चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंगळवारी वरोरा तालुक्यातील अर्जुनी शेतशिवारात घडली असून, देवराव जीवतोडे (58) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून वनविभागाचं पथकही घटना स्थळी दाखल झालं होत. मृत शेतकरी देवराव जीवतोडे (58) पिकांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या शेतात रात्रभर उंचावर बांधलेल्या …

, चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंगळवारी वरोरा तालुक्यातील अर्जुनी शेतशिवारात घडली असून, देवराव जीवतोडे (58) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून वनविभागाचं पथकही घटना स्थळी दाखल झालं होत.
मृत शेतकरी देवराव जीवतोडे (58) पिकांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या शेतात रात्रभर उंचावर बांधलेल्या मचाणीवर बसला होता. सकाळी मचाणीवरून खाली उतरताच झुडुपात असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करत ठार केले. वेळेत घरी परत न आल्याने शेतकऱ्याचे कुटुंबीय शिवारात पोहोचले मात्र पोहचल्यावर त्यांना धक्काच बसला. या घटनेने पीक राखणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
याच परिसरात 4 नोव्हेंबर रोजी तुळसाबाई केदार (62) आणि दुसऱ्या दिवशी विकास हनवते (6) याच्यांवरही वाघाने हल्ला करत त्यांना जखमी केले होते.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या बफर क्षेत्रात असलेल्या या गावात आता मोठी दहशत पसरली असून स्थानिक आक्रमक पवित्र्यात आहेत. परिस्थितीवर नियंत्रणासाठी दंगल नियंत्रण पथकाच्या चमूला गावात तैनात करण्यात आला असून अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करून यातून मार्ग काढत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *