तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई, केमिकल दुधाचं मोठं रॅकेट पकडलं; 13 जणांना अटक

Chemical Milk Racket : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई, केमिकल दुधाचं मोठं रॅकेट पकडलं; 13 जणांना अटक
Tukaram Mundhe FDA
Image Credit source: Google
| Updated on: Jul 06, 2026 | 10:31 PM

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यापासून भेसळयुक्त पदार्थांवर धडक कारवाई सुरू आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली आहे.

मोठं रॅकेट उध्वस्त

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ‘दुधाबाबत करण्यात आलेली ही आमची सर्वात मोठी कारवाई आहे. पूर्ण एक महिना आम्ही माहिती घेत होतो. महाराष्ट्रामध्ये काही दिवसात कारवाई करत आहोत, त्याचा भाग म्हणून केमिकल दूध बनवलं जात असल्याच माहिती मिळाली होती. दोन दिवसापासून मोठी चौकशी आम्ही सुरु केली आहे. एक मोठं रॅकेट उध्वस्त करत आहोत. याबाबत चौकशी सुरू आहे.’

पोलिस आणि FDA ची सयुंक्त कारवाई

पुढे बोलताना मुंढे यांनी सांगितले की, ‘पाच जिल्हांमध्ये चौकशी करत आहोत, पोलीस आणि FDA मिळून ही कारवाई करत आहे. महिनाभर पूर्वी काही माहिती हाती आली होती. एका व्यक्तीने भेटून माहिती दिली होती, त्याची पडताळणी आम्ही केली आणि नंतर कारवाई केली. आरोपीला रेड हॅन्ड पकडन्यासाठी आम्ही वाट पाहत होतो, कृत्रिम दूध पुरवठा करणारी टीम होती तिचा आता पर्दाफाश करण्यात आला आहे.’

13 लोकांना अटक

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, ‘बनावट दुधाचं रॅकेट चालवणार मंचर येथून चालत होते आता के रॅकेट चालवणारे सर्वजण अटकेत आहेत. प्रथम दर्शनी पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव, धाराशिव अशा जिल्हात हे रॅकेट सुरु होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये किराणा दुकानदार सुद्धा सामील आहेत. 13 आरोपी अटक करण्यात आले आहे. 4-5 तारखेच्या रात्री ही कारवाई केली असून मुख्य आरोपी ताब्यात घेतलं आहे. आरोपीना 9 तारखेपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशा अजून दोन गँग आहेत जे असे काम करत आहेत, याबाबत माहिती घेणं सुरू आहे. योग्य ती कलमे लावली जाणार आहेत, मकोकाही लावला जाऊ शकतो.’

Follow Us