मनोज जरांगे पाटील यांना मोठा झटका, थेट सहकारी महिलेचीच पोलिसात तक्रार, गंभीर आरोप करत..

मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. त्यातच आता त्यांच्या आंदोलनातील सहकारी महिलेने थेट पोलिसात तक्रार दिली. यादरम्यानच त्यांनी गंभीर आरोप केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडे मोठी मागणी केली.

मनोज जरांगे पाटील यांना मोठा झटका, थेट सहकारी महिलेचीच पोलिसात तक्रार, गंभीर आरोप करत..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 29, 2026 | 12:08 PM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सतत गंभीर आरोप होत आहेत. त्यात अजय बारस्कर यांच्याकडूनही आरोप होत आहेत. मनोज जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा अवैध वाळू उत्खननाच्या व्यवहारांशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता खरेदी केल्याचेही त्यांनी आरोप करत म्हटले आहे. ज्या लोकांकडे अगोदर काहीच नव्हते, त्यांच्याकडून आता अत्यंत महागड्या गाड्या बघायला मिळत आहेत. यादरम्यानच आता मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मनोज जरांगे यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासूनसोबत असलेल्या महिलेनेच गंभीर आरोप केले.

मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरूवात केली. मुंबईच्या दिशेने ते रवाना देखील झाले. आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन होणार होते. मात्र, आंदोलनाच्या 20 व्या दिवशीच बीडच्या पाटोद्यातून त्यांनी उपोषणाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. सरकारला तीन महिन्यांचा वेळ त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना आयकर खात्याने चाैकशीची नोटीस दिली.

Loading...

मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनीच आता जरांगेंच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ, एआय निर्मित फोटो आणि व्हिडीओ बनवून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप ललिता तारख यांनी करत अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हेच नाही तर जरांगेंना मोठा दणका देत त्यांना मागणी केली की, 2023 पासून जरांगे यांच्यासोबत असलेल्या माझ्यासह सर्व सहकाऱ्यांच्या संपत्तीची चाैकशी करा. ललिता पारख यांनी म्हटले की, मी अंब़ड पोलिस ठाण्यात आले होते. इतके दिवस मी त्यांच्याबाजूने बोलत होते.

आता मी सत्य बोलले तर तुम्ही कमेंट करता. तुमच्या घरी आई बहीण आहे, याचे भान ठेवा. पोलिसांनी लगेचच कारवाई करावी. सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मी पैसे घेतले. लाखोचे पॅकेज घेतले. मला विचारले जात आहे की, तुम्ही किती प्लॉट घेतले? माझ्या संपत्तीची चाैकशी करा. त्यात कळेल की, कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. ज्यावेळी वेळ येईल, त्यावेळी मी सत्य बोलेल. मला बोलायला लावू नका. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मी विनंती करतील की, याची सखोल चाैकशी करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us