AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषदेसाठी 12 जण ठरले, पवार-ठाकरेंकडे नावं गुप्त : अनिल देशमुख

खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार आहे, अशी आवई उठवली जात आहे.

विधान परिषदेसाठी 12 जण ठरले, पवार-ठाकरेंकडे नावं गुप्त : अनिल देशमुख
| Edited By: | Updated on: Nov 01, 2020 | 4:44 PM
Share

जळगाव : अमळनेर विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नाव ठरली आहेत. परंतु, ती गुपित आहेत ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्य वेळ आली की ती नावे आम्ही जाहीर करू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. (There are 12 candidates for the Legislative Council names are secret with Pawar Thackeray said by Anil Deshmukh)

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते. या कार्यक्रमाआधी पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजीमंत्री इतर माजी आमदार खासदार आदी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख पुढे म्हणाले, विधान परिषदेवर 12 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार आहे, अशी आवई उठवली जात आहे. आपल्या पक्षाची पडझड रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची टीकाही अनिल देशमुख यांनी यावेळी केली. (There are 12 candidates for the Legislative Council names are secret with Pawar Thackeray said by Anil Deshmukh)

पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंत्रिमंडळाने 2 हजार 528 पदांना मंजुरी दिली आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू होती. तेव्हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे 13 टक्के आरक्षणाचा मुद्दा सोडून लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.

इतर बातम्या –

विवाहित प्रियकराकडून प्रेयसीचा खून, हत्येच्या थरारानं चंद्रपूरमध्ये खळबळ

केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावरचे नागोबा, राणेंवरील केसरकरांच्या टीकेला भाजपचे उत्तर

(There are 12 candidates for the Legislative Council names are secret with Pawar Thackeray said by Anil Deshmukh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.