Maharashtra Breaking News LIVE : बिहार निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी 12 सभा घेणार

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : बिहार निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी 12 सभा घेणार
| Edited By: | Updated on: Oct 20, 2025 | 8:14 AM

महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजता गोरेगाव पूर्व या ठिकाणी नेस्को सेंटर या ठिकाणी मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे लवकरच होण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. तर दुसरीकडे दिवाळीनिमित्त राज्यातील बाजारपेठांमध्ये संमिश्र चित्र आहे. मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये आज नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. मागणी वाढल्याने फुलांचे दर वधारले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Oct 2025 09:40 PM (IST)

    बिहार निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी 12 सभा घेणार

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 सभा घेणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनीही 25 सभांचे नियोजन केले आहे.

  • 19 Oct 2025 09:30 PM (IST)

    पंतप्रधान मोदी 24 ऑक्टोबर रोजी समस्तीपूर येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार

    पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी समस्तीपूर येथून त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील. बेगुसरायमध्येही एक रॅली होणार आहे.

  • 19 Oct 2025 09:20 PM (IST)

    दिवाळीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “दिवाळीच्या शुभ प्रसंगी, मी भारतातील आणि जगभरातील सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा देते.

  • 19 Oct 2025 09:16 PM (IST)

    लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा गँगस्टर हॅरी बॉक्सरवर अमेरिकेत हल्ला

    लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी असलेल्या गँगस्टर हॅरी बॉक्सरवर हल्ला झाला आहे. हा हल्ला अमेरिकेत झाला. रोहित गोदारा टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आणखी एका गुंडाचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. रोहित गोदारा याने एका पोस्टमध्ये हा दावा केला आहे.

  • 19 Oct 2025 06:39 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांचा आमदार किशोर पाटील यांना पाठींबा

    विरोधात लढलेल्यांना भाजप पक्षात घेत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे बोलणं उचित आहे. जी नियमावली महाराष्ट्र लेव्हलला ठरलेली आहेत, ती नियमावली सगळ्यांनी पाळली आणि ही नियमावली पाळली नसल्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी ‘एकला चलो चा’ नारा दिला आहे. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची पाठराखण केली आहे.

  • 19 Oct 2025 06:27 PM (IST)

    पुणे – जमीनीच्या वादातून महिलांना मारहाण

    पुण्याच्या हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई येथे जमिनीच्या वादातून जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. वाडे बोल्हाई येथील भोसले वस्ती परिसरात शेतीकडे जाणाऱ्या वहिवाटीचा रस्ता शेतकरी कामठे यांनी खोदल्याने महिला शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे.

  • 19 Oct 2025 06:14 PM (IST)

    पतीत पावन संघटनेने मजारवर भगवा झेंडा लावला आहे – मेधा कुलकर्णी

    पतीत पावन संघटनेने मजारवर भगवा झेंडा लावला आहे. आणि ही तर एक सुरुवात आहे.ज्या ज्या ठिकाणी अशी अनधिकृत कृत्य केले जाईल त्याला ठोस उत्तर दिले जाईल असे भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा येथे नमाज पढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या आंदोलनात म्हटले आहे.

  • 19 Oct 2025 05:51 PM (IST)

    सिंधुदुर्गसाठी नव्याने एसटी बसेस दाखल

    दिवाळी सणात सिंधुदुर्ग एसटी विभागाला नवीन लालपरी बसेस यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. आता आणखी तीन नवीन बसेस दाखल झाल्या असून त्या कुडाळ आगाराला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी 60 नवीन एसटी बसेस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी 55 बसेस यापूर्वी प्राप्त झाल्यात. तर आज नवीन 3 बसेस दाखल झाल्या असून या लांबपल्ल्याच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहेत.

  • 19 Oct 2025 05:35 PM (IST)

    बीड – वडवणी तालुक्यात धर्मांतर करण्याचा प्रयत्न

     

    बीडच्या वडवणी येथे एका ख्रिश्चन व्यक्तीकडून काही लोकांना एकत्रित करत त्यांना मार्गदर्शन करणे सुरू होते. त्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दाखल होत हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हणत आक्षेप घेतला. तसेच पोलिसांना देखील कल्पना दिली. या ठिकाणी काही लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता शिवसेना तालुकाप्रमुख विनायक मुळे यांनी केला आहे. या संदर्भात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • 19 Oct 2025 05:20 PM (IST)

    पुणे: शनिवारवाड्यासमोरील उद्यानात नमाज पठणचा व्हिडीओ व्हायरल

    पुण्याच्या शनिवारवाड्यासमोरील उद्यानात मुस्लीम लोकांमार्फत नमाज पढण्याचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार नेमका कसा आणि कधी घडला याविषयी तर्क वितर्क केले जात असून या संदर्भात आता हिंदू संघटनांनी विरोध केल्याचे पुढे येत आहे. या घटनेनंतर आता पतितपावन संघटनेच्या वतीने शनिवार वाड्यात शिव वंदना केली जाणार असल्याने शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला आहे.

  • 19 Oct 2025 05:09 PM (IST)

    विरोधकांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा

    राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अगोदर सध्या राज्यात मतदार याद्या आणि बोगस मतदाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांविषयी आपली तक्रार केली होती. आता राज्यातील सर्वच विरोधक एकत्र आले असून ते येत्या 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढणार आहेत.

  • 19 Oct 2025 04:55 PM (IST)

    दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जळगावातील व्यक्तीचा मेहरूण तलावात आढळला मृतदेह

    दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जळगावातील व्यक्तीचा मेहरूण तलावात आढळला मृतदेह

    संतोष वामन नेरपगार असे 60 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव

    संतोष नेरपगार यांनी आत्महत्या केली के ते पाण्यात पडले याबाबत कोणतीही माहिती नाही

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

     

  • 19 Oct 2025 04:40 PM (IST)

    दिवाळीनिमित्त सांगलीमध्ये एक दिवा सैनिकांसाठी उपक्रम

    दिवाळीच्या निमित्ताने सांगलीमध्ये एक दिवा सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम पार पडला. वीर, पत्नी, माता यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी, या संकल्पनेतून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहिदांना अभिवादन करत वीर माता,पत्नी, माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबासमवेत फराळ वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली.

  • 19 Oct 2025 04:27 PM (IST)

    India vs Australia 1st Odi Live Score : अखेर विकेट मिळाली, जोश फिलिप आऊट, ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका

    वॉशिंग्टन सुंदर याने जोश फिलीप याला अर्शदीप सिंह याच्या हाती कॅचआऊट करत ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला आहे. जोश फिलीप याने ऑस्ट्रेलियासाठी 29 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.

  • 19 Oct 2025 03:45 PM (IST)

    अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर गृहाच उद्घाटन

    अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर गृहाचा उद्घाट सोहळा नुकताच पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. सही रे सही या नाटकाने नाट्यगृहात वाजणार पहिली घंटा.

  • 19 Oct 2025 03:38 PM (IST)

    निवडणूक आयोगाने फेटाळले विरोधकांचे आरोप

    राज्यातील राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता. काही लोकांची नावे दोन मतदार संघात असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. तसेच काही मतदारांचे वय चुकीचे असल्याचाही आरोप विरोधकांनी केला होता. आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

  • 19 Oct 2025 03:25 PM (IST)

    बीडमध्ये नागरिकांना दिवाळीत पुरवठा विभागाने दिला सडलेला तांदूळ

    ऐन दिवाळीच्या सणात बीड तालुक्यातील नागरिकांना 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहु वाटप केले जात आहे‌त. तर ज्वारी मात्र देण्यात येत नाही. शेकडो राशन दुकानावर पुरवठा विभागाने पाठवलेला तांदूळ पूर्णपणे सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे तर अतिवृष्टीने झोडपलेल्या बीड तालुक्यातील नागरिकांची प्रशासनाने अशा पद्धतीने चेष्टा केली आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. पुरवठा केलेला तांदूळ आरोग्यासाठी धोकादायक आहे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

  • 19 Oct 2025 03:04 PM (IST)

    नाशिकमध्ये भाजपाच्या मामा राजवाडेंवर आणखी एक गुन्हा दाखल

    नाशिकमध्ये भाजपाच्या मामा राजवाडेंवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

  • 19 Oct 2025 02:51 PM (IST)

    निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका देण्याची तयारी – राऊत

    निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका देण्याची तयारी आहे राऊत यांनी म्हटलं आहे. पुरावे देऊनही आयोग ऐकत नसेल तर रस्त्यावर उतरून दणका देऊ असंही राऊत म्हणाले.

     

  • 19 Oct 2025 02:28 PM (IST)

    अहिल्यानगर शहरातील 5 डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

    अहिल्यानगर शहरातील 5 डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोविड काळातील गैरप्रकारावरून डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरीराचे अवयव तस्करी, प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे असे आरोप या डॉक्टरांवर आहेत.

     

     

     

     

  • 19 Oct 2025 02:10 PM (IST)

    राजकीय पक्षाचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊन दाखवाच : राज ठाकरे

    महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तसेच मतदान यांद्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तसेच राजकीय पक्षाचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊन दाखवाच असं थेट चॅलेंजच राज ठाकरेंनी सरकारला केलं आहे.

     

  • 19 Oct 2025 01:51 PM (IST)

    मतदारांच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती- थोरात

    “मतदारांच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी नावांची दुरुस्ती झालीच पाहिजे. मतदार यादींची दुरुस्ती व्हावी या मताचे आम्ही देखील आहोत. निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत. मतदार यादीचा घोळ हा मोठा फंडा आहे,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 19 Oct 2025 01:37 PM (IST)

    राज्य सरकारचे आभार मानावे तेवढं कमी- किशोर पाटील

    “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. सरकारने शब्द दिला होता, त्याचप्रमाणे आज राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली. परिस्थिती भयावह होती. मी माझ्या आयुष्यात बघितला नाही एवढा पाऊस माझ्या मतदारसंघात झाला होता. सरकारने शेतकऱ्याला पन्नास हजार काय एक लाख रुपये हेक्टर जरी मदत केली असती तरी पाच वर्ष शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही, अशी परिस्थिती आहे. तरी देखील एक आधार म्हणून राज्य सरकारने जो पैसा शेतकऱ्यांना दिला सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहे,” अशी प्रतिक्रिया किशोर पाटलांनी दिली.

  • 19 Oct 2025 01:24 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

    “शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील. माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेऊन माझ्या अंत्ययात्रेची तयारी भाजप करत आहे. शिवसेना आणि मित्र पक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी आहे,” असं ते म्हणाले.

  • 19 Oct 2025 01:12 PM (IST)

    ..तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचं आव्हान

    माझी मतदारांना विनंती आहे की, आमच्या पक्षाची किंवा इतर कोणत्या पक्षाची लोकं येतील, तेव्हा त्यांना सहकार्य करा. जे मतदार नाहीयेत, अशी सगळी खोटी नावं दाखवून हे निवडणुकांना सामोरं जायचं सांगतायत. जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा, असं आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

  • 19 Oct 2025 01:09 PM (IST)

    तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्सिंग झालेली आहे- राज ठाकरे

    तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्सिंग झालेली आहे. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मतदारयाद्यांमध्ये तुमची गणितं सगळी सेट केली असेल तर कसा आमदार खासदार आमचा निवडून येईल? आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना सांगतोय की या याद्या सुधारा की सत्ताधारी पक्ष चिडतोय. हे का चिडत आहेत? यांनी शेण खाऊन ठेवलं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

  • 19 Oct 2025 12:49 PM (IST)

    कित्येक वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये घोळ सुरु – राज ठाकरे

    कित्येक वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये घोळ सुरु आहे… 232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता… जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे..

  • 19 Oct 2025 12:45 PM (IST)

    पुणे आहिल्यानगर महामार्गावर वाघोली ,कोरेगाव भिमा,शिक्रापुर रांजणगाव मध्ये मोठी वाहतुककोंडी

    पुणे आहिल्यानगर महामार्गावर वाघोली ,कोरेगाव भिमा,शिक्रापुर रांजणगाव मध्ये मोठी वाहतुककोंडी… दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची रस्त्यावर गर्दी… वाहनांच्या लांबचलांब रांगा , वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची दमछाक… सनासुदीच्या काळात वाहतुककोंडीने नागरिकांसह प्रवाशी त्रस्त…

  • 19 Oct 2025 12:13 PM (IST)

    काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपत प्रवेश निश्चित

    दिवाळीनंतर मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दिलीप माने यांची माहिती… पक्षप्रवेश झाल्यानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार… समर्थकांसोबतच्या बैठकीनंतर दिलीप माने यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपत जाण्याचा निर्णय घेतला… दोन दिवसांपूर्वीच दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती… त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर भाजप जाण्याचे निश्चित केले.

  • 19 Oct 2025 12:04 PM (IST)

    नाशिकच्या के के वाघ शिक्षण संस्थेत जयंती कार्यक्रम

    शिक्षणसम्राट कैलासवासी बाळासाहेब वाघ यांच्या 93 व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम पार पडतोय… अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित… धुळ्याचे खासदार शोभा बच्छाव , आणि स्थानिक आमदार उपस्थित

  • 19 Oct 2025 11:59 AM (IST)

    काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपत प्रवेश निश्चित

    दिवाळीनंतर मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दिलीप माने यांनी माहिती दिली.पक्षप्रवेश झाल्यानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे ते म्हणाले. समर्थकांसोबतच्या बैठकीनंतर दिलीप माने यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर भाजप जाण्याचे निश्चित केले.

  • 19 Oct 2025 11:50 AM (IST)

    निफाड तालुक्यात धुक्याची चादर

    गोळेगाव, गोंदेगाव, भरवस फाटा तसेच परिसरातील गावे या धोक्याच्या चादरीत हरवली. थंड वाऱ्याच्या झूळुकिंसह या धुक्यामुळे संपूर्ण परिसर निसर्गरम्य दुश्यात न्हाऊन निघाला. मुसळधार पावसानंतर यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी वातावरणात मोठे बदल दिसत आहेत.

  • 19 Oct 2025 11:40 AM (IST)

    फुलबाजारात सुगंधांचा दरवळ

    दिवाळीच्या सणात प्रत्येक घर सुगंधी फुलांनी सजवण्याची प्रथा आहे. त्यामुळे झेंडू, शेवंती, गंधराज, गुलाब या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. पुणे, शिरूर, खेड परिसरातील शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच फुलतोड सुरू केली असून, थेट फुलबाजारात पोहचवण्यासाठी गाड्यांची लगबग सुरू आहे.दिवाळीच्या दिवसांत फुलांचा सुगंध केवळ देवघरातच नाही तर शेतकऱ्यांच्या घरातही आनंदाचा दरवळ घेऊन येतोय. दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला असताना बाजारपेठा फुलांच्या सुगंधाने दरवळल्या आहेत. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पारंपरिक सणासाठी फुलांच्या हार, तोरणं आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळे फुलबागांमध्ये आज सकाळपासूनच तोडणीला जोर आलाय आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य फुललं आहे.

  • 19 Oct 2025 11:30 AM (IST)

    वाकोद गावातील ७० जणांची तीन कोटींची फसवणूक

    जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील ७० जणांची तीन कोटींची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पहूर पोलिसात जामनेरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी नगरसेवक बोहरा यांनी प्लॉट खरेदीत ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयात फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.वाकोद येथील प्लॉट खरेदी प्रकरणात फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.पंढरी उर्फ संजय गणपत चौधरी यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • 19 Oct 2025 11:16 AM (IST)

    कुठलाही व्यवहार झालेला नाही -मंत्री मुरलीधर मोहोळ

    गोखले यांच्यासोबत दोन एलएलपी केल्या आहेत. पण त्यांच्यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. मी यापूर्वीच नोव्हेंबर 2024 मध्ये या दोन्ही एलएलपीमधून बाहेर पडलो. जैन बोर्डिंगप्रकरणात मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी असा खुलासा केला.

  • 19 Oct 2025 11:10 AM (IST)

    प्रवाशाला रिक्षा चालकांकडून मारहाण

    नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रिक्षा चालकांकडून प्रवाशाला मारहाण करण्यात आली. रात्री १० च्या सुमारास एक प्रवासी घरी जाण्यासाठी बस स्टँडवर उभा होता. बेधुंद अवस्थेत असलेल्या काही रिक्षा चालकांनी त्याला लाठी-काठीने मारहाण केली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • 19 Oct 2025 11:00 AM (IST)

    राज ठाकरे मेळव्यासाठी दाखल

    गोरेगाव येथे मनसे मेळावा होत आहे. यात मनसेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. राज ठाकरे मेळव्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत अमित ठाकरे पण उपस्थित आहेत. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

  • 19 Oct 2025 10:55 AM (IST)

    जळगावमध्ये स्वातंत्र्य चौकातील इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग

    स्वातंत्र्य चौकातील मोहिते कॉम्प्लेक्समधील गायत्री इलेक्ट्रिकल्स व स्टेशनरी या दुकानाला लागली मध्यरात्री आग अचानक आग लागली. दोन झेरॉक्स मशीन, लॅपटॉप, आणि दिवाळी सणाच्या विक्रीसाठी ठेवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक.

  • 19 Oct 2025 10:30 AM (IST)

    नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू

    कर्मभूमी एक्सप्रेस म्हणून पडले होते तीन जण खाली त्यातून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर. जखमी युवकावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. 30 ते 35 वयोगटातील दोन युवक आढळले मृत अवस्थेत, प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रकसोल बिहार कडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस मध्ये घडली घटना

  • 19 Oct 2025 10:20 AM (IST)

    नितेश राणे आणि संग्राम जगताप हे मुस्लिम विरोधी नाहीतर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस विरोधी

    भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जलाम सिद्दिकी यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे….

     

  • 19 Oct 2025 10:10 AM (IST)

    महापालिका आयुक्त भूषण गगराणी करणार कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी

    महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबईतील फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आयुक्तांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होणार. तर पूर्ण वर्षभर मुंबईला सुरक्षित व आगीपासून मुक्त तसेच कुठल्याही आपत्ती जन्य परिस्थिती मधून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन जवान तत्पर असतात..

  • 19 Oct 2025 10:00 AM (IST)

    ७० जणांची तीन कोटींची फसवणूक

    जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील ७० जणांची तीन कोटींची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात जामनेरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी नगरसेवक बोहरा यांनी प्लॉट खरेदीत ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयात फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे

  • 19 Oct 2025 09:58 AM (IST)

    पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

    दिवाळीनिमित्त पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे आज सकाळपासूनच पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गावर वाहतूक इतकी मंदावली आहे की, प्रवाशांना केवळ एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तास लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावला असून, नागरिक या सततच्या वाहतूक कोंडीमुळे वैतागले आहेत. दिवाळीच्या तोंडावर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील प्रवाशांची अक्षरशः कोंडी झाली आहे.

  • 19 Oct 2025 09:43 AM (IST)

    मनसेचा आज मेळावा, राज ठाकरे मार्गदर्शन करणार

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आज गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवर सकाळी १० वाजता भव्य मेळावा आयोजित करत आहे. मनसेकडून या ग्रँड मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली असून वांद्र्यापासून ते नेस्को ग्राऊंडपर्यंत संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष आणि मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील घोळ आणि त्रुटींवर आक्षेप नोंदवले होते. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून, मतदार यादीतील अनियमितता, दुबार नावे आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटी या संदर्भात सतर्क राहण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या महत्त्वाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे हे देखील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

  • 19 Oct 2025 09:38 AM (IST)

    पुणेकरांसाठी मोठी बातमी, वन पुणे कार्डवर करा मेट्रो आणि बसचा प्रवास

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या प्रवासासाठी एक मोठी आणि सोयीची सुविधा आजपासून सुरू होत आहे. आता वन पुणे कार्डमुळे मेट्रो आणि बसचा प्रवास कॅशलेस होणार आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA), महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा कार्यान्वित केली जात आहे. हे वन पुणे कार्ड एक स्मार्ट कार्ड प्रणाली असून या कार्डचा वापर सुरुवातीला पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएल बससेवेसाठी करता येणार आहे.

  • 19 Oct 2025 09:32 AM (IST)

    दादर फुल मार्केटमध्ये दिवाळीची लगबग, फुलांचे भाव गगनाला

    दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये आज नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.  मार्केटमध्ये विविध फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सणासुदीमुळे फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सध्या दादर मार्केटमध्ये झेंडूची फुले ८० रुपये ते १२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. याशिवाय, शेवंती १८० रुपये किलो असून, पूजेसाठी आवश्यक असलेले कमळ १२० रुपये प्रति डझन दराने उपलब्ध आहे. आकर्षक आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या गुलाबाचा दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजन आणि सजावटीसाठी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फुल खरेदीला सुरुवात केली आहे.

  • 19 Oct 2025 09:25 AM (IST)

    नाशिक रोडजवळ रेल्वेतून पडून दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

    नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रक्सोल (बिहार) कडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून खाली पडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दिवाळीनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने, गाडीतून तोल जाऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत झालेले दोन्ही युवक अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या जखमी युवकावर तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 19 Oct 2025 09:19 AM (IST)

    बीडमध्ये छातीत गोळी लागून तरुणाचा मृत्यू, हत्या की आत्महत्या गूढ कायम

    ऐन दिवाळीत बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली याबाबत संदिग्धता आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • 19 Oct 2025 09:13 AM (IST)

    गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, महायुतीत स्वतंत्र लढण्याची तयारी, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर लक्ष

    गोंदिया जिल्ह्यात लवकरच होणाऱ्या दोन नगर परिषद आणि दोन नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये स्वबळावर लढण्याची भावना तीव्र आहे. भाजपच्या नेत्या सीताबाई रहांगडाले यांनी कार्यकर्त्यांच्या भावना स्वतंत्र लढण्याची असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी झाली आहे असे सांगितले. शिवसेना शिंदे गटाकडूनही स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. मात्र, गोंदियातील महायुतीतील सर्व घटक पक्षांनी सध्या तयारी स्वतंत्रपणे सुरू केली असली तरी पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोंदियातील महायुती एकत्र लढते की वेगवेगळी, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • 19 Oct 2025 09:07 AM (IST)

    जालन्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर रोगाचा धोका

    जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे दाट धुक्याची चादर पसरत असल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कपाशी आणि मक्का पिकावर बुरशी तर तुरीवर फुल किड्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यापूर्वीच शेतकऱ्यांना पावसाने चांगला फटका बसल्याने प्रचंड नुकसान झालं. त्यात आता पुन्हा एकदा धुके पसरल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा संकट उभे राहिले आहे.

  • 19 Oct 2025 09:02 AM (IST)

    नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, तीन जण गंभीर

    नाशिक-मुंबई महामार्गावर आज पाडळी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील सियाज कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात आदळून तीन पलटी खाल्ल्याने हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.