Maharashtra Breaking News LIVE : सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 3:45 PM

कल्याणमध्ये शेअर गुंतवणुकीच्या आमिषा दाखवून लाखोंचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. 800% नफ्याचे अमिष दाखवत ऑनलाईन लिंकद्वारे नोकरदाराची फसवणूक करत कडून 71 लाख उकळल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर डोंबिवलीच्या 23 वर्षीय आर्यन शिरवळकरची गगनभरारी घेतली आहे. आफ्रिकेतील सर्वोच्च माऊंट किलिमांजारो सर करत भारताचा तिरंगा फडकवला. 13 दिवसांच्या मोहिमेत 19 हजार 341 फूट उंच शिखरावर पोहोचत भारताचा तिरंगा फडकवला आहे. 5000 हून अधिक गड-किल्ले सर करणाऱ्या आर्यनवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले आणि सांताक्रूझ भागात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jul 2025 07:55 PM (IST)

    परभणी: मराठा संघटनांकडून सुनील तटकरेंचे बॅनर फाडले

    छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्यांकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी परभणीत मराठा संघटनांकडून आंदोलन करण्यात आले आहे. मराठा संघटनांकडून शहरात सुनील तटकरे यांचे लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 21 Jul 2025 07:42 PM (IST)

    सकल मराठा समाजाकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाण्याची मागणी

    लातूरमध्ये सकल मराठा समाजाने एकत्र येत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छावा संघटनेच्या विजय घाडगे यांच्यावर हल्ला करणाऱ्या सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशीही मागणी करण्यात आली आहे.

     

  • 21 Jul 2025 07:25 PM (IST)

    तुम्ही आता काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे, जरांगे पाटलांनी ज्ञानेश्वरी मुंडेना दिला धीर

    मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेची भेट घेलती. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही आता काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे. मला थोडा वेळ द्या मी आता संपूर्ण माहिती घेतो आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आरोपीं अटक झालीच पाहिजे, नाही झाली तर आपण संपूर्ण महाराष्ट्र बंद करू.

  • 21 Jul 2025 07:10 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्याचा DNA हा राष्ट्रवादी काँग्रेसचा – उमेश पाटील

    सोलापूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याचा DNA हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मात्र तरीही पक्ष संघटना मागे आहे. त्यामुळे संघटनेत बदल करण्याची गरज आहे. दक्षिण सोलापूर मध्ये 60-70 ग्रामपंचायत सरपंच आहेत, मात्र त्याठिकाणी आपली संघटना मजबूत नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे.

  • 21 Jul 2025 06:59 PM (IST)

    अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत मॅरेथॉन स्पर्धा

    अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत मॅरेथॉन स्पर्धा

    खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित

    अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन

  • 21 Jul 2025 06:39 PM (IST)

    लातूर मारहाण प्रकरणानंतर परभणीत मराठा संघटना आक्रमक

    लातूर मारहाण प्रकरणानंतर परभणीत मराठा संघटना आक्रमक

    परभणीत सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याला झाली होती मारहाण

    लातूर मारहाणीचे पडसाद परभणीमध्ये उमटले

    मराठा संघटना आक्रमक,  जोरदार घोषणाबाजी

  • 21 Jul 2025 05:58 PM (IST)

    सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का

    सांगली – सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का

    मिरज शहर प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश

  • 21 Jul 2025 05:36 PM (IST)

    मृत्यूनंतरही परवड संपेना, वृद्ध महिलाचा मतदेहा चिखलातून आणावा लागला

    कोल्हापूर – मृत्यूनंतरही वयोवृद्ध महिलेचा मृतदेह चिखलातून वाट काढतच तिच्या कुटुंबीयांना घरी आणावा लागल्याची घटना घडली. रस्ता नसल्याने वयोवृद्ध महिलेला उपचारासाठी बैलगाडीतून नेण्याची वेळ कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी गावातील ग्रामस्थांवर आली होती. बैलगाडीतून उपचारासाठी नेलेल्या संबंधित वृद्ध आजीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील बड्याचीवाडी गावातील महिलेला उपचारासाठी चिखलातून वाट काढत बैलगाडीतून नेल्याचा व्हिडिओ चार दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच मंदिर ठिकाणी तात्काळ कच्चा रस्ता तयार करून देण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी तहसीलदारांना दिल्या मात्र ज्या वृद्ध महिलेला या चिखलातून प्रवास करावा लागला होता त्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतरही वयोवृद्ध महिलेचा मृतदेह चिखलातून वाट काढतच तिच्या कुटुंबीयांना घरी आणावा लागला.

  • 21 Jul 2025 05:17 PM (IST)

    भंडारा, गोंदिया ते नागपूरच्या ऑटो चालक-मालक संघटनेचा 3 दिवसांपासून संप

    भंडाऱ्यासह गोंदिया ते नागपूर च्या ऑटो चालक-मालक संघटनेने गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारला आहे. भंडारा, लाखनी साकोली या मार्गावर ऑटो चालत असतात. मात्र मागील अनेक दिवसांपासून नागपूर ते गोंदिया चालणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालक संतापले आहेत.

  • 21 Jul 2025 05:01 PM (IST)

    कुत्र्याच्या चाव्यात 11 वर्षीय मुलगा जखमी, मालकाविरोधात गुन्हा दाखल

    पाळीव कुत्रा चावल्याने 11 वर्षीय चिमुरडा जखमी झाला. मानखुर्द परिसरात हा धक्कादायक घडला. त्यानंतर आता कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कुत्र्याच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सोहेल खान याच्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानवर भारतीय न्याय संहिता कलम 125, 125(अ) आणि 291 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 21 Jul 2025 04:51 PM (IST)

    राज्यात ऑनलाइन रमी, पोकर-तत्सम जुगारवजा गेम्स-ॲप्सवर बंदी घाला, अखिल चित्रे यांची मागणी

    राज्यात ऑनलाइन रमी, पोकर-तत्सम जुगारवजा गेम्स आण ॲप्सवर बंदी घाला, अशी मागणी शिव संचार संघटनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. चित्रे यांनी याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे.

    महाराष्ट्राचा संस्कार जागराचा आहे जुगाराचा नाही असं चित्रे यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसेच आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आसाम, गुजरात, ओडिशा, सिक्कीम ह्या राज्यांचा दाखला देत महाराष्ट्रातही जुगारवजा गेम्स-ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी चित्रे यांनी केली आहे.

  • 21 Jul 2025 04:15 PM (IST)

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापुरातील मेळाव्यात दाखल

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापुरातील मेळाव्यात दाखल झाले आहेत. सोलापुरात दाखल होताच सुनील तटकरे यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. सुनील तटकरे यांचे 100 फुटाचे बॅनर लावत केक कापून स्वागत करण्यात आलं. सुनील तटकरे यांचा राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

  • 21 Jul 2025 04:05 PM (IST)

    महादेव मुंडे प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

    महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. बजरंग सोनवणे बीड जिल्ह्यातील इतर काही प्रकरणंही अमित शहा यांच्यासमोर मांडरणार आहेत.

  • 21 Jul 2025 03:54 PM (IST)

    गुगल-मेटा कंपनी ईडीसमोर हजर झाली नाही

    ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी आज गुगल आणि मेटाचे प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आले नाहीत. ईडी दोघांनाही पुन्हा समन्स पाठवणार आहे. ईडीने गुगल आणि मेटाला चौकशीत सामील होण्यासाठी नोटीस पाठवली आणि दोघांच्या प्रतिनिधींना आज हजर राहण्यास सांगितले होते.

  • 21 Jul 2025 03:45 PM (IST)

    तामिळनाडू: मुख्यमंत्री स्टॅलिन यांची प्रकृती खालावली, अपोलोमध्ये दाखल

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना सोमवारी सकाळी फिरायला जाताना हलके चक्कर आल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • 21 Jul 2025 03:18 PM (IST)

    न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सभापतींकडे सादर

    न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यासाठी 150 खासदारांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर करण्यात आला.

  • 21 Jul 2025 03:04 PM (IST)

    आम्ही सर्व भाषांचा आदर करतो: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

    कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आम्ही सर्व भाषांचा आदर करतो, मग ती हिंदी असो, गुजराती असो, मराठी असो, राजस्थानी असो. स्वातंत्र्य चळवळीत पश्चिम बंगालच्या लोकांनी मोठी भूमिका बजावली. पश्चिम बंगालचे लोक जे करू शकतात ते दुसरे कोणीही करू शकत नाही.”

  • 21 Jul 2025 02:00 PM (IST)

    सुरज चव्हाणकडून झालेल्या महाराणीचा पंढरपुरात निषेध

    लातूरमध्ये काल सूरज चव्हाणच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. छावा संघटनेच्या कार्यकर्त्याकडून पत्ते फेकत निदर्शने केली. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आला आहे. सुरज चव्हाण याला पक्षातून निलंबित करा अन्यथा छावा संघटना सुरज चव्हाण यांना दिसेल तिथे काळे फसणार आणि दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त करणार असावा संघटनेने इशारा दिला आहे.

  • 21 Jul 2025 01:50 PM (IST)

    तटकरेंच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी छावा आणि जनहित संघटनेचा गोंधळ

    धाराशिव येथील तटकरेंच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी छावा आणि जनहित संघटनेने गोंधळ घातला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेट वरती आडवले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेट वरतीच अडवले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे कार्यकर्त्यासोबत बैठक घेत आहेत.

  • 21 Jul 2025 01:35 PM (IST)

    मुंबई गोवा महामार्गांवर परशुराम घाटात भराव कोसळला

    मुंबई गोवा महामार्गांवर परशुराम घाटातील भराव कोसळला आहे. मोठया प्रमाणात मातीचा भराव कोसळल्यामुळे धोका वाढला आहे. महामार्गाच्या सौरक्षक भिंतीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागाचा कोसळ्यामुळं परिस्थिती धोकादायक निर्माण झाली आहे.

  • 21 Jul 2025 01:26 PM (IST)

    प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण देणार राजिनामा?

    लातूर मारहाण प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडक कारवाई केली असून युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजिनामा देण्याचा आदेश दिला आहे. मारहाण घटनेनंतर राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

  • 21 Jul 2025 12:59 PM (IST)

    पुण्यात मंत्री कोकाटे, सूरज चव्हाणांविरोधात बॅनरबाजी

    पुण्यात मंत्री कोकाटे, सूरज चव्हाणांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. जाब विचारला की सरकार करतंय हाणामारी असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. तसंच सूरज चव्हाण यांनी रस्त्यावर येऊन दाखवावं असा इशाराही देण्यात आला आहे.

  • 21 Jul 2025 12:47 PM (IST)

    मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी रात्री हल्ल्याचा प्रयत्न

    मंत्री संजय शिरसाट यांच्या घरी हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तरूणाकडून शिरसाट यांच्या घरी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मद्यधुंद अवस्थेत हा तरूण शिरसाट यांच्या बंगल्यासमोर आला  आणि त्याने शिवीगाळ करत, दगडफेक करत शिरसाट यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्या तरूणाविरोधात सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

  • 21 Jul 2025 12:36 PM (IST)

    काल घडलेली घटना अतिशय निंदनीय – अजित पवार

    छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या प्रकरणी अजित पवारांनी निवेदन दिलं आहे.  काल घडलेली घटना अतिशय निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

     

  • 21 Jul 2025 12:30 PM (IST)

    अहमदाबाद दुर्घटनेवर खासदार अशोक चव्हाण यांनी विचारला प्रश्न

    अहमदाबाद दुर्घटनेवर खासदार अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर  राम मोहन नायडू यांनी दिलं उत्तर.

    दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला हे त्यामध्ये ब्लॅक बॉक्समधून रिकव्हर करण्यात आला आहे.

    या वेळेस पहिल्यांदाच ब्लॅक बॉक्स ज्या देशात उत्पादित होतो तिथे न पाठवता आपल्या एआयबी ने त्याची माहिती रिकव्हर केली आहे. फ्लाइट डेटा रिकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस मधून माहिती एकत्र करून प्राथमिक अहवाल बनवला आहे.

    अंतिम अहवाल पर्यंत थांबा आम्ही सगळी माहिती लोकांना देऊ असं सांगण्यात आलं.

  • 21 Jul 2025 12:25 PM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

    तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ.  सुनील तटकरे दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर मंदिरातील सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, मीडियालाही मंदिरामध्ये जाण्यास सुरक्षा रक्षकांनी अडवले.

  • 21 Jul 2025 12:23 PM (IST)

    अंबरनाथमध्ये खासदार संजय राऊत यांचा दौरा

    अंबरनाथ मध्ये खासदार संजय राऊत यांचा दौरा होणार आहे.  मोतीराम पार्क मधील शिवविधी व न्याय सेना मोफत कायदेशीर सल्ला केंद्र उ‌द्घाटन सोहळा पार पडणार असून मनसे कडून संजय राऊत यांचं स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या शुक्रवारी 25 तारखेला सायंकाळी चार वाजता कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 21 Jul 2025 12:02 PM (IST)

    UBT सत्तेत असताना मराठी लोकांसाठी काय केले? – संजय निरुपम

    “UBT सत्तेत असताना मराठी लोकांसाठी काय केले? असं मुंबईचे मराठी लोक विचारत आहेत. 131 मराठी शाळा बंद झाल्या. सत्तेत असताना. अमराठी कंत्राटदार पालिकेत आले. मुस्लिम मतं UBT ला विधानसभेत मिळाली नसती, तर 10 आमदारही निवडून आले नसते. बाळासाहेब यांचे विचार एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत” असं संजय निरुपम म्हणाले.

  • 21 Jul 2025 11:52 AM (IST)

    पश्चिम विदर्भात मागील आठ दिवसापासून पावसाची दांडी

    भर पावसाळ्याच्या ऋतूत पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पावसाने दांडी मारल्याने तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची वेळ. आणखी पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार. एकीकडे विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी आजही कडाक्याचं ऊन तापत आहे. अनेक भागात शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचणी.

  • 21 Jul 2025 11:38 AM (IST)

    नाशिकमध्ये विद्यार्थिनीने संपवलं जीवन

    आई माझ्या शिक्षणाचा त्रास नको घेऊ. चिठ्ठी लिहित 20 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. आईला चिट्ठी लिहत गळफास घेत महिला पोलिसाच्या मुलीची आत्महत्या. पूजा दीपक डांबरे असे आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय विद्यार्थिनीचे नाव. नाशिकच्या कामगार नगर परिसरात असलेल्या अमृतधाम येथे घडली घटना.

  • 21 Jul 2025 11:19 AM (IST)

    पहिल्या दिवशी संसदेत गोंधळ

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत गोंधळ. ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची विरोधी पक्षांची मागणी

  • 21 Jul 2025 11:16 AM (IST)

    तुळजापूरमध्ये तणावाची परिस्थिती

    सुनील तटकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते तुळजाभवानीच दर्शन घेणार आहेत. सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्याचबरोबर छावा संघटना, जनहित संघटना आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते देखील कालच्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. एकंदरीतच तुळजापूरमध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

  • 21 Jul 2025 10:55 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडला- मोदी

    “डिजिटल व्यवहारात भारत अग्रेसर आहे. 2014 च्या आधी भारत अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. आता भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या नवीन सामर्थ्याला जग पाहतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडला. पहलगाम हल्ल्यानंतर देशहितासाठी निर्णय घेतले,” असं मोदी म्हणाले.

  • 21 Jul 2025 10:45 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा

    ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी करणार आहेत. अधिवेशनाच्या दरम्यानच उद्धव ठाकरे दिल्ली दौरा करणार असल्याने चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.

  • 21 Jul 2025 10:40 AM (IST)

    भारतीय सैन्यशक्तीची ताकद संपूर्ण जगाने पाहिली- मोदी

    पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतीय सैन्यशक्तीची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे. दहशतवाद्यांच्या आकांना आपण घरात घुसून मारलंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आपलं लक्ष्य गाठलंय. बॉम्ब, बंदूक, पिस्तुलसमोर आपल्या संविधानाचा विजय होतोय.”

     

     

  • 21 Jul 2025 10:35 AM (IST)

    आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन

    आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पावसाळी अधिवेशन म्हणजे उत्सवाचं प्रतीक, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “हे अधिवेशन देशासाठी गौरवपूर्ण आहे. हे अधिवेशन म्हणजे विजयोत्सवाचं सत्र”, असं वक्तव्य मोदींनी केलंय.

  • 21 Jul 2025 10:30 AM (IST)

    छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुनील तटकरेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजीचा प्रयत्न

    लातूर- छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुनील तटकरेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजीचा प्रयत्न करण्यात आला. सुनील तटकरे यांचा ताफा बाहेर पडत असताना ही घोषणाबाजी करण्यात आली. सूरज चव्हाणला आम्ही सोडणार नाही, इशारा असा छावाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

  • 21 Jul 2025 10:16 AM (IST)

    छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाणप्रकरणी सूरज चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा

    छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

     

  • 21 Jul 2025 10:06 AM (IST)

    2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण

    मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रकरणातील सर्व 12 आरोपींची मुक्तता झाली आहे.

  • 21 Jul 2025 09:55 AM (IST)

    मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

    मुंबईला हादरवून सोडणाऱ्या २००६ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय दिला.

  • 21 Jul 2025 09:30 AM (IST)

    आगामी जळगाव मनपा निवडणुकीत एमआयएम 25 जागा लढवणार

    जळगावमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष २५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. एमआयएमचे जळगाव जिल्हा निरीक्षक शारिक नक्षबंदी यांनी ही माहिती दिली. जे नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी धर्मनिरपेक्ष पक्षांना सोडून केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये जात आहेत, असे पदाधिकारी आणि उमेदवार एमआयएमच्या मुख्य टार्गेटवर राहतील, असेही नक्षबंदी यांनी स्पष्ट केले. मनपा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली असली तरी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबद्दल सर्वेक्षण करून जागा लढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही शारिक नक्षबंदी यांनी सांगितले.

  • 21 Jul 2025 09:18 AM (IST)

    कामाचे पैसे न मिळाल्याने कंत्राटदाराने भाईंदरमधील शौचालय पाडले

    भाईंदर पश्चिम येथील क्रांतीनगर झोपडपट्टीतील सिमला गल्लीमध्ये महापालिकेकडून कंत्राटदाराला सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, कामाचे पैसे न मिळाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने स्वतःच बांधलेले हे शौचालय पाडले आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे, संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरत आहे.

  • 21 Jul 2025 09:05 AM (IST)

    ठाण्यात अंमली पदार्थ तस्कराच्या स्वागतासाठी जोरदार मिरवणूक, 39 जणांवर गुन्हा दाखल

    ठाणे सेंट्रल जेलमधून जामिनावर सुटलेला अंमली पदार्थ विक्रेता कामरान मोहम्मद खान याचं जल्लोषात स्वागत केल्याप्रकरणी 39 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नया नगर पोलिसांनी कामरानची रस्त्यावर धिंड काढली. २०२१ मध्ये अंमली पदार्थ प्रकरणात अटक झालेल्या कामरानच्या सुटकेनंतर नऊ आरोपींनी त्याचं स्वागत करत जोरदार मिरवणूक काढली होती. या नऊ जणांची ओळख पटली असून, ते देखील ड्रग्ज पेडलरच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या मिरवणुकीत रस्त्यात सामील झालेल्या आणखी ३० अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 21 Jul 2025 08:55 AM (IST)

    त्रंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी केल्या महत्त्वाच्या सूचना

    श्रावण महिन्यात भाविक त्र्यंबकेश्वर येथे गर्दी करत असताना ग्रामीण पोलिसांकडून सूचना… भाविकांनी येताना मौल्यवान वस्तू आणू नये आणि आणि कमीत कमी वस्तू आणण्याच्या सूचना… मंदिरात भाविकांना पिशव्या बॅगा घेऊन जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मनाई… बेवारस अथवा संशयित वस्तू आढळल्यास हात न लावता पोलिसांना कळविण्याचे आवाहन… श्रावण सोमवार निमित्त 25 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान भाविकांची असणार मोठी गर्दी

  • 21 Jul 2025 08:40 AM (IST)

    महाराष्ट्रातील हिंदी सक्तीचा मुद्दा गाजणार अधिवेशनात

    महाराष्ट्रातील विरोधी खासदार मागणार केंद्राची भूमिका… हिंदी बाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे ठाकरे गटाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार करणार मागणी… आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होत आहे सुरुवात

  • 21 Jul 2025 08:25 AM (IST)

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून होणार सुरुवात

    १० ते ११ नवी बिल मांडली जाणार तर दोन चर्चा पार पडणार… ऑपरेशन सिंदूरवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत.. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती द्यावी विरोधकांची मागणी… संसद भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  • 21 Jul 2025 08:10 AM (IST)

    मुंबई उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊसाला सुरुवात

    मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले आणि सांताक्रूझ भागात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उपनगरात काळ्या ढगांसह पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज अलर्ट जारी केला आहे; अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.