
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला घेरणार आहे. दुसरीकडे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेऊन विरोधकांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधक सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, महागाई, रोजगार, गैरव्यवहार यासारख्या मुद्यांवर घेरणार आहे. मान्सूनने नऊ दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला आहे. राज्यात 5 जुलैपासून मान्सूनचा जोर वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका १ जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबवणार आहे.
अनेक वर्ष पोलिस दलात सेवा केल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयात 24 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सर्वं पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय हजर होते. या निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना निरोप देताना पोलीस बँड सज्ज करण्यात आला होता.
काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांना पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. पक्षाने पण कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम केले पाहीजे. येणाऱ्या काळात दिल्लीतील आणि राज्यातील नेते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून निर्णय घेतील.
गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या 40 ते 50 हजार लोकांना 5 हजार किलो महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी अडीच हजार किलो तांदूळ शिजवला जातो त्या माध्यमातून 5 हजार किलोच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. वारकऱ्यांची आणि विठ्ठल भक्तांची सेवा केल्याने आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही ही सेवा करतो अशी माहिती जयशंकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव येथून शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तरुणाच अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. सुरेश तुकाराम आर्दड असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहेत. सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा शहरात पावसाला सुरुवात….
हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशारा दिला आहे त्यामुळे वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली…..
पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे….
पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना चांगला फायदा होणार आहे…..
जालना.
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जालना शहरासह तालुक्याच्या विविध भागात दमदार पाऊस
खरीप हंगामातल्या कपाशी सोयाबीन आणि इतर पिकांना मिळणार दिलासा;शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
कल्याण पश्चिम मेहमान मस्जिद परिसरात गुलजार टांगे वाली चाळीतील एका घराला भीषण आग!
शॉर्टसर्किटमुळे लागली आग; संपूर्ण घर जळून खाक
जीवितहानी टळली, मात्र एक व्यक्ती किरकोळ जखमी
तर सिलेंडर ब्लास्ट होण्याच्या भीतीने परिसरात मोठी धावपळ; नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर घराबाहेर फेकले
अग्निशामक दल घटनास्थळी पोहचत आगीवर मिळवलं नियंत्रण…
पुण्यात जलसंधारण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन
शेतकऱ्यानी अंगावर ओतून घेतलं ऑइल
जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक
दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
अधिकारी आणि ठेकेदारांनी 14 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा जनशक्ती शेतकरी संघटनेचा आरोप
कल्याण पश्चिममधील मेहमान मस्जिद परिसरात गुलजार टांगेवाली चाळीतील एका घराला भीषण आग
शॉर्टसर्किटमुळे लागली आग, आगीत संपूर्ण घर जळून खाक
जीवितहानी टळली, मात्र एक व्यक्ती किरकोळ जखमी
सिलेंडर ब्लास्ट होण्याच्या भीतीने परिसरात मोठी धावपळ; नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर घराबाहेर फेकले
अग्निशामक दलानं घटनास्थळी पोहचत आगीवर मिळवलं नियंत्रण
नाशिकमधील चांदोरी येथे डंपरच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या अपघातात मोटरसायकलवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. डंपर चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी नागापूर येथील स्थानिक नागरिकांनी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रस्ता रोको केला आहे.
दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यात जनशक्ती शेतकरी संघटनेकडून जलसंधारण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. 14 कोटींचा भ्रष्टाचार अधिकारी आणि ठेकेदारांनी केल्याचा जनशक्ती शेतकरी संघटनेकडून आरोप करण्यात आला आहे. या भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
मराठीचा मुद्दा चर्चेत असताना मुंबईनजीकच्या मीरा-भाईंदरमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या फेरीवाऱ्याला मनसेकडून चोप देण्यात आला आहे. मसाला डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. मीरा रोडमधील बालाजी हॉटेल समोरील ही घटना आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मुख्यनेते पदाचं नाव बदलून ते पक्षप्रमुख असं करावं, असा आग्रह नेत्यांनी केला आहे. राष्ट्रीय प्रमुख किंवा पक्ष प्रमुख असे नाव त्या पदाला हवे,असा आग्रह अनेक नेत्यांचा होता.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये यासाठी मी जीआर काढलाय का? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारावेत. आणि ठाकरेंचा उजवा हात असलेल्या व्यक्तीनेच हिंदीबाबत हा निर्णय घेतला आहे.”असं म्हणत त्यांनी संजय राऊतांनाही टोला लगावला आहे.
बोगस बियाणे संदर्भात अमरावतीत युवा स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला असून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बियाणे फेकून रोष व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे पंढरपूरच्या पांडुरंगाची दर्शनाची अनामिक ओढ मनामध्ये ठेवत वारीमध्ये सहभागी झाले आहेत. विठ्ठल भक्तीला वयाचे बंधन नसतं हे दिसून आलं आहे. या वारीमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच आनंदाने सहभागी झाले आहेत.
उद्धव ठाकरे घाबरलेल्यांचे शिरोमणी असल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. हिंदीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी जोरदार टीका केली आहे. त्रिभाषा सूत्रीला मान्यता देणारा अहवाल ठाकरे सीएम असताना झाला होता. उद्धव ठाकरे अस्तित्वासाठी घाबरले’ अशी खोचक टीका आशिष शेलारांनी केली आहे.
मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हिंदी सक्तीचा मुद्याकडे मोर्चाचे करण्यात आलेल आवाहन व या भूमिकेकडे पाहून सरकारने घेतलेली माघार यामुळे मनसे सैनिकांनी आनंदच साजरा सुरू केलाय. त्यामुळे सरकारने अखेर या मुद्द्यावरून माघार घेतल्यानंतर रायगड मधील मनसे सैनिकांनी सुद्धा नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी या मराठी शाळेत जाऊन पहिली ते चौथी माध्यमातील विद्यार्थ्यांना आज लाडू देऊन आनंद साजरा केला. यावेळी रोहा तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते.
बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केले आहेत परंतु आरोप करणे सोपे आहे ते सिद्ध होणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीड मधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असे देखील म्हटले आहे.
भाईंदर पूर्वेत २०१२ साली एका व्यक्तीचा अत्यंत निर्घृण खून झाला होता. गळा आवळून, डोक्यात लोखंडी दांड्याने मारहाण करून, धारदार शस्त्रांनी वार करत खून करण्यात आला होता. या प्रकरणातला आरोपी तब्बल १३ वर्ष फरार होता. काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष १ ने अचूक माहितीवरून आणि कौशल्यपूर्ण तपासातून आरोपी गोविंद कुमार याला दिल्लीतून अटक केली आहे. तो गेली अनेक वर्षे दिल्ली व बिहारमध्ये आपली ओळख लपवत राहात होता.
विठ्ठल दर्शनाची आस मनामध्ये ठेवत वारकऱ्यांची वारी दरमजल करत पुढे पुढे सरकत आहे तसतशी वारकऱ्यांची ऊर्जा वाढत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर महिला वारकऱ्यांनी भारुडावर ठेका धरत वातावरण उत्साही केले.
लक्ष्मण हाके यांनी बोलावली पुण्यात ओबीसी OBC समाजाची महत्वाची बैठक. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बोलावली बैठक. ओबीसी आरक्षण टीकवण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करणार. आजपासून गावोगावी जात लक्ष्मण हाके घेतायत OBC समाज्याच्या गाठीभेटी. 4 तारखेला निर्णायक बैठक घेऊन आंदोलनाची पुढची रणनीती जाहीर करणार.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरमधून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर गावोगावी पालखी सोहळ्याचे स्वागत केले जात आहे. काही अंशी वारीचा अनुभव मिळावा या भावनेतून नागरिक वारी सोबत चालत आहेत. शेतात एकत्रित येत भोजनाचा आस्वाद घेत आहेत.
संतोष देशमुख खून प्रकरणात जे बोलत होते ते विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणात गप्प का आहेत? त्यांना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना आज खासदार बजरंग सोनवणे यांनी “आम्हाला लाज वाटली म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो होतो. मात्र जे चार दिवसांनी बोलले, त्यांनाच लाज वाटली की नाही हे मला कळालं” असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा निसटता विजय झाला. महायुतीने 20 जागांपैकी 11 जागांवर आपला विजय संपादन केला तर काँग्रेसने 9 जागांवर आपला विजय संपादन केला.
भाजपविरोधी बोलेल तो देशद्रोही असं सरकारला वाटतं. हे सरकार कसं निवडून आलं ते त्यांनाही कळलं नाही – उद्धव ठाकरेंची टीका
महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यासंदर्भात आझाद मैदानात आंदोलन सुरू असून तेथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत दाखल झाले आहेत.
धाराशिव – तुळजापूरजवळील गाजलेले भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हॉटेलमधील कामगार व काही तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वारंवार घडत असलेल्या घटणेची पोलिसांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे
मुंबईच्या मेट्रो 2 च्या बांगुर नगर मेट्रो स्थानकात मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्याचा हात मेट्रोच्या दरवाज्यात अडकला. . मेट्रो सुरू होणार इतक्यात स्थानकात कार्यरत असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. संकेत चोडणकर यांनी ट्रेन ऑपरेटरला सूटचना दिल्याने मेट्रोचा दरवाजा उघडला आणि मुलचा हात वाचला, तो सुखरूप राहिला.
“संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यामागे शिवसेना आणि शिवसैनिक तर आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षाने, मराठी भाषिकाने आपले पक्षभेद विसरून सहभाग घेतला, त्यांचे मी आभार मानतो. सरकारला शहाणपण सुचलं की नाही, हे येत्या काही दिवसांत कळेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“सर्व बाजूंनी महाराष्ट्राचे लचके तोडणं सुरू आहे. हेदेखील थांबणं गरजेचं आहे. मराठी माणसानेही आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी मी 5 तारखेच्या मेळाव्यात सविस्तर बोलेन,” असं राज ठाकरे म्हणाले.
“सरकारच्या निर्णयानंतर मला संजय राऊतांचा फोन आले. त्यांनी विचारलं की, आता काय करायचं? त्यावर मी म्हणालो की, मोर्चा तर रद्द करावा लागेल. मग ते म्हणाले की आपण एक विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी म्हटलं, घेऊयात. मी माझ्या लोकांशी चर्चा करेन आणि मग ठरवू की काय करायचं? अजून ठिकाण वगैरे काही ठरलं नाही. मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय लेबल लावण्यात काही अर्थ नाही. कारण हा खरा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टीकोनातून याकडे पाहिलं पाहिजे,” असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
“मराठी माणूस एकवटला की काय होतं, हे सरकारला कळलं. पुन्हा अशा भानगडीत सरकार जाणार नाही, अशी मी अपेक्षा करतो. खरंतर या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. दादा भुसे मला म्हणत होते की आमचं ऐकून तरी घ्या. मी त्यांना म्हटलं की, तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही. त्यांचा प्रयत्न त्यांच्याशीच अंगाशी आला,” असं राज ठाकरे म्हणाले.
“काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीची दोन्ही जीआर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं. यासाठी मी जनतेचं आभार मानतो. सगळ्या बाजूंनी तो रेटा आला, त्यामुळे सरकारला जीआर मागे घ्यावं लागलं. यासाठी मी मराठी कलाकार, साहित्यिक, मराठी वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या यांचेही आभार मानतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.
फटाक्यांची आतिषबाजी करत मनसेकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मनसेकडून जल्लोष साजरा केला जात आहे.
काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दुपारी दोन वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई इथं कुणाल पाटलांचा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणालचा आणि हजारो समर्थकांचा प्रवेश होणार आहे.
कांदिवलीतील केईएस शाळेत बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. कांदिवली पश्चिम इथल्या केईएस शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. धमकीनंतर कांदिवली पोलिसांचं पथक शाळेत पोहोचलं. परंतु तपासानंतर पोलिसांना काहीही सापडलं नाही. याविषयी पोलिसांनी सांगितलं की, “ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती, सध्या वातावरण शांत आहे. शाळेत कोणत्याही प्रकारचा बॉम्ब ठेवलेला नाही.”
नाशिक – हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मनसेनं जल्लोष केला. ढोलताशाच्या गजरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 5 जुलै रोजी विजयी मोर्चासाठी आणि सभेसाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते नाशिकहून मुंबईला जाणार आहेत.
हिंदी सक्ती जीआर विरोधात 5 जुलै रोजी मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष मिळून आंदोलन करणार होते. पण त्याआधीच सरकारने हिंदी सक्ती जीआर रद्द केला. त्यानंतर चेंबूरमधील महानगरपालिका शाळेतील मुलांनी फलकावर ‘धन्यवाद राज काका’ लिहिलं आहे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
मधुकर शेंडे वय ५७ वर्षे आणि तुषार बावनकुळे वय वर्षे २५ अशी या दोघांची नावे… साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मौजे बरड येथे घडली घटना… संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रात्री मुक्कामी असताना घडली घटना… रथाच्या मागे दिंडी क्रमांक 26 मधील वारकरी..26 नंबरची दिंडी नागपूर जिल्ह्यातील विहार तालुक्यातील…वासुदेव महाराज टापरे रा.काटोल यांच्या दिंडी मधील हे दोन्ही वारकरी होते
894 पैकी 868 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क… 18 संचालकपदांसाठी आज निकालाची उत्सुकता शिगेला… नाना पटोले, प्रफुल पटेल आणि परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला… सत्ताधाऱ्यांचा बालेकिल्ला तुटणार का? की पुन्हा वर्चस्व?
बांधकाम साईटवर तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेल्याने पाण्यात बुडाल्याची माहिती… काल दुपारपासून तिघे होते बेपत्ता, कृत्रिम तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्याने लागला शोध… तलावातून तिघांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू, अग्निशामक दलाच्या जवानांकडून होते शोध कार्य सुरू… आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू…
ठाकरे बंधूंचा मोर्चा होता म्हणून सरकारने जीआर रद्द केला. ठाकरे बंधूंच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनं पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
यंदा मान्सूनने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले असून, संपूर्ण देश विक्रमी वेळेत व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, साधारणतः ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापणारा मान्सून यंदा ९ दिवस आधीच, म्हणजेच २९ जून रोजी सर्वदूर पोहोचला आहे. ही शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात मान्सून ५ जुलैपासून अधिक वेग घेण्याची शक्यता असून, तोपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नाशिकमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या बिडी कामगार परिसरातील तीन अल्पवयीन मुलांचा बांधकाम साईटवरील एका कृत्रिम तलावात बुडून मृत्यू झाला आहे. काल दुपारपासून हे तिघे बेपत्ता होते. तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आढळून आल्याने त्यांचा शोध सुरू झाला. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोधकार्य सुरू केले आणि तलावातून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, आडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबई मेट्रो-३ मार्गिकेवरील विधान भवन मेट्रो स्थानक उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसात या स्थानकातील जिन्याच्या भिंतीतून पाणी गळण्यास सुरुवात झाली आहे. ही गळती थांबवण्यासाठी चक्क प्लॅस्टिक गुंडाळण्यात आल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी गेटवे चौक स्थानकात पाणी साचणे आणि गिरगाव स्थानकाजवळील रस्ता खचणे अशा घटना घडल्या आहेत. आता विधान भवन स्थानकाच्या परिसरातील रस्त्याचा मोठा भाग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे या परिसरातील सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. संबंधित सरकारी यंत्रणांनी यावर त्वरित कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेळगाव येथे एका अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दारुच्या नशेत बापाने आपल्याच दहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केली. गौरी जाधव असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून ती चौथ्या इयत्तेत शिकत होती. दारूच्या व्यसनामुळे वडील ज्ञानेश्वर जाधव यांच्यापासून वेगळी होऊन गौरी आपल्या आजीकडे राहत होती. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी बापाने मृतदेहाच्या आजूबाजूला हळदीकुंकू टाकले होते, ज्यामागे नेमका काय उद्देश होता, हे अस्पष्ट आहे.
उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपातत प्रवेश करणार आहे. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे करणार भाजपात प्रवेश करणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सरींवर पाऊस सुरु आहे. जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. किनारपट्टी भागामध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत आहेत. ग्रामीण भागामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा भात लावणी कामांमध्ये व्यस्त झाला आहे.
मुंबई मेट्रो-३ मार्गिकेच्या विधान भवन स्थानकात उद्घाटन होण्याआधीच पाणी गळती सुरु झाली आहे. विधान भवन इमारतीला खेटून असलेल्या या स्थानकातील जिन्याच्या भिंतीतून प्लॅस्टिक गुंडाळून पाणी थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यात 5 जुलैपासून मान्सून सक्रीय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. संपूर्ण देश व्यापण्याची मान्सूनची तारीख ही 8 जुलै आहे. मात्र यंदा नऊ दिवस आधीच 29 जून रोजी मान्सूनने अवघा देश व्यापला आहे.
उद्धव ठाकरे घाबरलेल्यांचे शिरोमणी असल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. हिंदीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांनी जोरदार टीका केली आहे. त्रिभाषा सूत्रीला मान्यता देणारा अहवाल ठाकरे सीएम असताना झाला होता. उद्धव ठाकरे अस्तित्वासाठी घाबरले’ अशी खोचक टीका आशिष शेलारांनी केली आहे.