Maharashtra Breaking News LIVE 30th May 2025 : राज्यात गेल्या 24 तासांमध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 30th May 2025 : राज्यात गेल्या 24 तासांमध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 8:49 AM

पावसाळ्यापूर्वी कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने मुख्य रस्त्यावरील अति धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी वेगात सुरू केली आहे. वसई-विरार नालासोपारा परिसरातील मुख्य रस्ता, गल्ली बोळातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून धोकादायक झाडं तोडली जात आहेत. पालिकेच्या सर्वच 9 प्रभागात पावसाळ्यात पूर्वी या झाडांची छाटणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव. अमरावती महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. अमरावती शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ. कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्याने केली तपासणी. सध्या या महिलेवर गृहविलेगीकरणात उपचार सुरू.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 May 2025 07:52 PM (IST)

    भक्ती गुजराथी प्रकरणाच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल

    भक्ती गुजराथी आत्महत्या केस संदर्भात चौकशीसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल

    तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची घेतली भेट
    भक्ती गुजराथी या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून केली होती आत्महत्या

    या प्रकरणात सासू-सासरे आणि पती तिघांना करण्यात आली आहे अटक

     

  • 30 May 2025 06:01 PM (IST)

    कल्याण : शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

    कल्याण बाल्यांनी केबीके इंटरनॅशनल स्कूल शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळेजवळ मुल खेळत असताना अचानक भिंत कोसळली. अंश राजकुमार सिंघ या 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहीती आहे.

  • 30 May 2025 05:46 PM (IST)

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नाशिक दौऱ्यावर

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाशिकच्या भरोसा सेल येथे भेट दिली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भरोसा सेल येथील कामाचा रुपाली चाकणकर यांनी आढावा घेतला. भरोसा सेल येथील आलेल्या महिलांच्या तक्रारी स्वतः रूपाली चाकणकर यांनी समजून घेतल्या.

  • 30 May 2025 05:40 PM (IST)

    तेलंगणा: ‘गदर फिल्म अवॉर्ड्स’साठी बाहुबली आणि आरआरआरची निवड

    तेलंगणा सरकारने 2014 ते 2023 या वर्षासाठी जाहीर केलेल्या गदर चित्रपट पुरस्कारांसाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे ‘बाहुबली-2’ आणि ‘आरआरआर’ हे चित्रपट देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. 2017 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी बाहुबली द कन्क्लुजनची निवड करण्यात आली होती, तर 2021 साठी पहिले स्थान आरआरआरला देण्यात आले होते.

  • 30 May 2025 05:26 PM (IST)

    अंकिता भंडारी हत्या प्रकरणात निकाल आला, तिन्ही आरोपी दोषी

    अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी आढळले आहेत. न्यायालय लवकरच शिक्षा जाहीर करेल.

  • 30 May 2025 05:15 PM (IST)

    हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

    शुक्रवारी हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. ही धमकी चंदीगड पोलिसांना एका फोनद्वारे मिळाली आहे. धमकीच्या फोननंतर, हरियाणा सचिवालयात सीआयएसएफ, हरियाणा पोलिस, चंदीगड पोलिस आणि सीआयडीला सतर्क करण्यात आले. बॉम्ब निकामी पथकासह पोलिस हरियाणा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही पोहोचले.

  • 30 May 2025 05:02 PM (IST)

    पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, तीव्रता 4.2 रिश्टर स्केल

    पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप पहाटे 1:37 वाजता झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेली. ही माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.

  • 30 May 2025 04:52 PM (IST)

    जानेवारी-मार्च तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत घसरला

    2024-25 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत घसरला. गेल्या वर्षी याच तिमाहीत 8.4 टक्के होता. त्याच वेळी, सरकारी आकडेवारीनुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्क्यांपर्यंत घसरला, जो मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9.2 टक्के होता.

  • 30 May 2025 04:40 PM (IST)

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे गुरुवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला असुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.  गावातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे धान्य आणि वस्तूंचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे गावातील शेती तसेच गावातील घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 30 May 2025 04:26 PM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांमध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

    राज्यात गेल्या 24 तासांमध्ये (30 मे सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 42.2 मिमी पाऊस झाला आहे. तसेच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात २४ मिमी पाऊस बरसला आहे. जालन्यात 13.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात 12.1 मिमी पाऊस झाला. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  • 30 May 2025 04:17 PM (IST)

    राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये कोणीही नाराज नाही : जयंत पाटील

    राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये कोणीही नाराज नाहीत, सर्व खुश आहेत. सर्व आपली कामं करत आहे, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षात कसलेही मतभेद नसून फक्त माध्यमांनी काही बातम्या केल्या आहेत. याबाबत शरद पवार पाहतील आणि निर्णय घेतील असा खुलासाही जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना केला.

    तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आमच्या पक्षात नाहीत. तिकडे होतं असतील तर माहिती नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

  • 30 May 2025 04:05 PM (IST)

    अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

    मोठी बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे यांचं बाळ हे निलेश चव्हाण याच्याकडे होतं. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांना धमकावल्याचा आरोप होता. निलेश चव्हाण याने बाळ घ्यायला आलेल्या कस्पटे कुटुंबावर बंदूक रोखली होती, असा आरोपही निलेश चव्हाणवर करण्यात आला होता.

  • 30 May 2025 03:50 PM (IST)

    राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाहीत – जयंत पाटील

    राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाहीत, सगळे खुश आहेत. सगळे आपले काम करत आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत म्हटले आहे.

  • 30 May 2025 03:43 PM (IST)

    शस्त्र परवाना घ्यायला खोटा पत्ता, हगवणे बंधूंवर पुण्यात गुन्हा दाखल

    सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या  दोन्ही भावंडाचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे.. आपल्याला केवळ शस्त्र परवाना मिळावा यासाठी या दोघांकडून चक्क पुणे पोलिसांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • 30 May 2025 03:00 PM (IST)

    गोकुळ दूधमहासंघाच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड

    गोकुळच्या अध्यक्षपदावरून नेत्यांमध्ये आता चांगलीच रस्सीखेच बघायला मिळाली. नव्या अध्यक्षपदी हासिन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफची निवड झाली आहे.

  • 30 May 2025 02:26 PM (IST)

    विरारमध्ये MSEB च्या 4 कर्मचाऱ्यांना विजेचा झटका, एकाचा जागीच मृत्यू

    विरारमध्ये MSEB च्या ट्रान्सफार्मवर काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने 4 कर्मचाऱ्यांना जोराचा विजेचा शॉक लागला आहे. यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखणी आहेत. जयेश घरत असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • 30 May 2025 02:06 PM (IST)

    वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण विरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट

    बावधन पोलिसांकडून वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला अटक करण्यासाठी न्यायालयाकडून स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यासाठी विनंती केली होती. या स्टॅंडिंग वॉरंटमुळे निलेश चव्हाणची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त होऊ शकते.

  • 30 May 2025 01:59 PM (IST)

    प्लंबर नका म्हणू, ते तर वॉटर इंजिनियर

    राज्यातील प्लंबर चा दर्जा बदलणार. प्लंबर चा आता वॉटर इंजिनियर म्हणून उल्लेख केला जाणार. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली. मजूरांना सन्मान मिळावा यासाठी काही नावात बदल केले जाणार आहेत.

  • 30 May 2025 01:50 PM (IST)

    आरोपी निलेश चव्हाण विरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट tv9 च्या हाती

    बावधन पोलिसांकडून आरोपी निलेश चव्हाण याला अटक करण्यासाठी न्यायालयाकडून स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यासाठी विनंती केली होती. या स्टॅंडिंग वॉरंट निलेश चव्हाण याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त होऊ शकते.

  • 30 May 2025 01:40 PM (IST)

    रवी वर्माचे लग्न मोडले

    ठाणे एटीसने केलेल्या कारवाईनंतर ठाण्यातील रवी वर्मा याचे लग्न मोडले. एटीएसने कारवाई केल्या मुळे त्याचे लग्न मोडले असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी त्याच्या आईने लग्न ठरवले होते. काही दिवसापूर्वी त्याची आई अयोध्या या गावातून परत आलेली होती.

  • 30 May 2025 01:30 PM (IST)

    19 साक्षीदारांची तपासणी

    या गुन्ह्या संदर्भात जवळजवळ 19 साक्षीदारांची साक्ष बावधन पोलिसांनी नोंदवली आहे. या गुन्ह्यातील तांत्रिक पुरवा जो आहे त्याबाबतचा मार्गदर्शन आणि पुराव्या बाबत वेगवेगळ्या ठिकाणी सीए आणि तांत्रिक पुरावे पाठवले आहेत. परिस्थितीजन्य पुरावे पाहून आम्ही 19 जबाब नोंदवले त्यामधील एक जवाब हा वैष्णवीच्या मैत्रिणीचा नोंदवला आहे, त्याचप्रमाणे आणखी पुढे महत्त्वाचे साक्षीदार देखील आम्ही घेणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • 30 May 2025 01:18 PM (IST)

    पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने पुतळा हटवला

    सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा हटवण्यात आला आहे.आटपाडी प्रशासनाकडून सांगोला चौकामध्ये असणारा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आला आहे.त्यामुळे आंबेडकर अनुयायांकडून याला विरोध करण्यात येत आहे.2 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्यांदा आंबेडकर अनुयायांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो विनापरवान बसवण्यात आल्याचे कारण देत काढण्यात आला होता,त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी संतप्त आंबेडकर अनुयांयकडून पुतळा बसवण्यात आला होता. मात्र आज पहाटेच्या सुमारास प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पुतळा पुन्हा हटवण्यात आला आहे,त्यामुळे सकाळपासून आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 30 May 2025 01:10 PM (IST)

    राजीनाम्याबाबत चाकणकरांची थेट प्रतिक्रिया

    राजीनामा हा पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा देखील मागितला जातो विरोधकांची ती मागणी असते, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या राजीनाम्याप्रकरणी दिली.

  • 30 May 2025 01:00 PM (IST)

    महिला आयोग आपल्या दारी उपक्रम

    नाशिकमध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम सुरू करण्यात आला. महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपक्रम घेण्यात आला. महिलांच्या विविध प्रश्न आणि तक्रारींसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी दिसली.

  • 30 May 2025 12:45 PM (IST)

    ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पासाठीची टेंडर प्रक्रिया रद्द

    ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पासाठीची टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे. 6 हजार कोटींच्या ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (L&T) ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या वतीने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.

  • 30 May 2025 12:30 PM (IST)

    दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चेत फारसं तथ्य नाही- खडसे

    “राऊतानी म्हटलं की दोन पवार एकत्र येण्याला प्रफुल पटेल, तटकरे, या दोन नेत्यांचा विरोध आहे. मात्र तटकरेंनी याबाबत खुलासा केला आहे की असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे विरोध असण्याचं कारण नाही. माझ्या माहितीप्रमाणे दोन्हीही पवार एकत्र येण्याबाबत कुठलाही प्रस्ताव शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकाकडे अधिकृतरित्या केलेला नाही. त्यामुळे या चर्चेला फारसं तथ्य नाही असं मला वाटतं,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

  • 30 May 2025 12:20 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभादेवीतील श्रद्धांजली कार्यक्रमात दाखल

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभादेवीतील श्रद्धांजली कार्यक्रमात दाखल झाले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या श्रद्धांजलीसाठी मुख्यमंत्री उपस्थित आहेत. प्रभादेवीतील रुस्तमजी क्राऊन इमारतीत आज श्रद्धांजली कार्यक्रम असून अमोल काळे यांचं काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झालं होतं.

  • 30 May 2025 12:10 PM (IST)

    अमरावती महानगरपालिकेने 1654 जन्म प्रमाणपत्र केले रद्द

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी पुढाकार घेतला आणि अनेक ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल झाले. आज किरीट सोमय्या अमरावती महानगरपालिकामध्ये पोहोचले, त्यापूर्वी महानगरपालिकेने 1654 जन्म प्रमाणपत्रे रद्द केले आहेत. अमरावती महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांशी त्यांनी भेट घेतली. यावेळी सोमय्या म्हणाले की, “मला कितीही धमक्या आल्या तरी मी मागे हटणार नाही.”

  • 30 May 2025 11:57 AM (IST)

    संजय राऊतांनी बडबड बंद करावी – संजय शिरसाट

    आपलं दुकान बुडायला लागलं, जहाज, घर बुडायला लागलं , त्याकडे लक्ष देण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देऊन का टाईम खराब करता असा सवाल विचारत आता संजय राऊतांनी बडबड बंद करावी अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

  • 30 May 2025 11:56 AM (IST)

    अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळ सापडले दोघांचे मृतदेह

    अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळ दोघांचे लटकलेले मृतदेह सापडले असून प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    उल्हासनगरचे हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  मनीषा महेश पाटील आणि विवेक विठ्ठल पाटील अशी दोघांची नावं असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले आहेत. दोघेही मृत हे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 30 May 2025 11:40 AM (IST)

    वैष्णवी हगवणे मृत्यू – 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले

    वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आत्तापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यामध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश आहे.

  • 30 May 2025 11:27 AM (IST)

    केईएम रुग्णालयात साचलेल्या पाण्यामुळे हायकोर्टानं सरकारला फटकारलं

    केईएम रुग्णालयात साचलेल्या पाण्यामुळे हायकोर्टानं सरकारला फटकारलं आहे. तसेच तातडीने उपाययोजना करण्याची सूचनाही दिल्या आहेत. हायकोर्टाने मुंबई महापालिकेलाही फटकारलं आहे.

  • 30 May 2025 11:10 AM (IST)

    संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत – अमोल मिटकरींची टीका

    संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहे त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही. अलीकडच्या काळात बाष्कळपणा त्यांच्या बोलण्यात अधिक जाणवत आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

    मनसे आणि शिवसेना एकत्र यायला संजय राऊत यांचाच विरोध आहे. ठाकरे कुटुंब एकत्र यावं ही त्यांची कधीच भूमिका नव्हती.

    संजय राऊत यांनी आपल्या डोळ्याचा चष्मा पुसावा, भक्कमपुरावा असेल तरच त्यांनी बोलावं असंही मिटकरी म्हणाले.

  • 30 May 2025 11:01 AM (IST)

    हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा हात

    हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा हात असल्याचं समोर आलं आहे. जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधूंचे मामा आहेत. खोट्या पत्त्यावर हगवणे बंधूंना हा शस्त्र परवाना देण्यात आला आहे. हगवणे बंधूंच्या शस्त्र परवानाच्या फाईलवर सुपेकरांची सही असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकरांवर कारवाई कधी होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  • 30 May 2025 10:26 AM (IST)

    राजनाथ सिंह यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट

    राजनाथ सिंह यांनी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट दिली आहे. INS विक्रांत भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती.

     

  • 30 May 2025 10:11 AM (IST)

    सुनिता जामगडेला न्यायालयाकडून 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी; भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती

    सुनिता जामगडेला न्यायालयाकडून 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. सुनिता पाकसाठी हेरगिरी करत होती का? याचा तपास केला जाणार आहे. सुनिता भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांचा तपास केला जाणार आहे.

     

  • 30 May 2025 09:38 AM (IST)

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्याला आला पूर

    गेल्या तीन-चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरले. गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात ओढा दुथडी भरून ओसंडून वाहत असून उळे आणि कासेगावला जोडणाऱ्या रस्त्यावरच आले ओढ्याचे पाणी. कासेगाव येथील वड्याला पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं पाणी. कासेगाव येथील याच ओढ्यात मागील वर्षी एक जण वाहून गेला होता.

  • 30 May 2025 09:37 AM (IST)

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पात रानटी हत्तींचा प्रवेश

    पहिल्यांदाच रानटी हत्तींच्या ताडोबात प्रवेशाने वनविभागात मोठी खळबळ. गेल्या काही वर्षांपूर्वी उडीसातून आलेला हत्तींचा हा कळप गडचिरोली आणि चंद्रपूरच्या सीमेवर स्थिरावलेला आहे. परवा रात्री हा कळप गडचिरोली जिल्ह्याची सीमा पार करून सावली तालुक्यातील चिखली आणि डोंगरगाव परिसरात आला. त्यानंतर या कळपातील दोन हत्ती आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कुकडहेटी परिसरात दिसल्याने वनविभागात उडाली मोठी खळबळ.

  • 30 May 2025 09:28 AM (IST)

    कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या तावडीत

    बार्शी शहर पोलिसांकडून तत्पर कारवाई. बार्शी शहरातील मांगडे चाळ परिसरात हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका युवकाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे या युवकास अटक करण्यात यश आले आहे.

  • 30 May 2025 09:27 AM (IST)

    पुणेकरांनो तुम्ही जर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असाल तर सावधान….

    पुणेकरांनो तुम्ही जर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असाल तर सावधान, कारण तुमच्यावर आता Ai ची करडी नजर असणार आहे. पुण्यातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक विभागाकडून एआय आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीचे प्रायोगिक तत्त्वावर चाचणीची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही वेगात गाडी चालवत असाल, नो पार्किंगमध्ये गाडी लावत असाल, किंवा रॉंग साईड गाडी चालवत असाल तर मार्गावर लागलेल्या सीसीटीव्हीत तुमच्या गाडीचा नंबर प्लेट स्कॅन करून तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.