तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान प्रकरणी उद्या तुळजापूर बंदची हाक

| Updated on: May 11, 2022 | 9:19 PM

छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थांनाकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडववे गेले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतापले होते. त्यामुळे उद्या तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान प्रकरणी उद्या तुळजापूर बंदची हाक
छत्रपती संभाजीराजे
Follow us on

उस्मानाबाद: तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्याप्रकरणी उद्या तुळजापूर बंदची (Tuljapur closed tomorrow) हाक देण्यात आली आहे, जिल्हाधिकारी, मंदिर, तहसीलदार व व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी तुळजापूर शहर बंद राहणार असल्याचे सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) व तुळजापूरकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थांनाकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडववे गेले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतापले होते.

मानानुसार देवीची विधिवत पूजा

त्यामुळे उद्या तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संभाजीराजे आणि कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरात येतात, आणि त्यांचा मानानुसार देवीची विधिवत पूजाही केली जात होती. मात्र सध्या नवीन नियम लावले असल्याचे सांगण्यात येत असून त्याप्रकरणीच संभाजीराजे यांनी तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता.

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवेश बंदी

तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे त्यामुळे महाराज यांना अडविले आहे. यासाठी वेगळे नियम लावले गेले असल्याचेही जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाने सांगितले होते, मात्र संभाजीराजे यांना प्रवेश नाकारल्यामुळे सकल मराठा समाज यांच्याकडून या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नवे नियम सांगून अडविले

ज्यावेळी संभाजीराजे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांना नवे नियम सांगून अडविण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून आपण मंदिरात आल्याचेही त्यांनी सांगितले मात्र तरीही त्यांना गाभाऱ्यात सोडण्यात आले नाही.

परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून

छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. मंदिर आणि कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे या मंदिराबरोबर भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यासाठी त्यांनी मंदिरासाठी देणगीही देण्यात आली आहे. तरीही त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

छत्रपती घराण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा

तुळजापभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे कालच आले होते, असे नाही तर गेले कित्येक वर्षे ते तुळजाभवानी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. छत्रपती घराण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा संभाजीराजे यांना मंदिरात प्रवेश नाकारल्याने व खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज व संतप्त झाले होते.

तुळजाभवानी मंदिर संस्थानांची दिलगिरी

तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर सकल मराठा समाज ठाम असून याप्रकरणी उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.