Tukaram Mundhe: कोणतं दूध वापरावं असा प्रश्न पडलाय? तुकाराम मुंढेंनी सुचवला बेस्ट पर्याय
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे यांनी आता सर्वसामान्य नागरिकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोणतं दूध प्यावं हे त्यांनी सांगितले आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सामान्य नागरिकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. नागिरकांना त्यांनी सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी अलिकडेच एका पत्रकार परिषदेत यावर आपले मत मांडले आहे. दुकानातील सुटे दूध विकत घेऊ नका असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी या वेळेला दिला. तुम्ही शेतकऱ्यांकडून कच्चे दूध विकत घेत असाल तर ते घ्या, पण दुकानातील सुटे दुध कदापि विकत घेऊ नका. कच्च्या दुधात आणि सुट्या दुधात खूप मोठा फरक असतो, असं स्पष्ट तुकाराम मुंढे यांनी समजावून सांगितले.
पाश्चराईज दूध असेल तर ते सीलबंद पिशवीत किंवा एका पॅकेटमध्येच घ्या. घेण्यापूर्वी एक्सपायरी देट आणि उत्पादनाची तारीख नीट तपासा, असा सल्ला ही यावेळी तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला. त्यांनी विक्रेत्यांनाही भेसळ चालणार नाही, अशा इशारा दिला. तूप, लोणी, वनस्पती तेल यामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ केली तर कारवाई होईल. आधार नसलेले शुद्ध देसी तूप, दूध असे दावे असतील तर बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, शुद्ध तूप १०० टक्के प्युअर, असा कोणताही प्रकार नसतो. असा दावा करुन कोणीही तूप, दूधाची विक्री करत असेल तर आम्हाला स्पष्ट कळवा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करु, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
आपला चहा आणि पाश्चात्य देशात मिळणाऱ्या चहामध्ये खूप फरक असतो. आपण चहात साखर आणि दूध मिसळतो ते लोक तसं करत नाही. याबाबत बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, रोज सकाळी तुमच्या घरी दूध येते. दूध तुमच्या घरात येण्यापूर्वी ते दुकानात असते. दुकानात फ्रिजरमध्ये ठेवले असेल ते दूध. मात्र. त्या फ्रिझमध्ये आवश्यक तापमान राखले जाते का? हे कोणालाच माहिती नसते. सुटे दूध ज्या टँकरमध्ये येते, तो साफ आहे का नाही याची खात्री आपल्याला १०० टक्के देता येत नाही. दुधाचे तापमान हे ४ अंश सेल्सिअस इचकेच असायला हवे त्यापेक्षा जास्त नको. गाई किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते दोन तासापेक्षा जास्त वेळ उघड्यावर सामान्य तापामानात ठेवले तर त्यामध्ये अॅसिडिटी निर्माण करणारे घटक तयार होतात असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.