राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी, तुकाराम मुंढे यांची घोषणा..
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मोठे आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. थेट सुट्ट्या तेलावर त्यांनी राज्यात बंदी घातली. यासोबतच त्यांनी मोठे आवाहनही केले.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही मोठे निर्णय घेतले. राज्यभरात मोठे धाडसत्र सुरू आहे. अॅनालॉग पनीरवर त्यांनी बंदी आणली. यासोबतच मुंबई महापालिकेतील शाळांचा कँटीनमधील मेन्सू बदलला आहे. भेसळखोरांचा धाबे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने दणाणली आहेत. त्यामध्येच आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत काम करत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले. एडिबलं ऑईलबद्दल हा आदेश असल्याचे सांगत तुकाराम मुंढे यांनी महत्वाचा मुद्द आपल्या हातात घेतला आहे. खाद्य तेलावर आता काम केले जाईल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. राज्यात आता सुट्ट्या तेलावर बंदीचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिली आहेत.
तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, नोंदणी न केलेल्या खाद्य तेल कंपन्या आम्हाला मिळाल्या आहेत. खाद्य तेलात भेसळ केली जातंय. मोहरी तेल अनधिकृत मिश्रण केले जातंय, ज्याची परवानगी नाही. खाद्यतेलाची विक्री सुट्ट्या स्वरूपात करता येत नाही हा नियम अगोदरपासून आहे. किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा सुट्टे तेल विक्री करू नये, असे आवाहन तुकाराम मुंढे यांच्याकडून करण्यात आले.
मोहरीचे तेल 100 टक्के मोहरीचे विकावे लागेल. त्यात मिश्रण अजिबात चालणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले. पॅकेजिंग खाद्य तेलाची विक्री केली जाईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुट्टे तेल मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. मुळात म्हणते ते तेल कुठू येते याचा स्त्रोत माहिती नाही. ते सुरक्षित नाही. ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता आहे. तळणीचा तेलाचा वारंवार वापर केला जातो. हॉटेल्समध्ये हे मोठ्या प्रमाणात होते.
त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, आता हे करता येणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले. खाद्यतेलाच्या वापरांचे उल्लंघन केल्यास आता 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर 10 लाखापर्यंत दंड लागू शकतो. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी सुट्टे तेल न खरेदी करण्याचे मोठे आवाहन केले. यासोबतच नागरिकांनी सुट्टे तेल खरेदी करू नये, असेही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले.