सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती सोळा वर्षांची होत. सृष्टीची दहावीची परीक्षा सुरु होती. ती बीडमधील छत्रपती कॉलनीत वास्तव्यास होती. मात्र सोमवारी रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आडलला. नातेवाईकांन पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सृष्टीचा मृतदेह काढण्यात आला आणि पुढे शवविच्छेदनासाठी देण्यात आला. शिवाजी नगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, सृष्टीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सृष्टीचा मोबाइल जप्त केला असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या-