Examination : उन्हाळी सुट्टी लांबणीवर!, एप्रिलअखेर होणार परीक्षा

| Updated on: Mar 29, 2022 | 11:58 AM

एप्रिल अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे. उन्हाळी सुट्टी मे आणि जूनमध्ये असणार आहे.

Examination : उन्हाळी सुट्टी लांबणीवर!, एप्रिलअखेर होणार परीक्षा
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Student) महत्त्वाची बातमी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिलअखेर होणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे. तर उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली नसून त्या सुट्ट्या मे आणि जूनमध्ये असणार आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम पुर्ण झाला नाही त्याच शाळा सुरू राहतील, असंही मांढरे यावेळी म्हणालेत. यंदा वार्षिक परीक्षा (Examination) एप्रिलअखेर होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे (corona) विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना रविवारी देण्यात येणारी आठवडी सुटी आणि शनिवारची हाफ सुटी देखील रद्द करण्यात आली आहे. रविवारी ज्या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्याची इच्छा असेल ते विद्यार्थी वर्गात बसू शकतात असे सांगण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टी लांबणीवर

उन वाढलं की विद्यार्थ्यांना मामाच्या घरी जाण्याची, गावी जाण्याची ओढ सुरू होते. मात्र, एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरु राहणार असल्यानं मे आणि जूनमध्ये विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या आणखी लांबणीवर पडल्या आहेत.

एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरूच

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत आणि शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.  त्यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत 100 टक्के उपस्थितीसह विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहणार असल्याचं पत्रकात म्हटलं होतं. साधारणपणे मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची केवळ सकाळच्या सत्रात शाळा भरवली जाते. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागानं त्यावेळी म्हटलं होतं.  या काळात विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीसह शाळा सुरू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच शनिवार आणि रविवारी देखील पूर्ण वेळ शाळा भरेल. ज्या विद्यार्थ्यांना रिविवारी शाळेत यायचे आहे, ते रिविवारी देखील शाळेत येऊ शकतात असे त्या आदेशात म्हटलं होतं.

निकालही लांबणीवर

काळात विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यावर भर देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होतील. तसेच निकाल मे महिन्यात जाहीर केला जाईल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होत नाही, मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.

इतर बातम्या

धक्कादायक | परीक्षा सुरु असतानाच दहावीच्या विद्यार्थीचा मृत्यू, Beed मध्ये खळबळ, हत्या की आत्महत्या

Karisma Kapoor photo : करिश्मा कपूरने घातला फुलाफुलांचा ड्रेस, नेटकरी म्हणतात “हा तर लहान मुलीचा ड्रेस!”

VIDEO | नाग पकडून Stunt बाजी, सांगलीच्या तरुणाची मस्ती, Viral Video मुळे कारवाई