वाघाच्या हल्ल्यात डोळा गमावला, तरीही झुंज देऊन वाघाला पळवलं, चंद्रपुरात थरार

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका ग्रामस्थावर वाघाने (Tiger Attack On Person Chandrapur) हल्ला केला.

वाघाच्या हल्ल्यात डोळा गमावला, तरीही झुंज देऊन वाघाला पळवलं, चंद्रपुरात थरार
Follow us
| Updated on: May 13, 2020 | 8:25 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका ग्रामस्थावर वाघाने (Tiger Attack On Person Chandrapur) हल्ला केला. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला चढवला. या हल्ल्यात विलास कोपोडे हे गंभीर जखमी झाले. वाघाच्या हल्ल्यात कोपोडे यांना  आपला डोळा गमवावा लागला. मात्र तरीही जखमी अवस्थेत त्यांनी वाघाला झुंज देऊन पळवून लावले. दरम्यान सध्या त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात ग्रामस्थ (Tiger Attack On Person Chandrapur) जबर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. सिंदेवाही जवळ नवरगाव राऊंडतंर्गत मिनघरी जंगलात घोडाझरी कालव्याजवळ तेंदूपत्ता तोडण्यास गेलेल्या विलास कोपोडे यांच्यावर वाघाने हल्ला केला.

या हल्ल्यात विलास यांनी आपला डोळा गमावला. मात्र तरीही झुंज देत या धाडसी ग्रामस्थाने हा हल्ला परतवून लावला. विलास यांच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूला तेंदूपाने तोडणाऱ्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

त्यानंतर तातडीने या ग्रामस्थाला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तेंदूपाने तोडणीचा हंगाम सुरु आहे. या काळात सकाळी 4 पासून ग्रामस्थ जंगलात जात असतात. मात्र यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या ग्रामस्थाला योग्य ती नुकसान भरपाई देत या भागात बंदोबस्त वाढवला (Tiger Attack On Person Chandrapur) आहे.

संबंधित बातम्या : 

मरीन ड्राईव्हवर भीषण कार अपघात, बड्या उद्योगपतीच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू

भारतातही वाघाची कोरोना चाचणी; वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची महाराष्ट्रात टेस्ट

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.