Prakash Ambedkar : जे धर्माला पाहून मतदान करतात त्यांना प्रकाश आंबेडकरांनी विचारला एक प्रश्न, तुम्ही किंवा तुमचं कुटुंब…
Prakash Ambedkar : "सुप्रिया सुळे यांनी आमच्या पुण्याच्या शहराध्यक्षांना फोन केला होता. आज ते बैठकीसाठी बसणार आहेत. त्यानंतर पुढील गोष्टी ठरतील. भाजप सोडून इतरांसोबत आम्ही जायला तयार आहोत" असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.

“जे धर्माला पाहून मतदान करतात, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करणार आहात का?. तुम्ही जर धर्मांतर करणार नसाल तर मग आरएसएस, बीजेपीचा जो मुद्दा आहे तो खरा आहे का?. लोकशाहीला हुकूमशाहीत परवर्तीत करण्याची प्रक्रिया भाजप, आरएसएसनें सुरु केली” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर यांनी केली. “आम्ही इमर्जन्सी भोगली आहे. तुम्ही ती पाहिलेली नाही. राहुल गांधी हे एपस्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का? याबाबत प्रश्न विचारत नाहीत. पेगेसीस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही. ईडी, सीबीआयचा सेसेमीरा विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे कोणताही विरोधी पक्षनेता बोलायला तयार नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“देशाच्या स्वातंत्र्यानंतर तीन दलाचे प्रमुख पत्रकार परिषद घेत आहेत. पंतप्रधान म्हणतात चायना आपला मित्र तर त्यानंतर लष्कर प्रमुख म्हणतात चायना नंबर एकचा शत्रू आहे. याचा अर्थ कुठेतरी धोक्याची घंटा आहे. कारण ब्युरोक्रसी आणि सरकार यांच्या विधानात विरोधाभास आहे” याकडे प्रकाश आंबडेकर यांनी लक्ष वेधलं. “भाजपने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासोबत बोलणी सुरु केली नाहीत. त्यामुळे अजित पवार गटाने इतर पक्षांसोबत बोलणी सुरु केलीय. आम्ही कोणाला प्राधान्य देत नाही, मात्र जे आमच्यासोबत बसतील ते आमचे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबईत काँग्रेस सोबत जाणार का?
“मी तोंड उघडले नाही, मी जर तोंड उघडले तर काँग्रेसला देशात फटका बसेल. काँग्रेसला फटका बसला की भाजपला याचा फायदा होतो. त्यामुळे मी काँग्रेसच्या गोष्टी आम्ही गुलदस्त्यात ठेवतो. मुंबईत काँग्रेस सोबत जायचे की नाही याबाबत आम्ही अजून भूमिका घेतलेली नाही. तुम्ही सहयोगी पक्षाला सन्मान दिला पाहिजे. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. आम्ही शिजवलेले तुम्ही आयते खायला लागलात तर आम्ही कसे देऊ” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“ईव्हीएम मध्ये 10 टक्के घोळ आहे. म्हणून माझी याचिका कोर्टाला घेऊन फेटाळावी लागली. अनेक्चर 44 आणि 54 याबाबत इलेक्शन कमिशनने कोणताही खुलासा केलेला नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ईव्हीएम सेट करणारा व्यक्ती येतो
“सोलापूरच्या निवडणूक अधिकाऱ्याने 2019 च्या निवडणुकीनंतर कोर्टासमोर सांगितले की, ईव्हीएम सेट करणारा व्यक्ती येतो आणि तो काय करतो ते आम्हाला माहिती नसते. केवळ कागदावर सही करतो” असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केसा.
