Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
दिल्ली ते मुंबई 12 तासात- नितीन गडकरी

नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी आडगाव-म्हसरूळ भागात 64 एकर जागा शोधण्यात येत आहे. त्यात 50 एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 18, 2021 | 10:41 AM

नाशिकः नाशिकमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क साकारणार असल्याची घोषणा अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत केली आहे. नाशिकसोबतच मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि दिघी बंद येथेही हे पार्क साकारले जाणार आहे. नितीन गडकरी ऑक्टोबर महिन्यात नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळेसच त्यांनी या पार्कबाबतचे सूतोवाच केले होते. महापालिकेने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला तर मदत करण्याची ग्वाही दिली होती.

लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय?

लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात. लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. त्यामुळे शहरांचे प्रदूषणही कमी होण्यास मदत मिळणार आहे.

आडगाव-म्हसरूळमध्ये जागा

नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी आडगाव-म्हसरूळ भागात जागेचा शोध सुरू आहे. या भागात एकूण 64 एकर जागा शोधण्यात येत आहे. त्यात 50 एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार आहे. विशेषतः सुरत-चेन्नई महामार्गालगत ट्रक टर्मिनिलसाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी मिळकत व नगररचना विभागाने जागा देण्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या जागेचा शोध संपल्यानंतर हे काम मार्गी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घोषणांचे बार

नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजपकडे अजूनही दोन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. ते पाहता याचा फायदा घेण्यासाठी भाजपने पुरता जोर लावला असून, निवडणुकीच्या तोंडावर जंबो नोकर भरती करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर केला. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवरच आयटी हब साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी महापौरांनी दिंडोरी येथील जागेसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याबाबतच्या अडचणी पाहता आता शहरातीलच एका महापालिकेच्या जागेवर आयटी हब उभारण्यात येणार आहे. त्यानंतर आता लॉजिस्टीक पार्कचही मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. याचा नक्कीच भाजपला फायदा होणार आहे.

इतर बातम्याः

Nashik | नाशिक सिटीझन फोरमचे कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार जाहीर; बडगुजर, गिते, पगारे यांचा होणार गौरव

Nashik| नाशिकमध्ये 6 नगरपंचायतीतील 11 OBC राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात; 19 जानेवारीला होणार मतमोजणी

Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें