VIDEO | अंबरनाथमध्ये दोन प्रवाशांसह निघालेल्या रिक्षावर झाड कोसळलं

| Updated on: Jul 21, 2021 | 12:40 PM

दोन्ही प्रवाशांना किरकोळ इजा झाली असून ते अपघातानंतर घरी निघून गेले. तर रिक्षा चालकाच्या पाठीत मुका मार लागला असून त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

VIDEO | अंबरनाथमध्ये दोन प्रवाशांसह निघालेल्या रिक्षावर झाड कोसळलं
अंबरनाथमध्ये रिक्षावर झाड कोसळून अपघात
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर याच पावसामुळे मंगळवारी दुपारी एका धावत्या रिक्षावर झाड पडले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात ही घटना घडली. लोकनगरी परिसरातील सिस्टर निवेदिता शाळेसमोर एका धावत्या रिक्षावर झाड कोसळले. ही घटना घडली त्यावेळी रिक्षेत चालकासह दोन प्रवासी होते. मात्र सुदैवानं यापैकी कुणालाही फारशी गंभीर इजा झाली नाही.

दोन्ही प्रवाशांना किरकोळ इजा झाली असून ते अपघातानंतर घरी निघून गेले. तर रिक्षा चालकाच्या पाठीत मुका मार लागला असून त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेनंतर अग्निशमन दल, तसंच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाड कोसळून रस्ता बंद झालेला असल्यामुळे अग्निशमन दलाने तातडीने झाडाच्या फांद्या कापून बाजूला केल्या. तसेच रिक्षा सुद्धा बाजूला करत रस्ता सुरू केला. तर पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन करत वाहतूक कोंडी होऊ दिली नाही.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अपघातानंतर बाईक पेटली, एक जागीच जळून खाक, दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू

Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू

झाडाची फांदी कोसळून मुंबईत बाईकस्वार पित्याचा मृत्यू, मुलगा बचावला

(Tree fell on Rickshaw travelling with two passengers at Ambernath City in Thane)