अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सर्वात मोठी अपडेट, ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर

28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, दरम्यान आता या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सर्वात मोठी अपडेट, ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर
Ajit Pawars plane crash
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 9:46 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांचं विमान 28 जानेवारी रोजी मुंबईवरून बारामतीला यायला निघालं होतं. परंतु बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनिला धडकल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला भीषण आग लागली. दरम्यान या अपघाताबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. काही जणांकडून तर विमान अपघात प्रकरणात घातपाताचा देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे, दरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

दरम्यान आता या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा ज्या विमानामुळे अपघात झाला, त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आधी ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती,  त्यानंतर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याबाबतची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AIB चे अधिकारी के. रामचंद्र यांनी 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजता या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केली होती. इतकेच नाही, तर बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याची आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अशी देखील एक माहिती समोर आली होती की हा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला आहे, त्यामुळे यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवण्यात येणार आहे. मात्र आता ही नवी माहिती समोर आली आहे.