Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Tukaram Mundhe Story : तुकाराम मुंढे हे वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याची माहितीही देताना पहायला मिळत आहेत. अशाचत आता एका मुलाखतीत त्यांनी युपीएससी पास झाल्यानंतर आपल्या आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती याबाबत माहिती दिली आहे.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम
Tukaram Mundhe Parrent Advice
Image Credit source: Google
| Updated on: Aug 31, 2026 | 11:07 PM

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांची ओळख एक कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी अशी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मुंढे हे वेगवेगळ्या आस्थापनांवर कारवाई करत आहेत. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. तुकाराम मुंढे हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देत असतात. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याची माहितीही देताना पहायला मिळत आहेत. अशाचत आता एका मुलाखतीत त्यांनी युपीएससी पास झाल्यानंतर आपल्या आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तुकाराम मुंढे यांच्या पालकांनी दिला खास सल्ला

तुकाराम मुंढे यांना एका मुलाखतीत युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुंढे यांनी म्हटले की, ‘मी जेव्हा युपीएससी परीक्षा पास झालो, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं की, तुला जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं कर. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की, आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे. मी चकित झालो आणि माझ्या मनात विचार आला की, मी ज्या वातावरणात राहत आहे ती खास विचारसरणी आहे. मला असं वाटतं की कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इतकं काही करू शकलो नसतो. हा संपूर्ण टीमचा एक प्रयत्न आहे. जर लोक माझ्या कामाचे कौतुक करत असतील तर त्याचे सगळे श्रेय हे माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मित्रांना जाते, जे सतत माझ्यासोबत उभे राहिले.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या यशामागे केवळ त्यांची मेहनतच नव्हे, तर कुटुंबीयांचा पाठिंबा आणि मित्रांची साथही महत्त्वाची असल्याचे अधोरेखित होते. UPSC सारखी देशातील कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही आई-वडिलांनी मुलाकडून कोणत्याही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता ‘लोकांचं भलं कर’ असा दिलेला सल्ला हा त्यांच्या संस्कारांची आणि विचारांची झलक दाखवणारा ठरतो.

 

Follow Us