
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे कालपासून बीड दौऱ्यावर आहेत. आज विविध विकास कामांची पाहणी करणार असून दोन ठिकाणी मेळावे होणार आहेत. सर्वांचं लक्ष वडवणी शहरात होत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र आणि 35 वर्षे सोबत राहिलेले बाबरी राजाभाऊ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे आमदार धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत आहे. कार्यक्रमाच्या बॅनर आणि पत्रिकेवर कुठेही नाव किंवा धनंजय मुंडेंचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदेच्या काठावरील 33 गावांमधील 21 हजार लोकांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी सीएसआर फंडातून स्पीड बोट देण्यात आली होती. ही बोट ॲम्बुलन्सला दिवसाला 70 लिटर पेट्रोल तर वर्षाकाठी 98 लाखांचा खर्च येत होता. त्यामुळे आरोग्य विभागाने ही बोट ॲम्बुलन्स परत देण्याचा निर्णय घेतला आहे.
एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी
जखमी अवस्थेत तरुणावर उपचार सुरू
तरुणाने उडी का मारली अद्याप कारण अस्पष्ट
रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती
पोलीस घटनास्थळी दाखल
पाथर्डीमध्ये तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शाळेतीलच शिक्षकाने अत्याचार केल्याचा आरोप
पाच जणांविरोधात पोक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल
वर्ध्यात 16 लाख रुपये किमतीचा 400 ग्रॅम एम.डी.अमली पदार्थ जप्त
एमडी अमली पदार्थासह अग्नीशस्त्रही जप्त
मुंबईतील दोन महिलांसह पाच आरोपींना घेतले ताब्यात
पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
एनडीए 12 ऑगस्टपर्यंत उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार जाहीर करू शकते. सूत्रांचे म्हणणे आहे की संसदेचे पावसाळी अधिवेशन वेळेपूर्वी तहकूब केले जाऊ शकते. 12 ऑगस्ट रोजी क्रीडा विधेयक मंजूर झाल्यानंतर अधिवेशन तहकूब केले जाऊ शकते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप खासदार संबित पात्रा यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, रोड रेज होतो पण राहुल गांधी निवडणुकीच्या रेजची भाषा बोलत आहेत. ते निवडणूक आयोगाला धमकावत आहेत.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत म्हटले आहे की, “महाराष्ट्रात 5 महिन्यांत 5 वर्षांपेक्षा जास्त मतदार जोडले गेले तेव्हा आमचा संशय वाढला आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदानात मोठी वाढ झाली.”
नवीन शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत एनसीईआरटीने पायाभूत टप्प्यासाठी आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार केला आहे. त्यावर आधारित, एनसीईआरटीने नवीन पुस्तके आणि अध्यापन साहित्य तयार केले आहे. वेळोवेळी, विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ञांकडून या पुस्तके आणि संसाधनांबद्दल सूचना आणि अभिप्राय प्राप्त होतात.
मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवणार आहेत. जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रीपद रिक्त आहे.
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. दहीहंडी-अनंत चतुर्दशी ऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्ताने मुंबई शहरासह उपनगरातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या डीजीआयपीआर विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. कबुतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे. तज्ज्ञ समिती गठीत करुन सखोल अभ्यास करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची रक्षण करणं महापालिकेचं कर्तव्य आहे. कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं.
मुंबईतील चारकोप येथे एकविरा स्कूल ( मदर टेरेसा इंग्लिश स्कूल ) येथे पहिलीपासून हिंदी सक्ती करून शिकवली जात आहे,विभागप्रमुख दिनेश साळवी संतापले असून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापकाला दम दिला आहे.
कबुतर खाने बंद करण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झाल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
vvpat मशीन काढून टाकत असतील तर त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकावे होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान, दूध का दूध पाणी का पाणी करून टाकावे असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
आता काँग्रेस पक्षात इन्कमिंग सुरु झालं आहे, काँग्रेसला आता शक्ती लाभणार आहे असे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी म्हटले आहे. बाबाजानी दुराणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानिमित्त ते बोलत होते.
काँग्रेस नेत्यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन मी पक्षप्रवेश केला आहे, या पुढे दोनच पक्ष राहणार आहेत असे बाबाजानी दुराणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना दिसत नाही, त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल. किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल असा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टिका केली आहे.
महाराष्ट्रात पाच महिन्यात मतदार वाढल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लोकसभेत विजय मग विधानसभेत पराभव कसा, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला.
एकाच व्यक्तीचे युपी, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मतदान असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
शहरातील नव्यानं सादर झालेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी बनसोडे पालिकेत आले होते. मात्र पालिकेचे आयुक्त शेखर सिंह हजर नव्हते, ते विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला होते. परंतु इतर अतिरिक्त आयुक्तांनी उपसभापती पदाचा प्रोटोकॉल राखायला हवा होता. तसं न घडल्यानं बनसोडे चांगलेच संतापले. त्यामुळं बनसोडेंवर पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आयुक्तांचा निषेध करण्याची वेळ आली
बडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा आज अजित दादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, आमदार धनंजय मुंडेंना डावलून होतोय पक्षप्रवेश. बीडच्या वडवणी शहरात आज सायं.5:30 वाजता होतोय पक्षप्रवेश सोहळा.
– आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार.
धाराशिव मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आलं आहे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना प्रश्न सोडवण्याचं बावनकुळेंनी आश्वासन दिलं आहे.
मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामसेवकाला कानाखाली मारेल असं वक्तव्य केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी या घटने विरोधात मूक मोर्चा आयोजित केला होता. दरम्यान, आजचा मूक मोर्चा ग्रामसेवक संघटनांकडून तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी ग्रामसेवकांकडून कळ्या फिती बांधून जिल्हा परिषदमध्ये आंदोलन करण्यात आले होते.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंड कडे रवाना झाले आहेत. मुंबई येथून मंत्री गिरीश महाजन हे रवाना झाले असून उत्तराखंड येथील दुर्घटनेच्या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविक तसेच पर्यटकांचा आढावा घेणार आहेत.महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार
गोव्याच्या ओबीसी महासंघाच्या अधिनेशनात मुख्यमंत्री फडणवीस सर्वांशी संवाद साधत आहेत. OBC समाज देशाचा कणा असल्याचं त्यांनी म्हटलं. “सातत्याने माझा संबंध ओबीसी महासंघाशी येत असतो तसेच त्याच्या विकासासाठी काम करणे गरजेचं आहे.” असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
जळगाव बाजार समितीच्या शिवसेना ठाकरे गटाचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध १३ संचालकांनी अविश्वास ठराव आणला असून हे सर्व संचालक सहलीवर रवाना झाले आहेत. अविश्वास ठरावामुळे उद्धव सेनेच्या हातातून बाजार समितीही जाणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे
सांगलीच्या मिरजेमध्ये जरांगे पाटील यांची मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू आहे. मुंबईमध्ये 29 ऑगस्टला मोर्चा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मिरजेमध्ये आज मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची जरांगे पाटील संवाद साधत आहेत.
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आज सोलापुरात विणकर बांधवांकडून हातमाग दिन साजरा होत आहे. शहरातील विणकर बागेत हातमागाची पूजा करुन हातमाग दिन साजरा करण्यात आला. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया या भक्तीगीताची निर्मिती या हातमागाच्या अनुभवातूनच आल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 2015 साली केली होती
परळीतील श्रीक्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा सादरीकरण आणि चर्चा झाली. बैठकीसाठी आमदार धनंजय मुंडेंसह आमदार संदिप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचा विकास आराखडा सादरीकरण आणि चर्चा सुरू आहे.
कोवीड काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात घोटाळा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बनावट कंपनीच्या माध्यमातून जवळपास 12 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे चौकशी समितीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
निवडणुकांसाठी भाषेचं राजकारण होत असल्याचं प्रविण दरेकर यांनी नाव न घेता दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका केली. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना दरेकर यांनी भाजपमध्ये परप्रांतिय नेते कसे मराठी अस्खलित बोलतात, आणि मराठी भाषेसाठी भाजपचं योगदान किती मोठं आहे याचाही हवाला त्यांनी दिला.
सगळं करायचंय जादूची कांडी नाही माझ्याकडे पण, नाहीतर मी जातो असा संताप अजितदादांनी बीडमध्ये व्यक्त केला. मी पालकमंत्री होऊन कामं करतोय, निधी आणतोय. एकेक होईल सगळं करायचं आहे. बीडकरांनो मला सहकार्य करा मी तुम्हाला सहकार्य करतो. नाहीतर मी आपलं जातो असं म्हणत अजित दादा नागरिकांनी रस्त्याचे काम करा असं सांगितल्यामुळे संतापल्याचं पाहायला मिळालं.
मात्र बीड जिल्ह्यात सध्या सर्वत्र विकास कामांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
– मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून सध्या टीकेची झोड उठते आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे रायगड दौऱ्यावर येत असून, पळस्पे फाटा येथून महामार्गाच्या पाहणीला सुरुवात होणार आहे.
पाकिस्तान जोपर्यंत आपल्या विरोधातील दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्या संबंध न ठेवणं हीच देशभक्तीची खरी व्याख्या, तोच सच्चा देशभक्त असेल – उद्धव ठाकरेंनी सुनावलं.
गद्दारांच्या मताला मी किंमत देत नाही , असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे दिल्लीत येण्यावरून एकनाथ शिंदेंनी काल टीका केली होती, त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव यांनी हे प्रत्युत्तर दिलं.
इंडिया आघाडीच्या बैठकीत काय चर्चा होणार हे सांगतो. लोकसभेनंतर आम्ही पहिल्यांदा भेटणार आहोत, मध्यंतरी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. संसदेच्या अधिवेशनावर चर्चा झाली. आजही कुणाला वेगळे विषय बोलायचे असतील तेव्हा समोर आल्यावर बोलू – उद्धव ठाकरे
जळगाव बाजार समितीच्या शिवसेना ठाकरे गटाचे सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध 13संचालकांनी अविश्वास ठराव आणला आहे
13 संचालक सहलीवर रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. बंड करण्याच्या तयारीत असलेल्या संचालकांमध्ये ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या संचालकांचा देखील समावेश आहे.
गडचिरोलीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा मुलांच्या अंगावर ट्रक चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी चक्काजाम केला असून अपघातस्थळावरुन ट्रक घेऊन चालक पसार झाला आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली इथं ही घटना घडली.
अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाम भूमिका मांडली आहे. शेतकरी, पशुपालक, मच्छिमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी तडजोड करणार नाही, असं ते म्हणाले.
मुंबई हायकोर्टात दादरच्या कबुतरखान्याशी संंबंधित रिट याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महापालिकेकडून कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली नाही. आंदोलकांनी अर्धवट फाडलेली ताडपत्री जैसे थेच आहेत.
कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात घोटाळा झाल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. बनावट कंपनीच्या माध्यमातून जवळपास 12 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं चौकशी समितीच्या तपासात निष्पन्न झालं आहे. नाशिक आणि मालेगावला आयसीयू उभारणीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका आहे.
तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी औषध विभागातील कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने बनावट औषध परवाना आणि कागदपत्रे सादर करून बनावट कंपनी दाखविल्याचंही तपासात उघडकीस झालं आहे.
अजित दादांकडून बीडमध्ये विकासकामांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान ते म्हणाले, “सगळं करायचंय, जादूची कांडी माझ्याकडे पण नाही. मी निधी आणतोय, काम करतोय. बीडकरांनो सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो.” बीडकरांकडून रस्त्यांच्या कामाची अजित पवारांकडे मागणी करण्यात आली.
उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगावच्या पाळधीचे 15 पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. 15 पर्यटकांसोबत गेल्या 36 तासांपासून संपर्क झाला नव्हता. मंत्री गुलाबराव पाटलांनी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती दिली. सर्व पर्यटकांना गावी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.
दौंड तालुक्यातील यवत गावात हिंसाचारामुळे लावण्यात आलेली जमावबंदी पुणे जिल्हाधिकारी यांनी पूर्णपणे उठवली आहे. मंगळवारी 5 ऑगस्ट पासून जमावबंदीमध्ये शिथिलता आणली होती. सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत बाजारपेठा चालू ठेवल्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र आता यवत पूर्ण शांतता असल्याने आणि सर्व जनजीवन सुरळीत असल्याने पुणे जिल्हाधिकारी यांनी काल आज पासून सर्व जमावबंदी आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे यवतमध्ये सर्व जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहे.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दर पाच मिनिटांनी एक बस त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना केली जाणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात विशेषतः तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे १० आणि ११ ऑगस्ट रोजी भाविकांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या जादा बसेसमुळे भाविकांना त्र्यंबकेश्वरला पोहोचणे आणि परत येणे सोयीस्कर होणार आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या एमआयटी कॉलेजबाहेर दोन विद्यार्थी गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मारामारीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या प्रकारामुळे कॉलेजमध्ये येणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर रस्त्यात झालेल्या या मारामारीमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस या घटनेची दखल घेऊन तपास करत आहेत.
ठाण्यात गणेशोत्सव अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपला असताना गणेश मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आतापर्यंत ८८ गणेश मंडळांनी मंडप उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे अर्ज केले आहेत, मात्र त्यापैकी केवळ वर्तक नगर येथील एकाच मंडळाला परवानगी मिळाली आहे. उर्वरित सर्व मंडळे अद्यापही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. पालिकेकडून परवानगी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जमा करावी लागत असल्याने या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गणेश मंडळांच्या तयारीवर परिणाम होत असून, वेळेत मंडप उभे राहणार की नाही, अशी चिंता कार्यकर्त्यांना सतावत आहे. मंडळांकडून लवकरात लवकर परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे, जेणेकरून उत्सवाची तयारी वेळेत पूर्ण करता येईल.
रात्री दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीत पालकमंत्री पदावरून झाली होती चर्चा. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून हा प्रश्न सोडवण्याच्या अमित शाह यांनी केल्या सूचना. त्यानंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक. 15 ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदा बाबतचा निर्णय घेतल जाणार असल्याची सूत्रांची माहिती. 15 ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये होणार झेंडावंदन.
तलावात मागच्या वर्षाचा 20 टक्के पाणीसाठा. शेतकऱ्यांची, नागरिकांची चिंता वाढली. परिसरातील शेतकऱ्यांसह वन्य प्राण्यांच्या पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता. सिंचनासह, हा तलाव सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असल्याने वन्य प्राण्यांसाठी पाण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र हा तलाव कोरडा पडण्याच्या स्थितीत सध्या आहे.
अंबड शहरातील पाचोड नाक्यावर विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्या प्रकरणी 13 ऑगस्ट 2019 रोजी बदनापूर चे आमदार नारायण कुचे आणि इतर 43 जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून नारायण कुचे यांच्यासह एकूण 44 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.जालना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निकाल देत या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
मुंबई शहरात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने. क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने केली सुरुवात. आज मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.