
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) 10 वीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, राज्यात 16 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पहिला पेपर मराठीचा असून सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत हा पेपर होईल तर दुपारी 3 ते 6 या वेळेत द्वितीय भाषेचा पेपर विद्यार्थी सोडवतील. परीक्षेसाठी सर्व केंद्रे सज्ज असून किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. संगमेश्वर मधील कसबा पेठे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची मोजणी होऊन सरकार जमीन खरेदी करणार. सात दिवसात जमिनीचे नकाशे सादर करा, असे आदेश मंत्री योगेश कदम यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत. इचलकरंजी शहरातील जर्मनी टोळीने सोशल मीडियावर वाढदिवस साजरा करून दहशत माजवली होती. कोल्हापूर पोलीसांनी इचलकरंजी शहरातील चौका चौकामध्ये या सर्वांची धिंड काढली. ज्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला होता त्या ठिकाणी नेऊन चौकशी केली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि साहित्यिक विश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून प्रारंभ होणार आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन अशा सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथे भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे. गोदामामध्ये प्लास्टिक चिंध्या आणि पुठ्ठा प्लास्टिक असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे. या आगीमध्ये चार ते पाच गोदाम आणि चार ते पाच पत्र्याच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आागीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अमरावती विभागातील शेकडो बांधकाम कंत्राटदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागात कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकले आहेत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनास्थळी कंत्राटदारांकडून भजन कीर्तन करत आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने कंत्राटदारांचे पैसे न दिल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारांकडून देण्यात आला आहे.
चिखलीत भाजपा कार्यकर्ता पुन्हा आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी पुणे ते नागपूर महामार्गावर चिखली येथे चक्का जाम आंदोलन केले आहे. आमदार महाले यांना धमकी देणारे आरोपीवर कारवाईची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
आमदार श्वेता महाले यांना धमकीचे पत्र प्रकरणात शेकडो भाजपा कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये घुसले. कार्यकर्त्यांनी आरोपीला तत्काळ पकडून कारवाईची मागणी केली आहे. शेकडो भाजपचे कार्यकर्त्याचा जमाव पोलिस स्टेशनवर आहे.
राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मुंबई शहरातील दोन महत्वाच्या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली…सविस्तर वाचा…
मनोज जरांगे यांना अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार असले तरी आम्ही त्यांना सहभागी होऊ देणार नाही. कारण त्यांचे शरीर आधीच वारंवार करण्यात येत असलेल्या उपोषणामुळे कमकुवत झाले आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
भारतीय दूतावासाने म्हटले आहे की पनामाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे की काही भारतीय अमेरिकेतून पनामाला पोहोचले आहेत. ते सुरक्षित आहेत आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या हॉटेलमध्ये राहत आहेत. दूतावासाच्या टीमने त्याला भेटण्याची परवानगी घेतली आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही स्थानिक सरकारसोबत जवळून काम करत आहोत.
भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे की काँग्रेस पक्ष भारतविरोधी आहे. राहुल गांधींचे चरित्र भारतविरोधी आहे. परदेशी शक्ती पंतप्रधान मोदींविरुद्ध कट रचत आहेत. अंतर्गत बाबींमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप आहे.
राहुल गांधी यांच्या रायबरेली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. युवा संवादाला संबोधित करताना राहुल म्हणाले की, दोन भारत आहेत – एक अदानी, अंबानी आणि दुसरे गरिबांचे. आम्हाला दोन भारत नको आहेत. तुम्ही घाबरू नका, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. उत्तर प्रदेश सरकार हे एक अपयशी सरकार आहे. त्याला काम कसे करायचे हे माहित नाही आणि तो सतत बकवास बोलत राहतो. नोकऱ्या कधी निर्माण होतील, बेरोजगारी कधी संपेल? जीएसटी प्रणाली बदलावी लागेल. तुम्ही जीएसटीची रक्कम अदानी भरतात.
गुजरातमधील कच्छमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे एका खाजगी बस आणि ट्रकची टक्कर झाली, ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये ४० प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे.
जालन्यातील बदनापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या परीक्षा केंद्रावर आज दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी,पहिल्या पेपरपासून कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शाळेच्या भिंतीवरून उड्या मारत हे कॉपी बहाद्दर आत ये-जा करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शिक्षण विभागाचे कर्मचारी असताना देखील सर्रास होत असलेल्या या कॉप्यांमुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या संपूर्ण गैरप्रकारावर शिक्षण विभाग कारवाई करणार का असा सवालही उपस्थित होतोय.
गोंदिया जिल्ह्यात कॉंग्रेसला पुन्हा मोठं खिंडार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नाना पटोलेंनी सूड भावनेतून त्यांचे विधानसभेचं तिकीट कापलं असा आरोपही कोरोटे यांनी केला आहे. त्यामुळे आता ते उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
गोंदियामध्ये 3 जहाल महिला नक्षलवादी पोलिस-नक्षल चकमकीत ठार झाल्या आहेत. त्यांच्यावर 62 लाख रुपयांचं बक्षीस होतं. तसेच त्यांच्याकडील रायफलही पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
उद्या आम्ही अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यानंतर थेट लॉन्ग मार्च काढण्याचा इशारा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी दिला आहे.
सुरेश धस यांच्या आरोपांनंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. आता धस यांच्यावर कोणी विश्वास ठेवेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. तरीही ते मैदानात असल्याचे भासवत आहेत. ते मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. ठीक आहे. ते चांगले नाटक वठवत असल्याचा चिमटा राऊतांनी त्यांना काढला. धस यांचा बुरखा फाटल्याचा टोला त्यांनी लगावला.
जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ते गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावर असताना, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
४०-५० कामगारांना आठवड्याला ₹९,००० रोख पगार; सुरक्षिततेसाठी बंदुकीचा परवाना देण्याची मागणी यापूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली होती. कामगारांना रोख पगार द्यावा लागत असल्याने त्यांनी बंदुक परवाना घेतला होता. आता त्यांचा बंदुक परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात कारवाई होत नाही. गृह विभागावर संशय येतो त्यामुळे लोकांचा संयम सुटतो, याला गृह विभाग बाबदार राहील, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून शासकीय अनुदान लाटले आहे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत, २०१५ पासून २ लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जात होते. तथापि, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवून ७ ऑक्टोबर रोजी अनुदान १० लाख रुपयांपर्यंत वाढवले गेले आणि १६ शाळांना मंजूरही झाले, असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला.
गडचिरोली भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयारकोठी व मरकणार गावांनी माओवाद्यांना गावबंदी केली. ग्रामस्थांनी 02 भरमार बंदुका पोलीसांना सुपूर्द केल्या. 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे.
टोळीचा मोहरक्या पोलिसांच्या ताब्यात… बुलेटसह साडेपाच लाखांचे दागिने जप्त… मात्र त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार… फरारांच्या शोधासाठी पोलिसांची पथेके मागावर… नाशिकच्या कामटवाडा परिसरात बंदुकीचा भाग दाखवत भर दिवसा दरोडा टाकल्याची घडली होती घटना… घटनेतील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश… निलेश उर्फ शुभम बेलदार हा पंचवीस वर्षीय टोळीचा मोरक्या पोलिसांच्या ताब्यात…
संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी प्रयत्नशील… संगमेश्वरमधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची पाहणी… सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार… सात दिवसात जमिनीचे नकाशे सादर करा… ‘भूमी अभिलेख’ला आदेश.. संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी प्रयत्नशील… असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं आहे.
आजपासून राज्यभरात इयत्ता दहावीची परीक्षा… अमरावती विभागातील 1 लाख 63 हजार 134 विद्यार्थी देणार परीक्षा… अमरावती जिल्ह्यातील 38 हजार 337 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार… जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 196 परीक्षा केंद्र सज्ज परीक्षा केंद्रावर राहणार भरारी पथकाची करडी नजर.. तसेच अति संवेदनशील उपद्रवी असलेल्या परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाची करडी नजर… कॉफी मुक्त आणि भयमुक्त परीक्षेवर शिक्षण विभागाचा भर…
एकनाथ शिंदेंना धमकीचा ईमेल करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे… मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून 2 आरोपी अटकेत… मंगेश वायाळ आणि अभय शिंगणं यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी…
दिल्लीत साहित्य संमेलन होतंय ही आनंदाची गोष्ट… संमेलनात कुणाला काही आवश्यकता असेल तर आम्ही दिल्लीत आहोत… सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनात उद्धाटन सोहळा होतोय… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
टोळीचा मोहरक्या पोलिसांच्या ताब्यात. बुलेटसह साडेपाच लाखांचे दागिने जप्त. मात्र त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार. फरारांच्या शोधासाठी पोलिसांची पथेके मागावर. नाशिकच्या कामटवाडा परिसरात बंदुकीचा भाग दाखवत भर दिवसा दरोडा टाकल्याची घडली होती घटना. घटनेतील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. निलेश उर्फ शुभम बेलदार हा पंचवीस वर्षीय टोळीचा मोहोरक्या पोलिसांच्या ताब्यात.
लाल कांद्याच्या दरात लासलगाव बाजार समितीत चारशे तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सातशे रुपयांची मोठी घसरण. देशांतर्गत नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल होत असल्याने लाल कांद्याच्या मागणीत घट. सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी लाल कांद्याला सरासरी 2450 रुपयांचा दर मिळत होता. आज तो दर 1750 रुपयांपर्यंत कोसळला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफीसमध्ये सोशल मिडियाचे काम करणाऱ्या व्यक्तीस मारणे टोळीने बेदम मारहाण केली. हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती.
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन मंडप आणि स्काय वॉकसाठी काढलेली 130 कोटी रुपयांची निविदा रद्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामांमध्ये या कामाचा होता समावेश. विठ्ठल भक्तांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे यासाठी नव्याने बांधण्यात येत होता दर्शन मंडप आणि स्काय वॉक. वरिष्ठ पातळीवरचे आदेश आणि तांत्रिक कारणामुळे निविदा थांबवली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्राकडून माहिती.
10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण-डोंबिवली वाहतूक पोलिसांची विशेष रायडर सेवा. ट्रॅफिकमुळे अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विशेष रायडर्स (वाहतूक अंमलदार) नेमले.
टोल फ्री क्रमांक: 8286300300 / 8286400400 वर संपर्क साधल्यास रायडर्स विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवतील.
साहित्यिक विश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून प्रारंभ होणार आहे.आज सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोग्य मंत्र्यांच्या कोल्हापुरात जीबी सिंड्रोमचा तिसरा बळी गेला आहे. कोल्हापूर शहरातील 80 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
तर कोल्हापुरात जीबी सिंड्रोमवर शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. एका 12 वर्षीय मुलीला देखील जीबी सिंड्रोमची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
संगमेश्वर मधील कसबा पेठे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे.
सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची मोजणी होऊन सरकार जमीन खरेदी करणार. सात दिवसात जमिनीचे नकाशे सादर करा असे आदेश मंत्री योगेश कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत. राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली .
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकार सर्व यंत्रांना लावणार असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा आजपासून (21फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या 2 हजारांनी वाढली आहे.
परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून नोंदणी केलेल्या 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 64 हजार 120मुले, तर 7 लाख 47 हजार 471 मुली आणि 19 तृतीयपंथी आहेत. राज्यभरातील 5 हजार 130 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.