तब्बल एक तास लोकल विक्रोळी आणि घाटकोपरच्या मध्ये थांबली; मोबाईलचे नेटवर्क गायब झाल्याने प्रवासी संतापले

| Updated on: Sep 08, 2022 | 10:11 PM

ऐन गर्दीत लोकलचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवासी त्रस्त झाले. त्यातच लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा. त्यातच मोबाईलचे नेटवर्क गायब झाल्याने प्रवासी चांगलेच संतापले.

तब्बल एक तास लोकल विक्रोळी आणि घाटकोपरच्या मध्ये थांबली; मोबाईलचे नेटवर्क गायब झाल्याने प्रवासी संतापले
Follow us on

मुंबई : मुसळधार पावसाचा(heavy rain) जबरदस्त फटका मुंबईकरांना बसला आहे. विशेषतः लोकलने प्रवास करणाऱ्यांना पावसामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर(Ghatkopar) आणि विक्रोळी(Vikhroli ) दरम्यान लोकल तासभर थांबल्या होत्या. त्यातच मोबाईलचे नेटवर्क गायब झाल्याने प्रवासी चांगलेच संतापले.

मुंबईत संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच जोरदार पाऊस पडत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण, कसारा आणि कर्जत कडे जाणाऱ्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाला.

मध्य रेल्वे वरील जवळपास सर्वच स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. अनेक लोकल रेल्वे रुळांवरच थांबल्या होत्या.

विक्रोळी आणि मुलूंड स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक वर पाणी भरल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. घाटकोपर आणि विक्रोळी स्थानका दरम्यान लोकल तब्बल तासभर थांबल्या होत्या.

ऐन गर्दीत लोकलचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवासी त्रस्त झाले. त्यातच लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा. त्यातच मोबाईलचे नेटवर्क गायब झाल्याने प्रवासी चांगलेच संतापले. लोकल कधी सुरू होईल या चिंतेत असतानाच मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने कुटुंबीयांशी संपर्क साधायचा कसा असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली. लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सीएसएमटी, करी रोड स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
लोकल उशीरा धावत असल्याने लाखो प्रवासी अडकून पडले आहेत.