Ahmednagar : ठरलं तर मग, 23 मे रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा, पुणतंब्याच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

| Updated on: May 19, 2022 | 1:06 PM

23 मे रोजी होणाऱ्या या ग्रामसभेत राज्याला शेतकरी आंदोलनाची दिशा देणारी सभा होणार आहे. यंदा तर शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले अशून हमीभाव आणि खत, बी-बियाणांचा पुरवठा याबाबत अधिक प्रश्न उपस्थित केले जातील असा अंदाज आहे. 23 मे रोजी विरोधक, सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे.

Ahmednagar : ठरलं तर मग, 23 मे रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा, पुणतंब्याच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
शेतकरी आंदोलनाच्या अनुशंगाने पुणतांबा येथे बैठक पार पडली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अहमदनगर : शेतकऱ्यांसमोर आता एक ना अनेक प्रश्न उभा आहेत. उत्पादकतेपासून ते बाजारपेठेपर्यंत प्रत्येक बाबीसाठी शेतकऱ्यांना संघर्ष हा करावाच लागत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी (Farmers’ Movement) शेतकरी आंदोलनाची दिशा ही जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा गावात ठरविली जाते. पक्षातील मतभेद बाजूला सारुन सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येतात. 23 मे रोजी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे 2017 सालच्या (Farmer) शेतकरी संपाची हाक याच पुणतांबा गावातून देण्यात आली होती. म्हणून येथील ग्रामसभेत ठरणाऱ्या आंदोलनाला विशेष महत्व आहे.

विशेष ग्रामसभेचे आयोजन

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे शेतकरी आंदोलनाची दिशा ठरली जाते. याबाब निर्णय काय घ्यायचा, शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नांचा त्यामध्ये समावेश असावा, नेमके कोणत्या अनुशंगाने आंदोलन पार पडणार याबाबत पुणतांबा येथे बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये आंदोलनाचे स्वरुप आणि शेतऱ्यांचे महत्वाचे प्रश्न घेऊन 23 मे रोजी ग्रामसभा होणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या अनुशंगानेच गुरुवारी पार पडलेली बैठक महत्वाची होती.

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा समावेश

केवळ पुणतांबा किंवा नगर जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांचे नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत यावर दिशा ठरली जाते. 2017 साली शेतकरी संपाची हाक ही पुणतांब्यातूनच देण्यात आली होती. तेव्हापासून या जागेला ऐतिहासिक महत्व आले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नानाला वाचा फोडण्यासाठी याच गावातील बैठक महत्वाची समजली जाते. शिवाय शेतकऱ्यांच्या समस्यांवर कोणीतरी आवाज उठवतंय यावरही शेतकरी आंदोनामध्ये सहभागी होतात.

हे सुद्धा वाचा

मतभेद बाजूला सारुन सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग

पुणतांबा या गावात आंदोलनाला ठरलेल्या दिशेला वेगळे महत्व आहे. या दरम्यान गावातील सर्व मंडळी उपस्थित राहतात तर राजकारण बाजूला सारुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होते. त्यानुसार आंदोलनाची सुरवात, सर्वसामान्यांना त्याचा त्रास होऊ नये असे मुद्दे ठरवून सबंध गावातील यंत्रणा ही कामाला लागते.