मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर घातला दरोडा; पळून जाताना सीसीटिव्हीत झाले कैद; 8 लाखाचा ऐवज लंपास

| Updated on: Sep 01, 2022 | 8:57 AM

उल्हासनगरमध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या पुजाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती. या घटनेतील दरोडेखोर पळून जाताना सीसीटीव्हीत कैद ) झाले आहेत.

मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर घातला दरोडा; पळून जाताना सीसीटिव्हीत झाले कैद; 8 लाखाचा ऐवज लंपास
Follow us on

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये मंदिराच्या (Ulhasnagar Temple) आवारात असलेल्या पुजाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती. या घटनेतील दरोडेखोर (robbery) पळून जाताना सीसीटीव्हीत कैद (Captured on CCTV) झाले आहेत. दरोडेखोर पळून जातानाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने तपास होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या फुटेजच्या आधारेच दरोडेखोरांचा शोध घतेला जाणार असून या दरोडेखोरांनी आणखी कुठे दरोडा टाकला आहे का याचाही शोध घेतला जाणार आहे. या दरोड्यात 8 लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. उल्हासनगरच्या श्रीराम चौकात स्वामी डामाराम साहिब दरबार हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात राहणाऱ्या पुजारी जॅकी जग्यासी यांच्या घरावर 30 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास 6 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता.

 

सोनं आणि रोख रक्कम असा तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लुटला होता. हे दरोडेखोर दरोडा टाकून पळून जातानाचे एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

कारमधून गेले आहेत पळून

यामध्ये ग्रे कलरच्या इको गाडीतून हे दरोडेखोर पळून गेल्याचं पाहायला मिळत आहे. या फुटेजच्या आधारे आता दरोडेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

पोलिसांनी गस्त वाढवावी

गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. जॅकी जग्यासी यांच्या घरावर दरोडा पडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. जॅकी जग्यासी यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिनेही चोरट्यांनी लांबवले आहेत. त्यामुळे दरोडेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.