तुकाराम मुंढे एमपीएससीच्या अध्यक्षांची चौकशी करूच शकत नाहीत, सदावर्तेंच्या दाव्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट, कारणही सांगितलं…

एमपीएससीच्या आंदोलनावरून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठां ट्विस्ट निर्माण झाला आहे.

तुकाराम मुंढे एमपीएससीच्या अध्यक्षांची चौकशी करूच शकत नाहीत, सदावर्तेंच्या दाव्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट, कारणही सांगितलं...
Gunaratna Sadavarte
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 3:27 PM

एमपीएससीच्या आंदोलनावरून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ आज मी आपल्यासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडत आहे.  महाराष्ट्र संविधान साक्षर असताना देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. हा एक केविलवाणा प्रयत्न होता, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा जसा तडफडतो, तशी अवस्था रोहित पवार यांची झाली आहे. परंतु या आंदोलनातून विद्यार्थ्यांना काहीही मिळणार नव्हतं, फक्त राजकारण मोठं झालं,’ असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मोठा दावा देखील करण्यात आला आहे.  एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांची चौकशी तुकाराम मुंढे हे करूच शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भीमनवार यांच्या चौकशीमध्ये मुंढे साहेब असूच शकत नाहीत, त्यांची नियुक्ती अशा प्रकारे होऊ शकत नाही. आर्टिकल 317  सांगतं की राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीची शिफारस करायची आणि सर्वोच्च न्यायालयाने चौकशीची मुभा दिली तरच चौकशी होऊ शकते. त्यामुळे एमपीएससीच्या अध्यक्षांची विद्यमान समिती चौकशी करू शकत नाही, असा दावा सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.

Loading...

त्यामुळे आता रोहित पवार यांना पळावे लागणार आहे,  विद्यार्थी त्यांना सोडणार नाही.  एमपीएससीच्या अध्यक्षांची विद्यमान समिती चौकशी करू शकत नाही. या आंदोलनातून विद्यार्थ्यांना काय मिळालं? ज्या प्रकारे या आंदोलनाच्या माध्यमातून रोहित पवार व्यक्त होत होते, त्यावरून हे आंदोलन कोणत्या प्रकारे सुरू होतं, हे दिसून येत होतं. मी सांगतोय ज्या कालखंडात भीमनराव साहेब पदावरच नव्हते तर त्यांची चौकशीची मागणी कशी होऊ शकते, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी विवेकानंद सारख्या विद्यार्थ्यांचा वापर केला. त्यांना भीती होती की पोरं पळून जातील. मात्र यामध्ये रोहित पवारांचीच फसगत झाली. रोहित पवार यांच्या आंदोलनामधील काही विद्यार्थी मला येऊन भेटत होती, असा दावाही यावेळी सदावर्ते यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us