” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

श्रुती मराठे काय म्हणाली?

नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला अभिनेत्री श्रुती मराठेने भेट दिली. “मला आज आनंद वाटतोय. लहानपणीच्या काही आठवणी देखील जागृत झाल्यात. गोविंदाने काळजी घ्यावी” असं श्रुतीने आवाहन केलं.

संतोष जुवेकर काय म्हणाला?

“दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गर्दी बघा खूप आहे. उत्साहात दही हंडी साजरी होत आहे. सर्वांनी काळजी घ्यायची आहे, आपल्या सोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घ्याची आहे. गोविंदाची काळजी घ्यायची आहे. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यायची आहे. सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा” असं संतोष जुवेकर म्हणाला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?