टीचर डाक लाया ! मोबाईलच्या जमान्यातही पत्र पाठवणारा शिक्षक

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची धुमाळी सुरू असताना हा अनोखा पत्रलेखक शिक्षक उमेदवार मतदारांना पत्रं लिहून आकृष्ट करीत आहे. दरवर्षी नेमाने सत्तर हजार पत्रं लिहीणाऱ्या या उमेदवाराची चर्चा सुरू आहे.

टीचर डाक लाया ! मोबाईलच्या जमान्यातही पत्र पाठवणारा शिक्षक
dongardevImage Credit source: dongardev
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 4:32 PM

गजानन उमाटे, Tv9 मराठी, नागपूर : मोबाईलच्या जमान्यात हल्ली पत्र लिहीण्याचा प्रघात जवळपास बंदच झाला आहे. कारण इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यात जग इतके जवळ आले आहे की पत्र लिहायला आणि वाचायला हल्ली कोणाला सवडच मिळत नाही ! अशा परिस्थितीत नागपूर शिक्षक मतदार संघातील निवडणूकीत उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराने मात्र पत्र लिहिण्यात विक्रमच केला आहे. आजच्या जमान्यातही ते आवडीने प्रत्येक मित्राला त्याच्या वाढदिवसाला पत्र पाठवून खास शुभेच्छा देत असतात. कोण आहेत हे अनोखे पत्रलेखक पाहूया..

अभिनेता राजेश खन्नाचे यांचे डाकीया डाक लाया, डाकीया डाक लाया हे गीत तुम्हाला ठावूकच असेल. निदान या गाण्यातून पोस्टमन काका अशी पत्रं दारात टाकायला यायचे हे हल्लीच्या नव्या टीनेएजर पिढीला माहिती पडत असेल. कारण हल्ली एकमेकांची ख्यालीखुशाली एका मोबाईल फोनवर मिनिटात कळते. त्यामुळे चिठ्ठी, आंतरदेशीय तसेच पोस्ट कार्ड या गोष्टींपासून हल्लीची पिढी अनभिज्ञ आहे. अशात नागपूरच्या शिक्षण मतदार संघात एका उमेदवाराचे पत्रं सर्वांना हवेहवेसे आहे. कशा प्रकारे त्यांनी पत्रांद्वारेच आपला प्रचार सुरू केला आहे. हे पाहणे मजेशीर ठरत आहे. त्यांच्याकडे सर्वजण उत्सुकतेने पाहात असतात, ज्यावेळी ते मार्करने आपल्या प्रचाराची पत्रके लिहित असतात. त्यांचे नाव आहे रविंद्र डोंंगरदेव…

डोंगरदेव हे शिक्षक आजच्या युगातही सर्वांना न चुकता पत्रं पाठवित असतात. आणि पत्रांद्वारे त्यांचा जनसंपर्क इतका वाढला आहे की ते आता त्यांच्या निवडणूकीचा प्रचारही पत्रांद्वारेच करीत आहेत. टीव्ही नाइनच्या प्रतिनिधीने त्यांना बोलतं केले. तेव्हा ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून मला पत्र लिहून लोकांना पाठविण्याचा छंदच जडला आहे. आपला पत्र परीवार खूप मोठा असल्याचे ते सांगतात. आपण दरवर्षी नेमाने सत्तर हजार पत्रं पाठवतो असे त्यांनी सांगितले.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची धुमाळी सुरू असताना हा अनोखा पत्रलेखक शिक्षक उमेदवार मतदारांना पत्रं लिहून आकृष्ट करीत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपण गेल्या सहा वर्षांपासून पत्र लिहीत असून आपल्याला आता  “पत्रवाला डोंगरदेव” असेच नाव पडल्याचे ते कौतूकाने सांगतात. या निवडणूकीचा प्रचार आपण पत्र लिहून करीत आहोत. माझ्या शिक्षक आणि मित्रांच्या जन्मतारखा मला पाठ असल्यामुळे आपण त्यांना दर वाढदिवसाला पत्रं लिहून शुभेच्छा देत असतो. तसेच सणासुदीच्या शुभेच्छाही पत्र लिहून देतो असेही डोंगरदेव यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.