
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. कोरेगाव पार्कच्या वेस्टिन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. 11 वाजता अमित शहांच्या उपस्थिती त आज पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आमदार सुरेश धस आज मस्साजोग व परळी दौऱ्यावर जाणार आहेत. मस्साजोगचे गावकरी व देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर परळीत जाऊन महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या मुंडे कुटुंबियांनाही भेटणार आहेत. दोन्ही कुटुंबीयांशी तपासाच्या अनुषंगाने चर्चा करतील. युरियाच्या अतिवापरामुळे जळगाव जिल्ह्यात 171 गावांमधील 205 पाण्याचे नमुन्यांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते. या गावांमधील पाण्याच्या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाला आहे. या अहवालानुसार 193 जलस्त्रोत शुद्ध आढळून आले असून 6 जलस्त्रोत मात्र ‘नायट्रेट’ युक्त आढळून आले असल्याचं निष्पन्न झाल आहे. त्यामुळे या 6 जलस्त्रोतांना ‘रेडस्पॉट’ जाहीर केले जाणार असून संबंधित गावांमधील 6 जलस्त्रोतील पाणी वापरावर बंदी घालण्यात आली आहे . यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन अशा सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा…
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावाजवळ माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदार संघातील खाजगी संस्थेच्या जागेवर भक्त निवास बांधण्यासाठी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून एक कोटी नऊ लाखाची निविदा प्रसिद्ध झाली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट दोन टप्प्यात बंद राहणार आहे. २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार घाट बंद राहणार आहे. तसेच ३ ते ६ मार्चपर्यंतही याच वेळेत घाट बंद राहणार आहे.,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल वेस्टीनमधील बैठक संपवली आहे. आता ते हडपसरमधील जनता सहकारी बँक हीरक महोत्सव कार्यक्रमाला रवाना होणार आहेत.
नंदूरबारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 1 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 1 लाखांचा असली नोटांच्या बदल्यात 6 लाखांचे बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवत लुटणाऱ्यांचा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. बनावट नोटांचे 3 बंडल पोलिसांनी जप्त केले आहेत. बनावट नोटा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेला अनेक महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुराट सुरु असल्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या होत्या.
सीएसटी परिरातल्या मरीन चेंबर इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो सिनेमाच्या बाजूला असणाऱ्या इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून 6 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
नाशिकमध्ये महंत सुधीर दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक शाळाचा अतिक्रमण हटवले जात असल्यानं त्या ठिकाणी महंत सुधीर दास तिथे उपस्थित होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्यासह इतर आंदोलकांनाही ताब्यात घेतलं आहे.
परभणीच्या गंगाखेड येथे रिपब्लिकन सेनेकडून रस्ता रोको… गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याच्या मागणी सहित इतर मागण्यासाठी रिपब्लिकन सेना आक्रमक… परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग अडवत तीव्र आंदोलन… जोरदार घोषणाबाजी, पोलीस आंदोलक समोरासमोर, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत…
रिक्षातील चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती… मालवाहू ट्रॅक महामार्गावरून विरुद्ध बाजूने जात असताना ट्रॅक उलटली… उलटलेल्या ट्रक खाली प्रवासी रिक्षा दबली… रिक्षातील चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती… घटनास्थळी बचाव कार्य सुरू… अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प…
महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक शाळाचा अतिक्रमण हटवले जात असल्याने त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले असता पोलिसांनी घेतले ताब्यात… महंत सुधीर दास यांच्यासह काही आंदोलकांनाही घेतले ताब्यात…. पोलिसांच्या वाहनात टाकून दुसऱ्या जागेवर हलवले…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 1 लाख 80 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. 1 लाखांचा खऱ्या नोटांचा बदल्यात 6 लाखांचे बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवत लुटणाऱ्यांना पोलिसांनी पकडले.
अंढेरा येथील गांजा शेतीचा एलसीबीकडून पर्दाफाश करण्यात आला. अंढेरा पोलिसांना मात्र त्याची माहिती सुद्धा नव्हती. १२ कोटींची अफूची झाडे पकडली. रात्री उशिरापर्यंत ‘एलसीबी’च्या पथकाची कारवाई सुरू होती. १५ क्विंटल ७२ किलोची अफूची झाडे जप्त करण्यात आली. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई व न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते थोड्याच वेळात हिंगोली येथील स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन होत आहे. नवीन न्यायालयीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात होईल.
कर्नाटकमध्ये एसटी चालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटानं कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कर्नाटक बस अडवून आंदोलन केले आहे.
अनाधिकृत धार्मिक स्थळ काढले नाही तर सकल हिंदू समाज आज बजरंग बलीची प्राणप्रतिष्ठापना करणार आणि बजरंग बलीचा मंदिर या ठिकाणी उभा राहील. जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला महापालिका जबाबदार असेल, असे भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी इशारा दिला.
बालाजी तांदळे हा वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय आहे. त्याने अगोदर आरोपींना मदत केली आहे. जामीनासाठी मदत केली आहे. त्यांना सहआरोपी करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे,कोकाटे राजीनामा मागणी केली आहे. अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेईल आणि त्यावर निर्णय घेईल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
प्रयागराज येथे जाणाऱ्या मुंबईतील नागरिकांचा अमरावतीत समृद्धीवर अपघात. 6 प्रवासी गंभीर रित्या जखमी. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील चॅनेल नंबर 114 जवळ झाला अपघात. जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. धामणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावती रेफर करण्यात येणार असल्याची माहिती.
महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली. कर्नाटकात एसटीला काळ फासल्यानंतर निर्णय. ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा
“PSI राजेश पाटील याने संतोष देशमुख यांचा मृतदेह कळंबकडे वळवला होता. पण ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवली. त्यामुळे राजेश पाटील याला आरोपी केले पाहिजे. त्याचबरोबर नितीन बिक्कड याने आरोपीना पळून जाण्यास मदत केलीय, त्यामुळे त्याला आरोपी केले पाहिजे” अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
“PI महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करा. सायबर सेलचे 2 तज्ज्ञ SIT मध्ये नेमावेत. अशी मागणी माझ्याकडे आता केली आहे. कोणाचे फोन कोणाला झालेत याबाबत तपास झाला पाहिजे त्यासाठी सायबर सेलचे लोक हवेत” अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
“जेलमध्ये आरोपीना VIP ट्रीटमेंट मिळत आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण दिलं जातय. मोठ्या बॅग नेऊन दिल्या जात आहेत. त्यामुळे जेलमध्ये VIP ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी” अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. या हत्या प्रकरणात 9 आरोपी हे 302 मध्ये . 10 व्या आरोपीलाही 302 मध्ये घेतलं पहिजे. या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करणं आवश्यक आहे.
हे प्रकरण जलदगती न्यायालयात 100 टक्के चालणार – सुरेश धस
बीड : कृष्णा आंधळेवर पोलिसांनी कारवाई केली नाही. सीआयडीकडे तपास दिल्यावर केज पोलिसांनी काहीच मदत केली नाही. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीम पुढे आली. जे स्वतः आरोपी आहेत तेच आरोपीना वाचवण्यासाठी पुढे आले आहेत.
6 तारखेला ऍट्रॉसिटी दाखल केली नाही. खून झाल्यावर 12 तारखेला दाखल केली. जर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर ही घटना घडली नसती. एसपी चांगले काम करत आहेत पण खालचे पोलीस कर्मचारी आरोपीच्या बाजूने आहेत, असा आरोप संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या पुणे दौऱ्यावर असून उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाहांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. ते देखील गृहविभागाच्या पश्चिम विभागीय बैठकीला हजर राहणार आहेत.
आजच्या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका. राज ठाकरेंची झालेली भेट ही राजकीय नव्हती – उदय सामंत यांनी केलं स्पष्ट.
जालन्यात वाळूच्या टिप्परखाली दबून 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडीमधील ही धक्कादायक घटना आहे. रस्त्यावर पुलाचं काम करणाऱ्या मजुरांवर काळाने घाला घातला आहे.
आमदार सुरेश धस आज मस्साजोग व परळी दौऱ्यावर जाणार आहेत. मस्साजोगचे गावकरी व देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर परळीत जाऊन महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या मुंडे कुटुंबियांनाही भेटणार आहेत.