मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढल्या, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद धोक्यात? पुन्हा नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. सच्चिदानंद सिंह यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. 17 ऑगस्टला ही रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. यापूर्वी 9 जुलै 2026 ला सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली होती, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना रिमायंडर नोटीस पाठवण्यात आली आहे.
नेमका काय आहे आक्षेप?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना 9 जुलै 2026 ला एक नोटीस पाठवण्यात आली होती, 9 जुलै 2026 ला सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीची निवडणूक घटनाबाह्य आहे, या प्रक्रियेसाठी निवडणूक प्राधिकरण नव्हते तसेच सचिदानंद सिंह आणि इतर राष्ट्रीय प्रतिनिधीना नामांकन भरणे, निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी रिमायंडर नोटीस पाठवली आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
दरम्यान अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, अजित पवार हे मुंबईवरून विमानाने बारामतीकडे निघाले होते, याचवेळी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना ही दुर्दैवी घटना घडली, विमान जमिनीवर कोसळलं, आणि या घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची सर्व सुत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आले, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान त्यानंतर त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील एकमताने निवड झाली. परंतु आता त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.