AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातही वाघाची कोरोना चाचणी; वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची महाराष्ट्रात टेस्ट

चंद्रपुरात वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे (Corona Test of Baby Tiger in Chandrapur).

भारतातही वाघाची कोरोना चाचणी; वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची महाराष्ट्रात टेस्ट
| Updated on: May 03, 2020 | 12:30 AM
Share

चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ माणसालाच नाही, तर प्राण्यांनाही होत असल्याचं समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपुरात वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची कोरोना चाचणी करण्यात आली (Corona Test of Baby Tiger in Chandrapur). देशातील वाघांसंदर्भातील ही पहिली घटना असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात सुशी-दाबगाव येथे हा वाघाचा बछडा आढळला होता. वनविभाग आणि वन्यजीव संस्था सदस्यांनी त्याच्यासाठी बचाव अभियान राबवले होते.

चंद्रपूर वनविभागाच्या अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे 24 एप्रिल रोजी अंदाजे 3-4 महिन्याचे वाघाचे (मादी) बछडे आढळून आले होते. या घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांच्यासोबत घटनास्थळी पोहचले. यानंतर चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, स्थानिक एनजीओ, रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांच्या मदतीने या बछड्याला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्जिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलवण्यात आले. बछड्यावर पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

क्षेत्रीय कर्मचारी वाघिणीचा शोध घेत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरु असल्याने वाघाच्या बछड्याचे कोविड-19 चाचणीसाठी स्वॅब नमुने गोळा करुन पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या बछड्याची आई असलेल्या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून स्थानिक एनजीओचे प्रतिनिधी, वनकर्मचारी आणि गावकरी यांचे 4 चमू तयार करण्यात आले आहेत. तसेच जंगल परिसरात एकूण 29 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यामध्ये एफडीसीएम वनविभाग व वन्यजीव अभ्यासक यांचा समावेश करुन वाघाचे पगमार्क घेणे आणि संयुक्त गस्त करुन मादी वाघीणीचा शोधण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान चंद्रपूरमध्ये झालेली वाघाची कोरोना चाचणी करण्याची घटना बहुधा देशातील पहिली घटना असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वन्यजीव विश्वात हा साथरोग पसरला आहे का? हे या वाघाच्या बछड्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

मुंबईत मेडिकल सर्टिफिकेटसाठी मजुरांची रांग, घरी जाण्यासाठी कागदांची जुळवाजुळव

मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त

Corona Test of Baby Tiger in Chandrapur

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...