Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना आणखी एक मोठा दणका, आता हॉस्पिटलमधून थेट जेलमध्ये? अडचणी वाढल्या
एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे, या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे, एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे, शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून माणिकराव कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता हाय कोर्टानं देखील कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे. हाय कोर्टानं या प्रकरणात तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ही येत्या शुक्रवारी होणार आहे. शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून माणिकराव कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती, मात्र हाय कोर्टानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला असून, आता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं हाय कोर्टात?
एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून माणिकराव कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती, मात्र कोर्टानं आता या प्रकरणात तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी घेण्याची तयारी हाय कोर्टाकडून दर्शवण्यात आली आहे. सध्या माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात असल्याची माहिती समोर येत आहे, हाय कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे आता कोकाटे यांची अटक अटळ मानली जात आहे. नाशिक पोलिस अटक वॉरंट घेऊन मुंबईला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम यांनी सुनावणी होईपर्यंत अटकेपासून न्यायालयात सरक्षण मागितले नाही, त्यामुळे आता नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार कोकाटे यांच्यावर कारवाईची दाट शक्यता आहे. हाय कोर्टात अटकेपासून संरक्षणाची मागणी न करण्यात आल्यानं, कोर्टाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी देखील धोक्यात आली आहे, कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
