'म्हाडा'च्या लॉटरीनंतर अध्यक्षांना जीवे मारण्याच्या धमक्या

मुंबई : बिल्डर आणि समाजकंटकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना लिहिले आहे. माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे. गेल्या तीन महिन्यापासून उदय सामंत म्हाडाचा कारभार सांभाळत आहे “माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांकडून …

'म्हाडा'च्या लॉटरीनंतर अध्यक्षांना जीवे मारण्याच्या धमक्या

मुंबई : बिल्डर आणि समाजकंटकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना लिहिले आहे. माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे. गेल्या तीन महिन्यापासून उदय सामंत म्हाडाचा कारभार सांभाळत आहे

“माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांकडून धोका आहे. माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. विकासकांच्या विरोधात निर्णय घेतल्यानं माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.”, असे उदय सामतं यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

म्हाडामध्ये आम्ही ज्याप्रकारे निर्णय घेतो, दलालांची लॉबी खोडुन काढतो, जनतेला त्रास देणाऱ्या विकसकाकडून नियमात काम करून घेतो, अशा लोकांकडून मला धोका निर्माण होऊ शकतो.  यासंबंधी काही विकासकाकडून मला धमकी आल्याचे पत्र मुंबई पोलिसांना पाठवले आहे. तसेच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. मात्र कुणाकडून ही धमकी आली मी त्याचे नाव घेणार नाही, असंही यावेळी सामंत म्हणालेत.

‘म्हाडा’च्या लॉटरीनंतर अध्यक्षांना जीवे मारण्याच्या धमक्या

मुंबई : बिल्डर आणि समाजकंटकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना लिहिले आहे. माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे. गेल्या तीन महिन्यापासून उदय सामंत म्हाडाचा कारभार सांभाळत आहे

“माझ्या जीवाला विकासक आणि समाजकंटकांकडून धोका आहे. माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. विकासकांच्या विरोधात निर्णय घेतल्यानं माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.”, असे उदय सामतं यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोण आहेत उदय सामंत?

आमदार उदय सामंत हे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते आहेत. आतापर्यंत 2004, 2009 आणि 2014 अशा तीनवेळा उदय सामंत आमदार म्हणून निवडून आले आहेत. उदय सामंत हे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तेव्हा आघाडी सरकारच्या काळात शहर विकास मंत्रालयाचे ते राज्यमंत्री होते. तसेच, रत्नागिरीचं पालकमंत्रिपदही त्यांनी भूषवलं आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सामंत यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. सेनेचे ‘उपनेते’ असलेले उदय सामंत यांची काही महिन्यांपूर्वीच म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

कोकणातील अभ्यासू राजकारणी आणि शिवसेनेतील सुशिक्षित नेता म्हणून उदय सामंत यांची ओळख आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *