AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तुकाराम मुंढेंनी चूक स्वीकारली, शाहरूख, अजयला नोटीस जाताच… कारवाईवर बोलताना मनातलं सांगितलं!

Tukaram Mundhe : काही दिवपांपूर्वी FDA ने पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांना नोटीस बजावलेली आहे. यावर आता तुकाराम मुंढे यांनी भाष्य केले आहे.

अखेर तुकाराम मुंढेंनी चूक स्वीकारली, शाहरूख, अजयला नोटीस जाताच... कारवाईवर बोलताना मनातलं सांगितलं!
Tukaram mundhe on Pan Masala NewsImage Credit source: Google
| Updated on: Aug 18, 2026 | 8:39 PM
Share

अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे धडाकेबाज कारवाई करत आहेत. काही दिवपांपूर्वी FDA ने पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांना नोटीस बजावलेली आहे. यात शाहरूख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे. या नोटीशीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आपली एक चूक स्वीकारली आहे. तसेच या कलाकारांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुकाराम मुंढे यांनी चूक केली मान्य

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे एएनआयशी बोलताना पान मसाल्यांच्या जाहीरातींवर होणारी कारवाई थोडी उशिरा होत असल्याची चूक मान्य केली आहे. मुंढे यांनी म्हटले की, या जाहिरातींचे निरीक्षण आणि परीक्षण सुरू होते. उशिरा का होईना, पण योग्य कारवाई होणे महत्त्वाचे आहे.’ सरोगेट आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर नियमांनुसार निर्बंध असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या जाहिराती करता येत नाहीत आणि त्या प्रतिबंधित आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा इशाराही मुंढे यांनी दिला आहे.

कलाकारांना होऊ शकतो दंड

तुकाराम मुंढे यांनी संबंधित कलाकारांकडून आगामी काळात दिले जाणारे स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर कोणती कारवाई होऊ शकते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना तुकाराम मुंडे यांनी पहिल्या टप्प्यात 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे स्पष्ट केले. तसेच त्यानंतरही समाधानकारक उत्तर किंवा परिस्थिती नसेल तर प्रतिबंधित वस्तूंशी संबंधित FSSAI कायद्यातील तरतुदींनुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गुटखा आणि इतर बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करणाऱ्या FDA ने या अभिनेत्यांकडून जाहिरात करारांच्या प्रती, मोहिमेची माहिती, मानधनासंबंधी तपशील आणि जाहिरातीपूर्वी करण्यात आलेल्या पडताळणीचे पुरावेही मागितले आहेत. आता या कलाकारांना आर्थिक दंड भरावा लागू शकतो, तसेच संबंधित सेलिब्रिटींना तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदीही घातली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल