
नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जा-ये करणे सोयीचे व्हावे, तसेच मेट्रो स्टेशनपासून इच्छितस्थळी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात एक हजार बस दाखल होणार आहेत. डोंबिवलीतील ठाकुर्ली सर्वोदय लीला इमारतीच्या 13 व 14 व्या मजल्यावर मध्यरात्री लागली भीषण आग. आगीत घरसामान जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाच्या गाडीने तातडीने घटनास्थळी पोहचत आगीवर मिळेवले नियंत्रण. आग कशामुळे लागली याचा तपास सुरू. उन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये विषाणुसंसर्गाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत ताप, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
जळगावातील पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्यावर गेल्या तीन दिवसांपासून काँक्रीट रस्त्याखालील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महापालिकेने पाणी नासाडी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देऊनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. फुटलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्याचेही मोठे नुकसान होत असून, परिसरातील नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून हवामान विभागतर्फे मुंबईसह ठाण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मार्केट परिसरात खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची चांगली तारंबळ उडाली.
तीन ते चार तासांपासून मुंबई- आग्रा महामार्गावर वाहतूक ठप्प
चांदवड घाटात वाहतूक कोंडी
नाशिकच्या चांदवड येथील घाटात वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा
रस्त्याचे काम सुरू असल्याने होतेय वाहतूक कोंडी..
रायगडच्या महाड शहरात आज दुपारी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचलं आहे, मात्र वाहतूक सुरळीत सुरू असून, कोणतीही अनुचित घटना घडलेली नाहीये.
मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी भाषेचा वाद
डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयचा मराठी बोलण्यास नकार
महिला डॉक्टरचा संताप
इथे मराठी बोलण्याची जबरदस्ती आहे का? डिलिव्हरी बॉयकडून वाद
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम शहरासह अनेक ठिकाणी जोरदार मानसूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फटका बसला आहे, मात्र या पावसामुळे आता खरीपपूर्व मशागतीला देखील वेग येणार आहे.
अमृतसरमधील मजिठा येथे विषारी दारू पिल्याने मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या आणखी दोन तरुणांचा आज मृत्यू झाला. दोघांचीही प्रकृती खूपच गंभीर होती आणि त्यांच्यावर गुरु नानक देव रुग्णालयात उपचार सुरू होते.
पंजाब आणि हरियाणा यांच्यातील सुरू असलेल्या पाणी वादाबाबत पंजाब सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने पंजाबची याचिका गंभीर मानली आणि हरियाणा तसेच केंद्र सरकारला नोटीस पाठवली. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाच्या (बीबीएमबी) अध्यक्षांच्या बदललेल्या भूमिकेवरही न्यायालयाने उत्तर मागितले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांचे ग्रेड ए+ करार सुरू राहतील. ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यांना ग्रेड ए+ च्या सर्व सुविधा मिळतील.”
चिनी वेबसाइट्स शिन्हुआ आणि ग्लोबल टाईम्स व्यतिरिक्त, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तुर्की वेबसाइट TRT हँडल भारतात ब्लॉक केलेले नाही. यापूर्वी असे वृत्त आले होते की हे हँडल ब्लॉक करण्यात आले आहेत.
रायगड सुधागड येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीची धारदार कोयत्याने हत्या केली आणि त्यानंतर काही क्षणातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
धाराशिवमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यालयातच शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नक्कियोद्दीन बशीरोद्दीन काझी असे ( वय ४८ वर्षे ) आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. चिमूर तालुक्यातील करबडा येथे या तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कचराबाई अरुण भरडे (54) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.
बीएसएफे जवान पी.के.साहू यांना पाकने अखेर सर्व प्रोटोकॉल पाळून भारताकडे सोपवलं आहे. पी.के.साहू हे अटारी-वाघा सीमेवरून सुरक्षीतपणे भारतात परतले आहेत. पी.के.साहू चुकून पाकिस्ताच्या हद्दीत गेले होते. तसेच भारताचा एक रेंजर देखील पाकने सोपवला आहे.
जैसलमेर शहराची शान म्हणून ओळख असलेला गोल्डन फोर्ट म्हणजे सुवर्ण किल्ला हा आता पर्यटनासाठी खुला करण्यात आलेला आहे. अनेक देशी-विदेशी पर्यटक या किल्ल्याला दरवर्षी भेट देत असतात मात्र भारत पाकिस्तानमधील तणावानंतर हा किल्ल्यावर माणसांची रेलचेल बंद झाली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा रोजगारही थांबला आहे. मात्र आता परिस्थिती सामान्य असून लोकांनी किल्ल्यावर यावं असं आवाहन नागरिकांनी केलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 10 हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक साडेसहा हजार हेक्टर एवढं केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. केळी नंतर मका पिकाचे 1 हजार हेक्टर, बाजरीचे 500 हेक्टर तर फळबागांचा 1 हजार 950 हेक्टर पर्यंत नुकसान झाले आहे.
डिसेंबर अखेरीस दहिसर-काशीगाव टप्पा -1 सेवेत मेट्रो आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तशापद्धतीने येथील मेट्रो मार्गिकेवर चाचणीही करण्यात आली आहे. दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो-9 मार्गिकेचीही चाचणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी करण्यात आली आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्क मैदान परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंगवर नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर पहाटे ५:३० ते रात्री ११:३० या वेळेत नो पार्किंग असेल. तर रात्रीच्या वेळी ११:३० ते पहाटे ५:३० या वाजेपर्यं शिवाजी पार्क मैदानाला लागून असलेल्या रस्त्यावर नो पार्किंग राहील. शिवाजी पार्क पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलावर हे ‘नो पार्किंग’चे बोर्ड आणि वेळ दर्शविणाऱ्या पाट्या बसवण्यात आल्या आहेत. नवीन नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे नियमांचे पालन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी विशेष मोटरसायकल पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचे आमदार सिध्दार्थ खरात हातात तलवार घेऊन नाचल्याचं समोर आलं आहे. एका लग्नाच्या वरातीत आमदार खरात यांनी हातात तलवार घेऊन डान्स केला. त्यामुळे आमदारावर पोलीस काय कारवाई करते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पुरंदर किल्ल्यावरती उपस्थिती लावली. यावेळी ठाकरे कुटुंबानंतर पवार कुटुंब देखील एकत्र येत आहे, असा सवाल आशिष शेलार यांना करण्यात आला. त्यावर, सर्वांनी एकत्र यावं. मात्र गुण्यागोविंदाने नांदावं, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली. पुरंदर मधील प्रस्तावित विमानतळ होत आहे. मात्र बळीराजाचं कसलंही नुकसान होऊ नये, असे देखील आशिष शेलार म्हणाले आहेत.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि परतवाडा येथील सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागांची छापेमारी. पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स, अमरावतीमधील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापीमारे सुरू असल्याची माहिती. सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाचे सकाळपासून छापीमारीचे सत्र सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज दुपारी आढावा बैठक आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत फ्रंटल सेलच्या अध्यक्ष पदा संदर्भात बदल होण्याच्या हालचाली आहेत.
दहिसर ते काशीगाव मेट्रो मार्गिकेची आज चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या मार्गिकेमुळे मुंबईतील वाहतूक समस्या मार्गी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणावरून भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.पवार कुटुंब एकत्रित येणारा अश्या चर्चा होतात,पण प्रत्यक्षात त्या होत नाहीत.अजित पवार,शरद पवार,सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे,जयंत पाटील ,रोहित पवार हे बाजूला उभे असतात,त्यामुळे फक्त चर्चा होतात निर्णय होतं नाही,असा टोला अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार या सुरू असलेल्या चर्चा यावरून चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे
बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्या घरावर ईडीचा छापा टाकण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व संतोषभूवन परिसरातील सीताराम गुप्तां यांच्या घरात आज सकाळ पासून ईडी चे अधिकारी तपास करीत आहेत. नालासोपारा मधील 41 इमारत तोडक प्रकरणात ही कारवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवले. ते चुकून पाकिस्तानी हद्दीत गेले होते. सीमारेषा लक्षात न आल्याने ते पाकमध्ये गेले होते. त्यांना अटारी -वाघा सीमेवरून भारताकडे सोपवण्यात आले.
धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या गाडीला अपघात झाला. सोलापूर धुळे महामार्गावर धाराशिव शहराच्या जवळ स्कॉर्पिओ गाडी आणि कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये हसन यांच्या स्कॉर्पिओ गाडीचे नुकसान तर माजी अप्पर पोलीस अधीक्षकासह इतर दोन जण जखमी झाले आहेत.
उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाल्यामुळे महामंडळ मागे पडले. त्यांच्या काळात महामंडळाच्या वेबसाईटचे अपग्रेडेशन होणे गरजेचे होते ते झाले नाही त्यामुळे आम्ही मागे पडलो. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आम्ही पुन्हा काम सुरू केले. त्यावेळी 1 लाख उद्योजक तयार झाले आणि आता 1 लाख 35 हजार उद्योजक तयार झालेत, असे वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून मुंबई येथून थेट आता दुबई आणि आखाती देशात कांद्याची निर्यात करण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या तणावामुळे कांद्याच्या निर्यातीत अडथळा आला होता.
महाराष्ट्र शासनानं देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक (मुख्यालय) कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरविण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही.
राज ठाकरे, नारायण राणेंनी पक्ष सोडल्यावर शिवसेनेवर दावा केला नाही. त्यांनी स्वत: पक्ष काढला, पण सेनेवर दावा केला नाही. पक्ष काढला म्हणून त्यांचं कौतुक वाटतं, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
दिल्ली: राष्ट्रपती भवनात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इतर मान्यवरांचे आभार मानत हस्तांदोलन केलं. गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बनल्यानंतर अमरावतीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लाडू वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला. अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हार्बर मार्गावरील मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळपासूनच पुलावर वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. शिवडी, वडाळा, भायखळा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एक दिवसापूर्वी साडेतीन हजार रुपयांनी घसरलेल्या सोने दराने पुन्हा उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर १ हजाराने वाढून जीएसटी सह ९७ हजार ६४४ रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरातही किलोमागे १ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ९४० रुपयांवर पोहोचले आहे.
महाराष्ट्राचे भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश झाले आहेत. नुकताच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश बनले आहेत.
भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांची आज पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेचं आयोजन हे श्रीनगरमध्ये करण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत ऑपरेशन ‘केलर’संदर्भात माहिती दिली जाणार आहे. ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत शोपियानमध्ये ऑपरेशन ‘केलर’ राबवण्यात आलं.
खासदार श्रीकांत शिंदे नाशिक जिल्ह्याचा बैठकीतून आढावा घेणारा आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मुंबईत बैठक होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे सूचना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये 2 गट पडल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर या बैठकीला अधिक महत्त्व आहे. या बैठकीत पक्षातील गटातटाच्या राजकारणावर श्रीकांत शिंदे काय निर्णय घेतात? याकडे लक्ष असणार आहे. मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी उद्या सकाळी ही बैठक होणार आहे.
मुंबई नजीकच्या वसई-विरारमधून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. वसई-विरारमध्ये ईडीची 13 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. बविआचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित ईडीचे छापे टाकण्यात आले आहेत. सीताराम गुप्ता यांच्यावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा शहराच्या मिर्झा नगरमधील घरांना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी 3 घरं आली. एका पाठोपाठ तीन घरं जळून खाक झाली. आगीत लाखों रुपयांचे वस्तू जळून खाक झाल्या. मात्र सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही.बुलढाणा अग्निशमन दलाने आणि परिसरातील नागरिकांनी अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग शॉट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्य पोलीस दलातील आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी गृह विभागाने जाहीर केल्या. त्यानुसार मुंबई रेल्वेचे आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागात सह आयुक्तपदी करण्यात आली आहे. तसेच अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पदावर बदली करण्यात आली. शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली. तर नागपूरचे सह आयुक्त निस्सार तांबोळी आता राज्य राखीव पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. एन डी रेड्डी यांना नागपूरचं सह आयुक्तपद देण्यात आलंय. तर सुप्रिया पाटील-यादव यांचीही नियुक्ती झाली आहे.आरती सिंह यांच्या नियुक्तीचे स्व तंत्र आदेश लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी आत्महत्या ,शेताला हमीभाव आणि दिव्यांगाचे विविध समस्या संदर्भात प्रहार संघटना रक्तदान करून आंदोलन करणार आहे.
राज्य पोलीस दलातील आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी गृह विभागाने जाहीर केल्या. मुंबई रेल्वेचे आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागात सह आयुक्तपदी झाली. अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पदावर बदली करण्यात आली. शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली. नागपूरचे सह आयुक्त निस्सार तांबोळी यांची बदली राज्य राखीव पोलीस बलात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली. एन. डी. रेड्डी यांना नागपूरचे सह आयुक्तपद देण्यात आले असून सुप्रिया पाटील-यादव यांचीही नियुक्ती झाली आहे. आरती सिंह यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये त्यांनी एका जनसभेला संबोधित केलं. तिथे त्यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती टाळण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
सायबर गुन्हे आणि काळा पैसा लपवण्यासाठी बनावट बँक खाती उघडल्याची माहिती. जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना ठोकल्या बेड्या. लाडकी बहीण योजनेच्या नावाने बनावट कागदपत्रे वापरून शेकडो बँक खाती उघडण्याचा प्रकार उघड. खाती उघडून त्यांचा वापर सायबर गुन्हे आणि काळा पैसा लपवण्यासाठी केला जात होता. जुहू पोलिसांनी आरोपी अविनाश कांबळे, श्रुती राऊत, फाल्गुनी जोशी आणि रितेश जोशी यांना अटक केली
मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत येलो आणि ऑरेंज अलर्ट. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळसाठी १४-१५ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’. नैऋत्य मोसमी पावसाचा अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश, पुढील २४ तास अतिवृष्टीची शक्यता.