ते पत्रच मिळाले नाही, तुकाराम मुंढे यांचा खुलासा, राऊतांच्या आरोपांवर थेट म्हणाले, पुरावे..

FDA चे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकताच मोठा खुलासा केला. संजय राऊत यांनी दावा केला की, मी तुकाराम मुंढे यांना पत्र दिले असून मी खंडणीखोर अधिकाऱ्यांबद्दल बोललो आहेत. यावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिले.

ते पत्रच मिळाले नाही, तुकाराम मुंढे यांचा खुलासा, राऊतांच्या आरोपांवर थेट म्हणाले, पुरावे..
Tukaram Mundhe and Sanjay Raut
| Updated on: Sep 29, 2026 | 1:41 PM

तुकाराम मुंढे यांचे काैतुक केल्यानंतर संजय राऊत यांनी थेट त्यांच्याच विभागाची मोठी पोलखोल केली. यासोबतच त्यांनी थेट स्वत:चा विभाग अगोदर स्वच्छ करा, असे मोठे आव्हान तुकाराम मुंढे यांना केले. संजय राऊत यांनी आपण तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवल्याचेही म्हटले. मात्र, तुकाराम मुंढे यांनी आता स्पष्ट केले की, आपल्याला संजय राऊत यांचे कोणतेही पत्र मिळाले नाही. मुंढे इफेक्ट हॉटेल किचनमध्ये नाही, एफडीएच्या कार्यालयात तिसऱ्या मजल्यावरही दिसणे गरजेचे आहे, असे म्हणत राऊतांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना FDA तील अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या लुटीबाबत सविस्तर माहिती दिली आणि तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. याबाबत आपण तुकाराम मुंढे यांना पत्र दिल्याचेही राऊतांनी म्हटले.

आता राऊतांनी केलेल्या सर्व आरोपांवर तुकाराम मुंढे स्पष्ट बोलले. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, साधारणपणे कोणतेही ठोस तपशील नाहीत. मला त्यांच्या पत्राची कोणतीही प्रत मिळाली नाही. मी जे काही आहे ते प्रसादरमाध्यमांवरती वाचले. मी खरोखरच त्यांचा आभारी आहे. माझी एक विनंती आहे, त्यांच्याकडे जो काही तपशील आहे तो त्यांनी माझ्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावा.

Loading...

ज्या परवानाधारकांनी पैसे दिले किंवा ज्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. माझ्याशी थेट संपर्क केला जाऊ शकतो. तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. पोर्टलवर तक्रारदाराचे नाव लपवून ठेवले जाते. तक्रार कोणी केली हे देखील कळत नाही. तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधला तरीही मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील तुमचे नाव सांगणार नाही. मला दुसरे काही नाही मला फक्त पुराव्याची गरज आहे.

कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल तर मला संपूर्ण तपशीलसह द्या, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. यावर तुकाराम मुंढे नक्की काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी यावर आता स्पष्ट बोलताना तुकाराम मुंढे दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us