
महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. राज्यातील त्र्यंबकेश्वर, बनेश्वर आणि कपिलेश्वर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शन घेणार आहेत. मंदिरे सजवण्यात आली असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाकाल मंदिर 44 तास तर काशी विश्वनाथ मंदिर 69 तासं खुलं राहणार आहे. मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्रीपासूनच भाविक भक्तांच्या मंदिराच्या मुख्य रस्त्यालगत एक किलोमीटर पेक्षा लांब रांगा लागल्या आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रयागराजच्या धर्तीवर सोलापुरातही महाकुंभ अमृत स्नानाचे आयोजन. ज्या नागरिकांना प्रयागराजला जाता आले नाही त्यांच्यासाठी सोलापुरात शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान अमरावती जिल्ह्यात मागील दोन महिन्यात तब्बल 1200 पेक्षा अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जिल्ह्यात मोकाट श्वानांचे नागरिकांना चावा घेण्याची प्रमाण वाढले. मुंबई आग्रा महामार्गावरिल जुना कसारा घाट आज वाहतुकीसाठी खुला राहणार. महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वर, शिर्डी, सर्वतीर्थ टाकेद व कुंभमेळ्याचे उगमस्थान असलेल्या कावनई येतील शिव मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात त्यामुळे वाहनाची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मिणचेकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तागिरीवर सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश होणार आहे. मिणचेकर हे ठाकरे गटात होते.परंतु विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष लढले होते.
मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट बसस्थानकात अत्याचार प्रकरणात ठाकरे गटाकडून तोडफोड करण्यात आली आहे. या बस स्थानकातील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
स्वारगेट एसटी बसस्थानकात तरुणीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आले.या प्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून स्वारगेट बस स्थानकात अत्याचार झालेल्या बससमोर घोषणाबाजी केली जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या मनसे कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी महाकुंभाला उपस्थित न राहणे हा हिंदूंचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदूंचा अपमान केला आहे. त्याला हिंदूंची मते हवी आहेत, पण तो कुंभमेळ्याला जात नाही. त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. उद्धव स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो आणि कुंभमेळ्याला जात नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
हरियाणा महानगरपालिका निवडणुकीबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, “संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल खूप उत्साह आणि उत्साह आहे. २ मार्च रोजी हरियाणामध्ये ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे… आमचे सरकार आम्ही दिलेली आश्वासने सातत्याने पूर्ण करत आहे. नागरी निवडणुकांबाबत आम्ही घेतलेले 21 संकल्पही आमचे सरकार पूर्ण करेल.”
महाशिवरात्रीच्या पर्वावर भक्तांसाठी खास उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या भाविकांसाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी खास सोय केली आहे. गंगेच्या पवित्र स्नानाची सोय भंडाऱ्यात करण्यात आली असून प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील अमृत जल टँकरद्वारे भंडाऱ्यातील बहिरंगेश्वर मंदिर परिसरात आणण्यात आलं आहे. कुंभ स्नान सोहळ्याचं आयोजन भंडारेकरांसाठी करण्यात आलं आहे. या उपक्रमामुळे समस्त हिंदू बांधवांना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी गंगा स्नानाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
पुण्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ही घटना घडली आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. पीडितेनं पोलिसांत तक्रार दिली असून आरोपीची ओळखही पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध सुरु असल्याचं एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच पीडितेनं आरडा-ओरडा केला असता तर तिला मदत मिळाली असती असही त्या म्हणाल्या.
पुण्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ही घटना घडली आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. स्वारगेट बसस्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये हा प्रकार घडला. तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
“हा विषय तीन महिन्यांपासून सुरू आहे. तीन महिन्यांपासून कुटुंब न्याय मागत आहे. न्यायासाठी मायबाप सरकारने फास्ट कोर्टात खटला चालवणं गरजेचं आहे. कुटुंबाने केलेल्या मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाली आहे, उज्जवल निकम यांची नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल आम्ही सरकारचा अभिनंदन करू. हे प्रकरण घडलं का ? जबाबदार कोण? हे प्रकरण घडवणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे” अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली.
पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी बस स्थानकावर आली होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली घटना. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख ही पटली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना.
महाशिवरात्रीनिमित्त आज जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महादेवाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर भाविकांनी मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगावमधील तरुणांच्या वाहनाचा इंदूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. इंदूरजवळ मानपुर येथे मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास तरुणांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रुझरने जोरदार धडक दिली. जळगावमधील सुरज झंवर हा तरुण त्याच्या मित्रांसह आजोबांच्या अस्थी विसर्जनासाठी हरिद्वारला गेला होतता. अस्थी विसर्जनानंतर घराकडे परतत असताना त्यांच्या कारला क्रुझरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून कारमधील तिघे तरुण जखमी झाले आहे.
बिहार- नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येत्या वर्षाअखेरीस बिहारची विधानसभा निवडणूक होणार आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 9 मे रोजी मोदी रशियातील मॉस्को शहराला भेट देणार आहेत. रशियन युद्धाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रेड परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यासोबत मोदींची बैठक होण्याचीही शक्यता आहे.
नवी दिल्ली- भारतीय बीज सहकारी समितीची आज बैठक पार पडणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती आहे. देशभरातील पारंपारिक फळ भाजीपाला आणि अन्नधान्य बियाण्यांच्या संवर्धनासाठी व्यापक कृती योजना ठरवली जाणार आहे.
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना दिसू शकतो. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही गट समोरासमोर येण्याची शक्यता आहे. सध्या हा कारखाना अजितदादांच्या ताब्यात आहे.
पुण्यात कर्नाटकच्या बस आणि चालकाला पुन्हा काळ फासण्यात आलं.निलेश निकम असं काळ फासणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पुण्यातील गोळीबार मैदान येथे कर्नाटकच्या बस आणि चालकाला काळ फसण्यात आलं.
आम्ही गावात बघतोय कुठलाही उत्साह नाही, संक्रांतीचा सण गावात केला गेला नाही. आज महाशिवरात्री आहे पाठीमागे महादेवाचे मंदिर आहे जसा पाहिजे तसा उत्साह या घटनेमुळे दिसत नाही. घटना घडल्यामुळे गावात उत्साह नाही, असे संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख म्हणाले.
मेळघाटात पुन्हा 22 दिवसाच्या बाळाच्या पोटाला 65 डागण्या(चटके) देण्यात आल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोटफुगीचा आजार झाल्याने असा अघोरी उपाय करण्यात आला. मेळघाटच्या सिमुरी गावातील घटना 22 दिवसाच्या चिमुकल्या बाळावर अमरावतीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 22 दिवसाच्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याविरोधात प्रशांत कोरटकर याच्या घरावर सकल मराठा समाजाने मोर्चा काढला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीचं बरं – वाईट झालं तर नाही ना, अशी शंका अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
फिक्सरची नाव देणाऱ्या मंत्र्यांची नावंही समोर आली पाहिजेत… सीएम भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊल उचलतायंत म्हणून कौतुक केलं… कर्नाटकात बस पेटवली तर तिथंही बस पेटवली जाते, हेच करायचंय का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला…
बेळगावात मणिपूर करायचं आहे का असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला. कर्नाटकात बस पेटवली जात आहे. एकनाथ शिंदे यांना बेळगाव येथे पाठवावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
आतापर्यंत 32 जणांना लागण, एकाचा मृत्यू तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर… शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या तरुणांची आहे… 20 ते 39 वयातील बारा रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे… सर्वात कमी संख्या सत्तरीपार केलेल्या वृद्ध नागरिकांची असून 70 हून अधिक वय असलेल्या केवळ 1 रुग्णाला या आजाराची लागण झाली आहे… लहान मुलांना देखील हा आजार होत असून शून्य ते 9 वयोगटातील तीन मुलांना जीबीएसची लागण झाली आहे…
नीलम गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्यानं मिरच्या लागल्या… गोऱ्हे कोणत्या व्यासपीठावर बोलल्या हा भाग वेगळा… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण…
मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील फायरमनने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना… प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत त्या फायरमनला सेवेतून निलंबित केले आहे… या कर्मचाऱ्याचे नाव संजय म्हात्रे असे असून तो भाईंदर पूर्वेकडील नवघर येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत होता… म्हात्रे याला दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याच्या मागणीनुसार प्रशासनाने त्याची बदली नवघर अग्निशमन केंद्रात केली होती…
-पिंपरी चिंचवड शहरातील 26 रुग्णांनी जीबीएसवर मात केली आहे. आतापर्यंत 32 जणांना लागण झाली असू एकाचा मृत्यू झाला तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या तरुणांची आहे, 20 ते 39 वयातील बारा रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचे दिसून आले. तर सर्वात कमी संख्या सत्तरी पार केलेल्या वृद्ध नागरिकांची असून 70 हून अधिक वय असलेल्या केवळ 1 रुग्णाला या आजाराची लागण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर – 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. या दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला. दर्शना रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त करत व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या .
पिंपरी चिंचवड – निगडी ते पिंपरी मेट्रो काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर बोरिंग खोदण्यात येत असताना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलं. आकुर्डी आणि आसपासच्या परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
नाशिक- गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजर चा जामीन अर्ज रद्द. कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. अचानक जामीन अर्जासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने अटकपूर्व जामीन अर्ज रद्द. जामीन अर्ज रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या अटी व शर्तीचे पालन केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यासाठी बडगुजर यांनी सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न. दीपक बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आज, 26 फेब्रुवारी रोजी अंतिम शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक त्रिवेणी संगमावर पोहोचत आहेत.
मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविक भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्री पासूनच भाविक भक्तांनी मंदिराच्या मुख्य रस्त्यालगत एक किलोमीटर पेक्षा लांब रांगा लागल्या आहेत. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईच्या गिरगाव परिसरातील बाबूलनाथ मंदिर हे शिवशंकराचे प्राचीन मंदिर असून महाशिवरात्री निमित्त मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी मध्यरात्री पासूनच शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.