मोठी बातमी! पोलिस दलात मोठे फेरबदल, 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 43 उपविभागीय पोलीस अधीक्षक-सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! पोलिस दलात मोठे फेरबदल, 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या
maharashtra Police Transfer
Image Credit source: Google
| Updated on: Aug 25, 2026 | 10:18 PM

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक 1च्या शिफारशीनुसार राज्यातील 43  पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदस्थापनेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, बीड, गडचिरोली, रायगड, नाशिक, अमरावती यांसह विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 22न(2) मधील तरतुदीनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, तर काही अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?

स्वप्नील राजाराम राठोड यांची ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त पदावरून गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांची गंगाखेड येथून ठाणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. शिवाजी मारुती गायकवाड यांची गडचिरोली येथील पोलीस उपअधीक्षक पदावरून नागपूर शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश कृष्णराव चव्हाण यांची भामरागड येथून नागपूर शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

याशिवाय शुभदा शैलेश सांख्ये यांची नागपूर येथील अंमली पदार्थ टास्क फोर्समधून पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सविता नरेंद्र शितोळे यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागातून पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आसिफ अब्दुल अजीज शेख, विलास रामदास भोसले, चेतन बाळूभाई राठोड आणि सिमा विनायक मेर यांची अनुक्रमे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि बीड येथून मुंबई शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीव धुराजी निले यांची सातारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावरून बीड येथे पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय म्हणून बदली करण्यात आली आहे. राजू संभाजी सोनावणे यांची महाराष्ट्र सायबरमधून श्रीवर्धन, रायगड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

डॉ. निलेश पालवे यांची गंगापूर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथून महाराष्ट्र सायबरमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मंगेश सखाराम चाळके यांची मुंबई पोलीस नियंत्रण कक्षातून मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निनाद मधुकर सावंत यांची मुंबई शहरातील सहायक पोलीस आयुक्त पदावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई मुख्यालयात अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी यांची कळवण उपविभागातून पुणे ग्रामीणच्या हवेली उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संबंधित पदावरील अधिकारी निवृत्त झाल्यानंतर होणार आहे.

 

Follow Us