Nashik| नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी 3 मंत्र्यांनी ठोकला तळ

नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने चोख तयारी केली आहे.

Nashik| नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी 3 मंत्र्यांनी ठोकला तळ
मंत्री छगन भुजबळ यांच्या सभांचा विदर्भात धडाका सुरू आहे.
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:31 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या 6 नगरपंचायत निवडणुकीसाठी 3 मंत्र्यांनी तळ ठोकला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यात प्रचाराची राळ उडवली आहे. नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ओबीसी राखीव असणाऱ्या 11 जागांवर आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक होत असल्याने मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने चोख तयारी केली आहे.

या मंत्र्यांच्या सभा

नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतींची निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी तीन मंत्री रिंगणात उतरले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सुरगाणा येथे तळ ठोकून आहेत. कृषिमंत्री दादा भुसे हे पुढील तीन दिवस सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुका पिंजून काढणार आहेत. या भागात त्यांच्या रॅली आणि सभा होणार आहेत. सोबतच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे या काळात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफही नाशिकमध्ये असणार आहेत. एका विवाह सोहळ्यासाठी ते नाशिकला येणार आहेत.

भुजबळ विदर्भात

नाशिक जिल्ह्याची मुलखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मात्र सध्या विदर्भात प्रचार करण्यात गुंतले आहेत. भंडारा जिल्ह्यातील कारधा, लाखनी आणि साकोली येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ते प्रचारसभा घेत आहेत.

21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

नाशिक जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार निफाड, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा व दिंडोरी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. यादिवशी सदर नगरपंचायतीच्या क्षेत्रातील मतदानासाठी स्थानिक क्षेत्रात पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने यांना 21 डिसेंबर 2021 रोजीची सुट्टी लागू रहाणार आहे.

दोन तासांची सवलत

अपवादात्मक परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ,दिंडोरी, सुरगाणा, कळवण व देवळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Nashik| नाशिकमध्ये 6 नगरपंचायतीतील 11 OBC राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात; 19 जानेवारीला होणार मतमोजणी

Nashik | नाशिक सिटीझन फोरमचे कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार जाहीर; बडगुजर, गिते, पगारे यांचा होणार गौरव

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.