16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

| Updated on: Oct 31, 2022 | 8:01 PM

विधानसभेत बैठकीत राजकीय प्रतोदाचं न ऐकता उल्लंघन केलं असेल, तर तो अपात्र समजला जातो.

16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
उज्ज्वल निकम
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी होणं अपेक्षित आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. उद्याच्या सुनावणीदरम्यान काय होऊ शकतं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यासंदर्भात माजी सरन्यायधीश रमन्ना यांनी घटनापीठाकडं काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. परिशिष्ट दहाच्या नुसार आमदारांना अपात्र ठरविले जाते.त्यासंदर्भातल्या काही तरतुदींचं स्पष्टीकरण घटनापीठाकडं अपेक्षित आहे. लोकशाही सुरळीत चालण्यासाठी घटनेत परिशिष्ट दहा नमूद केले आहे.

निवडून आलेला एखादा आमदार केव्हा अपात्र होऊ शकतो. यासंदर्भात क्लाज टू मध्ये तरतुदी आहेत. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एखाद्या आमदारानं स्वतःहून त्या पक्षाचं सभासदत्व सोडलं असेल तर तो आपोआप अपात्र होतो.

विधानसभेत बैठकीत राजकीय प्रतोदाचं न ऐकता उल्लंघन केलं असेल, तर तो अपात्र समजला जातो. असे दोनचं क्लाजेस आहेत. यात रमन्ना यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आपआपला युक्तिवाद केला जाईल. क्लाज सहामध्ये स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार,विधानसभेच्या अध्यक्षांना अपात्र करण्याचा अधिकार असतो, असं निकम यांनी सांगितलं.

दोन्ही बाजूनं प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. त्यावर निवडणूक आयोगं शंकेच्या नजरेनं पाहत आहे. सर्वोच्च न्यायालय डायरेक्ट निर्णय देऊ शकणार नाही. कारण उद्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. परंतु, हा गुंता तिथं सुटेल की नाही, हे काही सांगता येत नाही, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
.