AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटनाला गेले ते परतलेच नाहीत; रायगड, ठाण्यात तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

KP Waterfall Accident : पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्या 3 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून या घटना समोर आल्या आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पर्यटनाला गेले ते परतलेच नाहीत; रायगड, ठाण्यात तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
3 Tourist Died in Raigad and ThaneImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 03, 2026 | 4:21 PM
Share

राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच आता पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्या 3 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून या घटना समोर आल्या आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील KP वॉटरफॉल येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या ठाण्यातील एका तरुणाचा परतीच्या प्रवासात दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावरील रिल्स आणि पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स गर्दी करतात. मात्र, हा निसरडा आणि धोकादायक मार्ग जीवावर बेतू शकतो, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

धबधब्यात कोसळून पर्यटकाचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ठाण्यातील चार युवक KP वॉटरफॉलवरून परतत असताना 23 वर्षीय अभिषेक कुसवाहा याचा छोट्या धबधब्यावर पाय घसरला आणि तो सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत कोसळला. त्याचे तीन साथीदार रात्री उशिरा झेनिथ ठाकूरवाडीत पोहोचले आणि ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर खोपोली पोलिस, हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अखेर पहाटेच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह दरीत आढळून आला. मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून खोपोली पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर धोकादायक पर्यटनस्थळी सेल्फी आणि रिल्सच्या नादात जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शहापूरमध्ये एका पर्यटकाचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील डोळखांब परिसरात मागच्याच आठवड्यात पर्यटन स्थळावर एक मोठी दुर्घटना घडल्यानंतर डोळखांब व परिसरातील पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही इतर अतिउत्साही पर्यटकांची या भागात वर्दळ पहायला मिळत आहे. अशातच आता डोळखांब परिसरातील वरपडी नदीवर आलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनीही मुसळधार पावसात पर्यटन स्थळावर येऊ नये आव्हान केले आहे.

सोलनपाडा डॅमच्या प्रवाहात मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू

कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध अशा सोलनपाडा डॅमच्या प्रवाहात वाहून गेल्याने मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. वडाळा, मुंबई येथील पाच ते सहा तरुण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कर्जत येथील सोलनपाडा डॅमवर आले होते. त्यातील एका तरुणाने सांडव्यात उडी घेतली. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असल्याने सांडव्यात पाण्याचा प्रवाह वाढला आणि हा तरुण वाहून गेला. या घटनेत अरमान अब्दुल लतिफ याचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी