AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...

मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील…

| Updated on: Aug 20, 2026 | 1:13 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुरू आहे. या प्रकरणी आठव्या दिवशी युक्तिवाद केला जात असून, आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत अर्धा तास युक्तिवाद सादर करणार आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुरू आहे. या प्रकरणी आठव्या दिवशी युक्तिवाद केला जात असून, आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत अर्धा तास युक्तिवाद सादर करणार आहेत. हा युक्तिवाद प्रामुख्याने आमदार अपात्रतेवर केंद्रित असणार आहे, ज्यावर उद्धव ठाकरे यांच्या वतीने सविस्तर म्हणणे मांडले जात आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या या युक्तिवादात अनेक कायदेशीर गुंतागुंत समोर आली आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, निवडणूक आयोगाचा निर्णय आणि त्यामागील तर्क या सर्व बाबी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडल्या जात आहेत.

या प्रकरणात कपिल सिब्बल यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या वतीने युक्तिवाद करताना एक महत्त्वपूर्ण मागणी केली. त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात यावे, अशी विनंती केली. त्यांचे म्हणणे होते की, हे चिन्ह कोणत्याही पक्षाला देऊ नये. उद्धव ठाकरे गटालाही नाही आणि एकनाथ शिंदे गटालाही नाही. या युक्तिवादाचा मूळ आधार राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष किंवा पार्लमेंटरी पार्टी यांच्यातील फरक स्पष्ट करण्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 20, 2026 01:05 PM

Follow Us