
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, काही मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. यामुळे मोठी वाहतूककोडीं झाल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठी वाहतूककोडीं झाल्याचे सध्या बघायला मिळत आहे. आंदोलकांनी पूर्ण रस्ता चाम केला आहे.
मराठा आंदोलकांचा मुख्य रस्त्यावर ठिय्या
सलग दुसऱ्या दिवशी ही ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या अमरन उपोषणाचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रभरातून हजारो मराठा समर्थक मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत. मुंबईत येणाऱ्या मुख्य ईस्टर्न फ्री वे महामार्गावर वडाळा–सीएसएमटी दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सकाळपासून वाहने रांगेत आहेत, वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगाच रागा
आंदोलनात सहभागी समर्थक राहण्याची व खाण्याची व्यवस्था करत मोठ मोठे ट्रक आणि वाहने मुंबईच्या दिशेने आणत असल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली. पार्किंग मिळत नसल्याने महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी वाहने पार्क केल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूकीवर परिणाम होत असून जाम झाले. मुंबईतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस कार्यरत आहेत.
मुंबईकर अडकून पडले वाहतूककोडींत
मात्र, पहाटेच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या चाकरमानी आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नाराजी बघायला मिळत आहेत. कितीतरी तास वाहनचालकांना एकाच ठिकाणी अडकून बसावे लागत आहे. शासनाकडून उपोषणावर तोडगा काढत वाहतूककोंडीमधून सुटका करण्याची मागणी आता केली जात आहे. ईस्टर्न फ्री वे महामार्गावर काही तासांपासून वाहनांच्या मोठ्या रांगा या बघायला मिळत आहेत. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी प्रयत्न केली जात आहेत.