
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर मागच्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या खटल्यात असं अनेकदा वाटलं की, आज निकाल येईल, उद्या येईल. पण सतत तारीख पे तारीख सुरु आहे. ज्या तारखेला सुनावणी असते, तेव्हा वाटतं की, आज निकाल येईल. पण पुन्हा पुढची तारीख दिली जाते. मागच्या महिन्यातही हेच झालं. आज म्हणजे 12 डिसेंबरला सुनावणी आहे. निदान आता तरी या खटल्याचा निकाल यावा, अशी ठाकरे गटातील नेत्यांची इच्छा आहे. “गेल्या सुनावणीत सुर्यकांत यांनी सलग सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे आता तरी सलग सुनावणी होऊ द्या. 26 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चिन्हाचं वाटप होणार आहे. त्यामुळे आज निर्णय झाला तर चांगलं होईल” दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई म्हणाले.
“पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होणं अपेक्षित आहे. या प्रकरणात बराचसा युक्तिवाद झाला आहे. त्यामुळे याला अधिक वेळ लागणार नाही. पक्ष आणि चिन्हा सोबतच आमदार अपात्रता प्रकरण वेगळ नाहीच. त्याची लिंक आहे” असं अनिल देसाई म्हणाले. “यापूर्वी अनेक वेळा निराशा झाली आहे. पण आम्ही आशावादी आहोत. 3 वर्ष वाट पाहिली आहे. आणखी थोडा काळ वाट पाहू. निकाल आमच्या बाजूने लागेल हे अपेक्षित आहेच” असं विधान परिषदेचे आमदार अनिल परब म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या सहीनेचे एबी फॉर्म दिले गेले होते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांना फोन केला होता. त्यावर अनिल परब म्हणाले की, “ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आजारी असताना एकमेकांशी बोललं जातं. पण दोन्ही विषय वेगळे आहेत” “पक्ष चिन्हाच्या संदर्भात ही सुनावणी होऊ शकते. माझी सनद रद्द झाली म्हणून केसवर परिणाम होणार नाही. वकिलाच्या टीमचा मी भाग होतो. कोर्टात झालेल्या घटना मी आपल्यासमोर सांगू शकतो. फक्त कोर्टात बोलू शकत नाही. मात्र सर्व मला दिलेले काम मी करणार. महाराष्ट्रात धनुष्य आणि शिवसेना नावाचा फायदा एकनाथ शिंदेंना झाला. उद्धव ठाकरेंच्या सहीनेचे एबी फॉर्म दिले गेले होते. त्यावर पक्ष हा उद्वव ठाकरेंचा हे दिसून येतो. निवडणुक आयोगाने खोडसाळपणा केला आहे” असं असिस सरोदे म्हणाले.