AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : दुधाचे नमुने घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे संपूर्ण टीम शिरपूरमध्ये

| Edited By: | Updated on: Oct 24, 2025 | 7:57 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : दुधाचे नमुने घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे संपूर्ण टीम शिरपूरमध्ये
Breaking news

पुणेकरांना यंदा दिवाळीच्या वायू प्रदुषणातून काही प्रमाणात दिलासा मिळाला. 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 132 होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीच्या दिवशी AQI 201 होता. ही सुधारणा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. नगर विकास विभागाने जालनाच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे. जळगावातील साई ज्वेलर्स या दुकानातून तीस तोळे सोने घेऊन फरार असलेल्या बंगाली कारागिराला पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत सुनील कुंडू असे अटकेतील बंगाली कारागिराचे नाव आहे. उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी येथून त्याला अटक करण्यात आली आहे. 2017 मध्ये गुन्हा घडल्यापासून हा बंगाली कारागिर फरार होता.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Oct 2025 05:55 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात वळवाच्या पाऊसाची जोरदार हजेरी

    पिंपरी चिंचवड शहरात वळवाच्या पाऊसाची जोरदार हजेरी लावली.  मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकर यांची तारांबळ उडाली. सकाळपासून वातावरण उष्ण होतं आणि अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकड्यापासून सुटका झालीय.

  • 23 Oct 2025 05:36 PM (IST)

    दुधाच्या भेसळीची बातमी प्रसारित झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून झाले जागे

    धुळ्यातील शिरपूर येथील दुधाच्या भेसळीची बातमी प्रसारित झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संबंधित भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या दुकानातील दुधाचे नमुने घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे संपूर्ण टीम शिरपूरमध्ये पोहोचली.  या नमुन्यांची तपासणी करून या दुधात खरंच भेसळ होती का याची शहानिशा केली जाणार आहे.

  • 23 Oct 2025 05:20 PM (IST)

    ट्रम्प-पुतिन बैठक रद्द झाल्यानंतर अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंध लादले

    बुडापेस्टमधील ट्रम्प-पुतिन बैठक रद्द झाल्यानंतर, अमेरिकेच्या ट्रेझरी प्रवक्ते स्कॉट बेसंट म्हणाले की ट्रम्प यांनी रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.

  • 23 Oct 2025 05:09 PM (IST)

    ट्रम्प तीन आशियाई देशांना भेट देणार

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “पुढच्या आठवड्यात मी मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा दौरा करणार आहे. दक्षिण कोरियामध्ये मी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहे. आमची खूप लांब बैठक होईल ज्यामध्ये आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा करू.”

  • 23 Oct 2025 04:55 PM (IST)

    दिल्ली: कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन, पंतप्रधान कार्यालय आणि कृषी मंत्रालयाला दिलं निवेदन

    भारतात कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित धोरण ठरवावे यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन केलं आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चार शेतकरी सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले, नवनाथ फराटे यांनी थेट दिल्लीत जाऊन आंदोलन केले आहे.

  • 23 Oct 2025 04:42 PM (IST)

    अहिल्यानगर: सभापती राम शिंदे यांनी घेतली राजेंद्र फाळके यांची भेट

    अहिल्यानगर: सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची भेट घेतली आहे. राजेंद्र फाळके यांनी सात वर्ष जिल्हाध्यक्ष पद सांभाळून नुकताच जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे या भेटील खास महत्व प्राप्त झाले आहे. या वेळी कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके यांच्यासह परिवारातील इतर सदस्य, कर्जत तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते होते उपस्थित.

  • 23 Oct 2025 04:27 PM (IST)

    प्रवीण दरेकर यांनी बहिणीच्या घरी साजरी केली भाऊबीज

    भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बहिणीच्या घरी भाऊबीज साजरी केली. यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘हा एक कौटुंबिक उत्सव आहे आणि काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देतो.’ यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या आईनेही त्यांना आशीर्वाद दिला.

  • 23 Oct 2025 04:11 PM (IST)

    रायगड: किल्ले रायगडाच्या प्रतिकृतीशेजारी मंत्री अदिती तटकरेंचा बॅनर

    दिवाळीत गडकिल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग सुरू असते. या किल्ल्यांमधून ही मुले अनेक किल्ल्यांच्या प्रतिमा साकारत असतांत. यंदा रायगडच्या रोहा तालुक्यातील तळाघर मध्ये शिव समर्थ नगर येथील चिमुकल्यांनी दुर्गराज रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. रायगड किल्ला अतिशय सुंदर पद्धतीने या मुलांनी प्रतिकृती साकारली आहे, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या बालकलाकारांनी मंत्री अदिती तटकरे यांचा या किल्ल्यावर चक्क बॅनर लाऊन रायगड जिल्ह्यांचे राखणदरा असा उल्लेख केला आहे.

  • 23 Oct 2025 03:59 PM (IST)

    सोन्याच्या दरात पुन्हा उसळी, चांदीचे दर स्थिर

    जळगावच्या सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी

    सोन्याचे भाव प्रति तोळा 1 हजार रुपयांनी वाढले

    सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 27 हजार 720 रुपयांवर

    तर चांदीचे दर स्थिर, अद्याप कोणतीही भाववाढ नाही

  • 23 Oct 2025 03:56 PM (IST)

    जळगावच्या चोपडा शहरात गॅरेजला भीषण आग

    जळगावातील चोपडा शहरात कारगिल चौकाजवळ मोटरसायकल गॅरेजच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गॅरेजमधील साहित्य जळून चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या गॅरेजला  शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

  • 23 Oct 2025 03:40 PM (IST)

    माणगाव परिसरात वाहतूक कोंडी

    मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.  ढालगर फाटा ते माणगाव दरम्यान तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

  • 23 Oct 2025 03:37 PM (IST)

    कल्याणमध्ये दोन गटात राडा, 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

    कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरण

    पोलिसांकडून  20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

    बुधवारी रात्री फटाक्याचे स्टॉल लावण्यावरून झाला होता राडा

    दोन्ही गटांकडून  पोलिसांसमोरच करण्यात आली दगडफेक

    मारहाणीत काही जण जखमी, परिसरात तणावाचे वातावरण

  • 23 Oct 2025 02:00 PM (IST)

    बीडमध्ये जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार, मुंडे भावंडांना मराठवाड्यातून आव्हान

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे. या निवडणुकीत मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याची माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली आहे.

  • 23 Oct 2025 01:57 PM (IST)

    माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांची एकत्रित भाऊबीज साजरी

    दिवाळीच्या पाडव्यानंतर आज सर्वत्र भाऊबीज साजरी करण्यात येत आहे. राजकीय घरांमध्येही सणाचा उत्साह पाहायला मिळात आहे. अमरावतीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळणी घालत एकत्रितपणे भाऊबीज साजरी केली. या प्रसंगी दोघांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या

  • 23 Oct 2025 01:28 PM (IST)

    उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेही भाऊबीजेच्यानिमित्त बहीण जयजयवंती ठाकरे- देशपांडेंच्या निवासस्थानी

    उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेही  बहीण जयजयवंती ठाकरे- देशपांडेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. भाऊबीजेच्यानिमित्ताने हे दोघेही भाऊ बहिणीच्या घरी पोहोचले आहेत. जयजयवंती या राज ठाकरेंच्या सख्ख्या बहीण आहेत तर अर्थातच उद्धव ठाकरेंच्या चुलत बहीण आहेत. दोघे भाऊ अनक वर्षांनी एकत्र बहिणीच्या घरी भाऊबीज साजरी करणार आहेत.

  • 23 Oct 2025 01:11 PM (IST)

    उद्धव ठाकरे चुलत बहीण जयजयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी

    उद्धव ठाकरे चुलत बहीण जयजयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आज भाऊबीज साजरी करण्यासाठी ते बहीण जयजयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आहेत. जयजयवंती या राज ठाकरेंच्या सख्ख्या बहीण आहेत.

  • 23 Oct 2025 01:01 PM (IST)

    अमरावतीत दिवाळीच्या दिवशीच हिट अँड रन; 24 तासांनंतरही आरोप फरारच

    अमरावती शहरात दिवाळीच्या दिवशीच हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं असून 24 तासांनंतरही फरार आरोपींचा शोध लागला नाही. बोलेरो गाडी चालकाने बेधुंद अवस्थेत दिवाळीच्या रात्री दोन मुलींना चिरडलं होतं. या दोघींवर अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

  • 23 Oct 2025 12:53 PM (IST)

    पुणेकर म्हणून माझा धंगेकरांना पाठिंबा- निलेश नवलखा

    “पुणेकर म्हणून माझा धंगेकरांना पाठिंबा आहे. व्यवसाय करायचा आहे म्हणून जैन समाजातील लोक बोलायला घाबरतात. मुरलीधर मोहोळ यांच्या जवळची लोक सोशल मीडियावर जेलमध्ये टाकण्याच्या मला धमक्या देत आहेत,” अशी तक्रार निलेश नवलखा यांनी केली.

  • 23 Oct 2025 12:47 PM (IST)

    लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं करू- जरांगे पाटील

    “आज भाऊबीजेच्या दिवशी आम्ही यादी तयार करतोय. लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं करू. अनेक ठिकाणी सरकारपेक्षा मोठे अधिकारी झाले आहेत. जे अधिकारी काम करत नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत म्हणता येणार नाही, तो तात्पुरता आनंद आहे. फडणवीस साहेब प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. तसा त्यांनी धनगर समाजाला देखील तात्पुरता आनंद दिला,” अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.

  • 23 Oct 2025 12:36 PM (IST)

    जैन समाज भरभरून भाजपला मतं देतात, त्यांनाच हे त्रास देतात- निलेश नवलखा

    “माझी काम बंद पाडण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला. मी जैन आहे म्हणून मोहोळ यांनी मला त्रास दिला. श्रीनाथ भिमालेंनी धंगेकरांवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली. जैन समाज भाजपला भरभरून मत देतो. जे मत देतात त्यांनाच हे त्रास देतात का,” असा सवाल निलेश नवलखा यांनी केला.

  • 23 Oct 2025 12:21 PM (IST)

    पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार; प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट

    पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार आहेत, अशी पोस्ट प्रकाश महाजन यांनी फेसबुकवर लिहिली आहे. ‘क्या जमाना आ गया. स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहे, एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकू ताई, दुसरं कोणी नाही’, अशी त्यांची पोस्ट आहे.

  • 23 Oct 2025 12:07 PM (IST)

    मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांवर निशाणा

    “आरोप करणाऱ्यांना चावी देणारं कुणी वेगळं असेल. राज्यस्तरावर आमची महायुती आहे. आरोप करणाऱ्यांचे कागद आधी तपासा. व्हायरल व्हिडीओप्रकरणी स्पष्टीकरण दिलंय, ” असं म्हणत आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांवर निशाणा साधला आहे.

  • 23 Oct 2025 11:57 AM (IST)

    जळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस; फटाका विक्रेत्यांचे मोठे नुकसान

    जळगाव शहरात काल सायंकाळी तब्बल एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे दिवाळीच्या तोंडावर फटाका विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवतीर्थ मैदानावर दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी थाटण्यात आलेल्या दुकानांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे सुमारे १० ते १५ फटाक्यांच्या दुकानांचे पत्रे उडून गेले, तर दुकानात पाणी शिरल्यामुळे लाखो रुपयांचा फटाक्यांचा माल भिजून खराब झाला. याच मैदानावर असलेल्या तिबेटियन लोकांच्या स्वेटर आणि गरम कपड्यांच्या विक्रीच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने उडालेले पत्रे कुठल्याही विक्रेत्याच्या अंगावर न पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

  • 23 Oct 2025 11:39 AM (IST)

    प्रताप सरनाईक सिल्वर ओकवर, शरद पवारांची भेट घेणार

    राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, अशी माहिती यावेळी सरनाईक यांनी दिली. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • 23 Oct 2025 11:29 AM (IST)

    जोगेश्वरीत भीषण आग, काही जण अडकले

    जोगेश्वरीतील जेएमस बिझनेस सेंटरला भीषण आग लागली आहे. यात काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.

  • 23 Oct 2025 11:17 AM (IST)

    ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र, दिवाळी रांगोळीतून राजकीय लक्षवेध

    ठाण्यातील वर्तक नगर येथील ब्राह्मण विद्यालयाच्या प्रांगणात यंदाच्या दिवाळीनिमित्त एक खास आणि लक्षवेधी रांगोळी प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने आयोजित या भव्यदिव्य रांगोळी प्रदर्शनात, राजकारणातील महत्त्वाचा संकेत देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंना एकत्र साकारण्यात आले आहे. या रांगोळीत बाळासाहेब ठाकरे यांचीही प्रतिकृती साकारून एक भावनिक आणि राजकीय संदेश देण्यात आला आहे. ‘येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंचे अनुबॉम्ब फुटतील आणि सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू आतापासून सरकली आहे,’ असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी माणूस, महाराष्ट्र आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे.  या रांगोळी प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • 23 Oct 2025 11:09 AM (IST)

    रांगोळीतून साकारले दिलीप प्रभावळकर यांच्या अजरामर चित्रपट पात्र

    सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या चित्रपट जीवनातील गाजलेल्या भूमिकांना रांगोळीच्या रूपाने जिवंत करण्यात आले. संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्ट, कांजूरमार्ग यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा विषय दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या विविध भूमिकांवर आधारित होता. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये कलाकारांनी श्री. प्रभावळकर यांनी साकारलेले ‘तात्या विंचू’, ‘चिमणराव’ आणि ‘बाल गंधर्व’ यांसारखी विविध प्रसिद्ध पात्रे रांगोळीच्या रंगांचा आणि रेषांचा अप्रतिम वापर करून हुबेहूब साकारली. या उपक्रमाने दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाला अनोखी मानवंदना दिली.

  • 23 Oct 2025 10:51 AM (IST)

    नांदेड – अतिवृष्टीमुळे गुलाबाचा सुगंध हरवला

    नांदेड –  अतिवृष्टीमुळे गुलाबाचा सुगंध हरवला,  शासनाकडून, फुलशेतीला कोणतीही मदत नाही. फुल शेतीचे पंचनामे ही केले नाही अशी माहिती शेतकऱ्याने दिली.   झाडे वाळून जात असल्याने पूजेला सुद्धा फुल नाही,  नांदेडच्या अर्धापूर येथील साईनाथ जाधव यांनी व्यथा मांडली

  • 23 Oct 2025 10:41 AM (IST)

    जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर रात्री टँकर मधून ऑइल गळती होऊन 20 ते 22 दुचाकी घसरल्या

    पिंपरी चिंचवड –  जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर रात्री टँकर मधून ऑइल गळती होऊन 20 ते 22 दुचाकी घसरून पडल्या.  फुगेवाडी ते देहूरोड दरम्यान एका टॅंकर मधून ऑइल गळती होऊन जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

  • 23 Oct 2025 10:18 AM (IST)

    जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शिवतीर्थ मैदानावरील फटाका विक्रेत्यांचे मोठे नुकसान

    जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शिवतीर्थ मैदानावरील दुकान थाटलेल्या फटाका विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल संध्याकाळी जळगाव शहरात तब्बल एक तास  वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.  शिवतीर्थ मैदानावर दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत.  वादळी वाऱ्यामुळे 10 ते 15 दुकानाचे फटाक्याच्या दुकानाचे पत्रे उडून गेले तसेच मुसळधार पावसामुळे फटाक्यांचा माल देखील भिजून नुकसान झाले .

  • 23 Oct 2025 10:08 AM (IST)

    मतभेद असले तरी आम्ही आमची नौका पार करू – संजय राऊत

    मराठी महापौर होण याला आमचं प्राधान्य आहे, मतभेद असले तरी आम्ही आमची नौका पार करू  असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

  • 23 Oct 2025 10:05 AM (IST)

    अमरावती समृद्धी महामार्गावर टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

    अमरावती समृद्धी महामार्गावर टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 106 जवळ ही दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

    मात्र ट्रकला आग लागून ट्रक उलटल्याने ट्रक मधील टोमॅटो रस्त्यावर पसरले. घटनेची माहिती मिळताच धामणगाव येथील नगर परिषदेचे अग्निशामक बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

  • 23 Oct 2025 09:59 AM (IST)

    नाशिकमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णात वाढ

    ऑक्टोबर हिट मुळे हवामानात चढ-उतार सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. ऑक्टोबर हिटचे ऊन आणि त्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संमिश्र वातावरण आहे. सर्दी ताप खोकला घशातील खवखव यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिकांना घेरले आहे. त्यातच दिवाळीच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी संसर्गात झपाट्यांने वाढ झाली आहे.

  • 23 Oct 2025 09:50 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांचा विदर्भ दौऱ्यावर

    पुढच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांचा विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिंदे हे यवतमाळ जिल्ह्यात असतील. पक्ष बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि विकास कामांच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

  • 23 Oct 2025 09:30 AM (IST)

    भाऊबीजनिमित्त दोन ठाकरे एकत्र

    आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पुन्हा येणार एकत्र येणार आहेत. शिवतीर्थ या ठिकाणी ठाकरे बंधुची भाऊबीज होईल. आज 10 वाजल्यानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थ या ठिकाणी एकत्र येणार. बहीण उर्वशी ठाकरे यांच्या सोबत अमित ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे यांची भाऊबीज होणार.

  • 23 Oct 2025 09:19 AM (IST)

    गोंदियात परतीच्या पावसाचा कहर

    परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक जमीनदोस्त झाले. पंचनामे सुरू झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुके नुकसानग्रस्त घोषीत करण्याची आणि तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • 23 Oct 2025 09:10 AM (IST)

    गुळ पावडर कारखानदाराच्या विरोधात ढोकी परिसरातील शेतकरी आक्रमक

    गुळ पावडर कारखानदाराची संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्याचे शोषण करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 2400 रुपये प्रति टन भाव देणे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे. कारखानदाराने शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार रुपये आणि एफ आर पी नुसार 3550 रुपये ऊसाला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारखानदारांच्या मागे ED लावा त्यांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • 23 Oct 2025 09:00 AM (IST)

    नाशिकमध्ये ऊन सावलीचा खेळ

    शहरातील वातावरणात मागील दोन दिवसांपासून कमालीचा बदल दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. नाशिकमध्ये उकाडा वाढला असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.वातावरणात अचानक बदल झाल्याने पहाटेची व रात्रीचा गारवा गायब झाला आहे.

  • 23 Oct 2025 08:54 AM (IST)

    गुळ पावडर कारखानदाराच्या विरोधात ढोकी परिसरातील शेतकरी आक्रमक

    गुळ पावडर कारखानदाराची संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्याचे शोषण करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. 2400 रुपये प्रति टन भाव देणे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे. कारखानदाराने शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार रुपये आणि एफ आर पी नुसार 3550 रुपये ऊसाला भाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी. कारखानदाराच्या मागे ED लावा त्यांची चौकशी करा,कारवाई करा अशी मागणी.

  • 23 Oct 2025 08:38 AM (IST)

    कल्याण जवळ मोहने परिसरात मध्यरात्री राडा

    कल्याणमध्ये मोहने पोलीस चौकी जवळच दोन गट एकमेकांना भिडले. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारी झाली. यात 4 ते 5 जण जखमी झाले.पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल. परिस्थिती आणली नियंत्रणात. परिसरात तणावपूर्ण शांतता. पोलिसांकडून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

  • 23 Oct 2025 08:27 AM (IST)

    दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ फलक कल्याणमध्ये

    ​नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्रांचे आंदोलन आता नव्या टप्प्यात पोहोचलं आहे. कल्याणच्या तिसगाव परिसरात ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ 36 किमी’चे मार्गदर्शक फलक लागले आहेत. भूमिपुत्रांचा थेट कृतीतून सरकारला संदेश.​’श्री तिसाई ग्रामस्थ मंडळ व नियोजन समिती,तिसगाव’च्या सौजन्याने लावलेल्या फलकामुळे नामकरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत.

  • 23 Oct 2025 08:21 AM (IST)

    मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती?

    ऐन दिवाळीच्या उत्साहात आणि ऑक्टोबर हीटच्या तडाख्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबईत सध्या धूरकट वातावरण आहे, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 166 वर पोहोचला आहे तर हायवेवर दृष्यमानता कमी झालीये.

Published On - Oct 23,2025 8:19 AM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.