AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाडाची फांदी कोसळून मुंबईत बाईकस्वार पित्याचा मृत्यू, मुलगा बचावला

फांद्या कोसळल्याने जगराम प्रजापती यांनी बाईकवरील नियंत्रण गमावले आणि खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Bike Rider dies in Bhayander)

झाडाची फांदी कोसळून मुंबईत बाईकस्वार पित्याचा मृत्यू, मुलगा बचावला
भाईंदरमध्ये झाडाच्या फांद्या कोसळून बाईकस्वाराचा मृत्यू
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 08, 2021 | 12:56 PM
Share

भाईंदर : भाईंदरमध्ये झाडाच्या फांद्या कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत बाईकवर असलेला त्यांचा मुलगा सुदैवाने बचावला. भाईंदर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. (Bike Rider dies in Bhayander after tree falls on two wheeler)

41 वर्षीय जगराम प्रजापती हे भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ राहत होते. शनिवारी दुपारी ते भाईंदर रेल्वे स्टेशनकडे जात होते. त्यावेळी त्यांचा 18 वर्षीय मुलगा अमितही त्यांच्यासोबत बाईकने प्रवास करत होता. क्रॉस गार्डनजवळ अचानक झाडाच्या फांद्या त्यांच्या बाईकवर कोसळल्या.

जगराम प्रजापती यांचा जागीच मृत्यू

फांद्या कोसळल्याने जगराम यांनी बाईकवरील नियंत्रण गमावले आणि ते खाली पडले. या घटनेत जगराम प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकवरुन वेळीच उडी मारल्यामुळे मुलगा अमित प्रजापतीचा जीव वाचला. त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. प्रजापती पितापुत्राने अपघाताच्या वेळी हेल्मेट घातलं नसल्याचं बोललं जातं.

फांद्या कोसळण्याचं कारण अस्पष्ट

जगराम प्रजापती यांना मीरा रोडमधील इंदिरा गांधी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. पावसाळ्यात किंवा वादळी वारे वाहताना झाड कोसळून अपघात झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. मात्र अचानक झाडाची फांदी कोसळण्याचं कारण काय असावं, याचा शोध घेतला जात आहे.

वाहता रस्ता असल्यामुळे या अपघातापूर्वी भागातून अनेक पादचारी आणि वाहनेही गेली होती. परंतु प्रजापती यांच्यावर काळाने घाला घातला. जगराम प्रजापती हे पीओपीचे काम करत होते. कमवत्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने जगराम प्रजापती यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अमरावतीत बाईक पेटली

अपघातानंतर बाईकने पेट घेतल्याने दोघा दुचाकीस्वार युवकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी अमरावतीत समोर आली होती. अपघातात 15 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना 18 वर्षीय तरुणाने रस्त्यात प्राण सोडले होते. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा भागात हा अपघात घडला होता.

संबंधित बातम्या :

अपघातानंतर बाईक पेटली, एक जागीच जळून खाक, दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू

(Bike Rider dies in Bhayander after tree falls on two wheeler)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...