
युवासेनेकडे पालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ठाकरेंना मुंबईत चेकमेट देण्याची शिंदेची रणनीती आहे. श्रीकांत शिंदेच्या खांद्यावर मुंबई पालिकेची जबाबदारी देणार असल्याची सुत्रांनी माहीती दिली आहे. युवासेनेचा संपर्क अभियानांच्या माध्यमातुन तरुणांशी संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे. तर उद्योगपती अनंत अंबानी यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. 15 दिवसांत झाली ही दुसऱ्यांदा भेट झाली आहे. दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा झाली असून चर्चेचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे, गोदाघाट परिसरात पाणी ओसरले आहे, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलं आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. पावसाने देखील नाशिकमध्ये रात्रीपासून विश्रांती घेतली आहे. मात्र आज आणि उद्या नाशिक घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
ठाकुर्ली खंबाळपाडा परिसरातील ९० फुटी रस्त्यावर सुलभा चौधरी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून लंपास करत आरोपी झाले पसार. शिवमंदिर रस्ता परिसरात 63 वर्षीय हर्षला सोनवटकर या महिलेला दोन चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून हातचलाखीने गळ्यातील माळ आणि हातातील अंगठी पिशवीत ठेवायला लावून दागिने केले लंपास. दोन्ही प्रकरणात एकूण दीड लाखाचा सोन्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुण्यात सर्व वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. सुरळीत वाहतुकीसाठी शहर वाहतूक विभागात मोठ्या प्रमाणात खांदेपालट. शहरातील सर्व 31 वाहतूक पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा मोठा निर्णय. सरकारी कार्यालयात वैयक्तिक समारंभ (उदा. वाढदिवस) साजरे करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्याकडून निर्बंध. कार्यालयीन वेळेत समारंभांमुळे नागरिकांच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे कारण दिलंय. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना कार्यालयीन वेळेत वाढदिवस वा कोणतेही खासगी समारंभ साजरे करण्यास बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारांच्या तक्रारी मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश.
नाशिक येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना अनुभवता येणार हेलिकॉप्टरची सफर. ओझरहून नाशिकमधील तपोवन, त्र्यंबकेश्वर, कावनईसाठी हेलिकॉप्टरची राईड. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रयागराज प्रमाणेच नाशिकमध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं हेलिकॉप्टर सेवा पुरवली जाणार. एका हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी बसण्याची क्षमता, दिवसभरात हेलिकॉप्टरच्या ५० फेऱ्या. एका भाविकासाठी ओझर ते नाशिक भाडे अंदाजित ६ हजार रुपये तर त्र्यंबकेश्वरसाठी १० हजार रुपये भाडे राहण्याचा अंदाज.
राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत आणखी एक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश झाला आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. तसेच शोभा बनशेट्टी यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाने डावललं होतं. त्यानंतर बनशेट्टी यांनी सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून बनशेट्टी कुटुंबाचे राजकीय वर्चस्व राहिले आहे. शोभा बनशेट्टी या अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दीर्घप्रतिक्षेनंतर वाशिम आणि मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाच्या हजेरीमुळे अंकुरलेल्या पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. तसेच पावामुळे खरीप पेरणीला वेग येणार आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीत अजितदादांचा एकहाती विजय झाला आहे. दादांच्या निळकंटेश्वर पॅनेलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सहकार बचाव पॅनेलचे चंद्रकराव तावरे विजयी झाले.
नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाट्याजवळ कारने स्कुटीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या कारच्या धडकेत स्कुटीवरील वृद्ध गंभीर जखमी झाले. जखमी वृद्धास जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीनंतर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दत्तू सहादू जाधव असं मृताचं नाव आहे.
भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, आज आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्या काळात दीड लाख लोकांना अटक करण्यात आली होती. मी विचारतो की काँग्रेस पक्षाने आजपर्यंत आणीबाणीच्या अत्याचारांबद्दल माफी का मागितली नाही?
पंतप्रधान मोदी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “देशातील अन्न उत्पादकांच्या कल्याणासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आज आमच्या सरकारने आग्रा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. याचा बटाटा उत्पादनाशी संबंधित आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींना मोठा फायदा होईल.”
पुणे शहरातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. नोटीसद्वारे महापालिका प्रशासनाचं वाडामालकांना आवाहन केलं आहे. पण याकडे दुर्लक्ष करत 37 वाडा मालक आणि भाडेकरू यासाठी विरोध करत आहेत. त्यामुळे या वाड्यांची वीज जोडणी तसेच पाणी पुरवठा खंडित करण्याचा पुणे महापालिकेने निर्णय घेतला आहे.
दोन लाखाची लाचेची मागणी केल्यानंतर 95 हजार रुपये स्वीकारताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार यांना ताब्यात घेतलं आहे. गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीनंतर 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे ठरलं होतं. धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके आणि महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतलं आहे.
अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने ठाकरे गटाने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी अन्न व धान्य वितरण अधिकाऱ्याच्या टेबलबर तांदूळ टाकले व सरकारचा निषेध केला.
अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी अक्कलकोट येथे भाषणामध्ये केलेल्या वादग्रस्त वास्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. जगताप यांच्या वक्तव्याबद्दल पक्षातील काही नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे. यावर अजितदादांनी देखील राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष असून संग्राम जगताप यांच्याशी बोलून त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे म्हटलं होत. मात्र अजित पवारांनी बोलविलेल्या बैठकीला आमदार संग्राम जगताप यांनी दांडी मारली. आज दिंडी येणार असल्यामुळे बैठकीला जाता आलं नसल्याचे जगताप यांनी म्हटलं.
प्रमोद कोंढरे यांच्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आला होता. यानंतर आता प्रमोद कोंढरे यांच्यावर कारवाई करण्याची आणि कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाला पाठवण्याची सूचना रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.
राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा असे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर आणा, यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत डेडलाईन ठेवा असं सावे यांनी म्हटलं आहे.
नांदेडमध्ये पावसाची उघडीप, शेतकऱ्यांनी तीन एकर सोयाबीनवर फिरवला वखर
– अर्धवट सोयाबीन निघाल्याने शेतकरी हतबल,
– नांदेड जिल्ह्यातील 10 लाख एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट.
– दागिने विकून पेरणी केली होती, आता बैल जोडी विकल्याशिवाय दुबार पेरणी करता येणार नाही
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वसोली येथे कॉजवेवरून अमित धुरी हा दुचाकीस्वार सोमवारी वाहून गेला होता,त्याचा मृतदेह 36 तासाने सापडला आहे.
पहिलीपासून हिंदीची काहीच आवश्यकता नाही या विषयावर मी एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्याशी बोलणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे मध्ये शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने विरोध सुरू केला आहे
आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर असतानाच अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत संग्राम जगताप गैरहजर राहीले आहेत.
रिक्षा चालकाला डांबून ठेवत कार चालकाने मारहाण केल्याने रिक्षा चालकाने हे पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे.कार चालकाने 70 वर्षीय मुंजाजी शेळकेंकडून 2 लाख मागितले होते. हे पैसे कुठून देणार या दबावाखाली रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं.
‘अवैध भोंगे उतरवले गेलेच पाहिजे, सोमय्यांची भूमिका योग्य’ असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केला आहे. भोंग्याच्या आवाजाने त्रस्त असल्याने कोर्टात धाव घेतली असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान लष्करातील मेजर सय्यद मुईझ अब्बास शाहची हत्या करण्यात आली आहे. मेजर मुर्झझनेच विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता. दक्षिण वझिरिस्तानमध्ये मेजर मुईझची हत्या झाल्याची माहिती आहे.
राज्यात क्रीडा सुविधांसाठी 50 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक गावात 10 लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवणार. राज्य क्रीडा विकास निधी सनियंत्रण समिती बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुपडू भादू पाटील विद्या मंदिर शाळेतील ही घटना आहे.
“आणीबाणीच्या काळात तुरुंगात जी माणसे भेटली, त्यांच्यामुळेच आमची जडणघडण झाली. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली. त्यांना घेऊन आज भाजप सत्तेत आहे. त्यामुळे ज्या दिवशी अजित पवारांबरोबर भाजपने सरकार स्थापन केले, त्याच दिवशी आणीबाणीत तुरुंगवास भोगल्याबद्दलचा मिळणारा सन्माननिधी मी नाकारला” असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले.
“आमच्या पक्षाचा आहे म्हणून प्रमोद कोंढरे याला पाठीशी घालणार नाही. आज सकाळीच मी पुणे शहराध्यक्ष यांच्या सोबत बोलली आहे. त्याला पदमुक्त केले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुंभाशु शुक्ला आणि तीन अन्य अंतराळवीर आज एक्सिओम-4 मिशनसाठी रवाना झाले. ते आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर जाणार आहेत. दुपारी 12.01 मिनिटांनी मिशन लॉन्च झालं. बुधवारच्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान 90 टक्के अनुकूल आहे, स्पेसएक्सने जाहीर केलं होतं.
धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांची धरपकड केली. भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी इथं शक्तीपीठाच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाणीसाठा प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यंदा प्रथमच जूनमध्ये सांगली जिल्ह्यातील प्रकल्प निम्मे भरले आहेत. यामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगाम समाधानकारक होण्याची आशा निर्माण झाली आहे. सध्या 83 प्रकल्पात 3963 दशलक्ष घनफूट म्हणजेच 51% पाणीसाठा उपलब्ध आहे.
“हिंदी भाषेची सक्ती करू नये. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा”, अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. “आज मी जो कोणी आहे, ते माझ्या मराठी या मातृभाषेमुळे आहे. माझ्या गावाची, जिल्ह्याची, राज्याची भाषा मराठी असताना हिंदी भाषा लहानपणापासून सक्तीची कशासाठी? मी मराठीतच ग्रॅज्युएट असून मराठीतून शिक्षण घेतलं आहे, असं ते म्हणाले.
पुणे – भाजपच्या प्रमोद कोंढरेंनी शहर महामंत्रीपदाचा राजीनामा दिला. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पदावर राहणार नसल्याची कोंढरेंनी भूमिका घेतली आहे. प्रमोद कोंढरेंवर काल महिला पोलीस अधिकारीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करून घटनेचा निषेध केला होता.
नालासोपाऱ्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा ईमेल शाळेला आल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनात भीतीचं वातावरण निर्माण झालं. शाळेच्या प्रिन्सिपलच्या ईमेल आयडी वर आज पहाटे 4 वाजता हा ईमेल आला होता. आज सकाळी शाळा सुरू झाल्यावर ईमेल आयडी बघितल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पालकांना बोलावून शाळा रिकामी केली. नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, शाळेच्या सर्व बाजूनी तपास करीत आहेत. अद्याप तरी शाळेत बॉम्ब असल्याचं काही आढळून आलं नसून आलेला ईमेल हा फेक असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
नांदेड येथून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी विरोध दर्शवला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जालना आणि संभाजीनगर वरूनच सुटली पाहिजे अशी मागणी करतानाच या संदर्भात आपण रेल्वेमंत्र्यांना आणि वरिष्ठांना पत्रही लिहिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुसरी एखादी वंदे भारत पाठवायची असेल, तर आणखी एक वंदे भारत करा असे त्यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन अजून एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी नमूद केलं.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठेकेदाराने कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवर संवाद साधताना आमदारांविषयी अपशब्द वापरले होते. यामुळे पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदन देत मुकुंद काकड नामक ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीनी केली.
सातपुडा पर्वत रांगेत गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे सातपुड्यातील नद्यांची पाणी पातळीत वाढ झाली आहे.
धडगाव तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या नदीचया पाणी पातळीत वाढ झाली असून पुलावर पाणी जात असल्याने जवळपास 12 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला.
आणीबाणी ही शिस्त लावणारी,. आणीबाणी ही घटनात्मक तरतूद, यांनी अभ्यास करावा. पण सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे, त्यामुळे भाजपने आणीबाणीवरून ढोंग करू नये – संजय राऊतांनी सुनावलं.
महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्राच मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा सुरू आहे – संजय राऊतांची टीका
केंद्र शासनाच्या प्रस्तावित वाढवण बंदराच्या हालचालींना वेग आला आहे. JNPA कडून आज पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वरोर – वाढवण या किनारपट्टीवर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र हे सर्वेक्षण स्थानिक उधळून लावले आहे. पोलीस प्रशासन आणि सर्वेक्षणास आलेले अधिकारी यांना पुन्हा माघारी फिरायला लागल्याचे समोर आले आहे. यामुळे वाढवण बंदराचा विरोध कुठेतरी पुन्हा एकदा तीव्र झालेला दिसून येत आहे
दिवा शहरातील अनधिकृत शाळांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिव्यातील १९ अनधिकृत शाळांच्या संघटनेने १ जुलैपासून शाळा बंद ठेवण्याचा इशारा ठाणे पालिका प्रशासनाला दिला आहे. गेल्या चार वर्षांपासून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करूनही दिवा परिसरात ८२ अनधिकृत शाळा सर्रासपणे सुरू असल्याचा दावा अधिकृत शाळांच्या संघटनेने केला आहे. यापूर्वीही ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत शाळांवर कारवाई केली होती, मात्र तरीही हा प्रश्न जैसे थे असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जालना शहरालगत असलेल्या मोती तलावात जाळ्यात अडकलेल्या एका बदकाला वाचविण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाकडून या तरुणाचा शोध घेण्यात येत असून अद्यापही हा तरुण सापडलेला नाही. बदकाला वाचविण्याच्या नादात त्याच तरुणाचा पाय जाळ्यात अडकला आणि तो बुडाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर मोती तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गढी कधीही कोसळेल अशा परिस्थितीत… काझी गढी वर सध्या 15 हजार नागरिकांचा रहिवास… 350 घरांना मनपाने दिल्या आहेत नोटीसा… काझी गढी ला संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव,मात्र कारवाई अद्यापही प्रतिक्षेत..
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 25% ज्यादा नफ्याचे प्रलोभन दाखवून मुकेश यादव यांची फसवणूक केली आहे…. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहे…
२०२५ मध्ये कुंभ मेळा, विमान आणि मुंब्रा रेल्वे अपघातांमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महामृत्युंजय जप व हवनाचा अनोखा उपक्रम… नागरिकांच्या सुख, शांती आणि दीर्घायुष्यासाठी सकारात्मक ऊर्जे साठी कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राबवला धार्मिक उपक्रम… भरत गोगावले यांच्या आघोरी पूजेच्या चर्चा सुरू पार्श्वभूमीवर पोटेंच्या धार्मिक उपक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू
तोडफोडित डॉक्टर सस्ते यांच्या पार्वती हॉस्पिटलचे मोठे नुकसान… रात्री पावणे अकराच्या सुमारास झाली तोडफोडीची घटना… वैद्यकीय सेवा नाकारल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची डॉक्टरांची माहिती… तोडफोड करणाऱ्यांनी हॉस्पिटल मधील लॅबचे देखील केलं मोठं नुकसान… दहा ते बारा लोकांनी येऊन चार चाकी गाडीच्या काचा फोडून, एलईडी टीव्हीसह हॉस्पिटल मधील इतर सामानाची केली तोडफोड प्रत्यक्षदर्शीची माहिती… हॉस्पिटल परिसरात दगड आणि काचांचा खच… अज्ञात व्यक्तीकडून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा डॉक्टरांचा दावा..